वडगाव मावळमध्ये मराठा समाजाकडून कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी तहसीलदारांना पत्र देण्यात आले (फोटो - सोशल मीडिया)
Kunbi certificate : वडगाव मावळ : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले. सर्व नोंदी असलेल्या कुणबी धारकांना प्रमाणपत्रं देण्यात यावी अशी त्यांची मागणी पूर्ण झाली आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी आता हालचाली वाढल्या आहेत. कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी येणारे अडथळे व कुणबी प्रमाणपत्र लवकरात लवकर कमी खर्चात मिळण्यासाठी, मावळातील नागरिकांना त्यांच्या गावातील कुणबी नोंदी शोधून देण्यासाठी मावळ अखंड मराठा समाजाच्या वतीने मावळचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. तसेच यासंदर्भात चर्चाही करण्यात आली.
मावळ तालुक्यात जन्म-मृत्यू रजिस्टरमध्ये अनेक गावातील कुणबी नोंदी मोडी लिपीत उपलब्ध आहेत. त्या नोंदी मोडीलिपीत असल्याने अनेकांना त्याबद्दल कल्पना नाही. तसेच मोडी लिपी वाचता येत नसल्याने अनेक अडथळे येत आहेत. जुन्या दस्तांमध्ये आढळलेल्या कुणबी नावापर्यंत पोहचण्यासाठी गाव, देवस्थान, शाळा, वन, नगरपालिका, आरोग्य विभाग व जमीन संदर्भात असलेले टीपण, कडईपत्रक, जन्म-मृत्यू रजिस्टर, वारस रजिस्टर, जंगल गुणाकार बुक, खासरा पत्रक, बोट खत, कुळ रजिस्टर, सूद रजिस्टर हे व्यवस्थितपणे उपलब्ध होत नाहीत. तसेच यातील काही कागदपत्रे गहाळ सुद्धा झालेली दिसत आहेत. काही गावातील हीच कागदपत्रे दुसऱ्या गावातील कागदपत्रात एकत्र झालेली आहेत. ही जुनी कागदपत्रे काढण्यासाठी काही एजंट लोकांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे गोर-गरीब शेतकऱ्यांना हे प्रमाणपत्र काढण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहे म्हणून मावळ मराठा समाजाच्या वतीने काही मागण्या करण्यात आल्या आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पैसे घेणाऱ्या एजंटवर कठोर कारवाई
येत्या 26 तारखेला वनविभाग, शिक्षण विभाग, महसूल विभाग, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग यांचे अधिकारी व मराठा समाज यांच्यासोबत मिटिंग घेऊन, तालुक्यातील या विभागातील जुन्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच कुणबी नोंदी शोधून देणारे, जुने कागदपत्रे, प्रमाणपत्र काढून देणारे व अधिक पैसे घेणारे जे कोणी एजंट आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करणार आहे अशी माहिती मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिली.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय आहेत मुख्य मागण्या?