लाडकी बहीण योजनेत पुरुषांची 'एंट्री'; तब्बल 'इतक्या' पुरुषांनी घेतला लाभ, 24 कोटींचा बसला फटका (File Photo : Ladki Bahin Yojana)
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील घोटाळा उघडकीस आला आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या योजनेचा हजारो पुरुषांनी फसवणूक करून लाभ घेतला. महिला आणि बालविकास विभागातील सूत्रांचा हवाला देत काही अहवालात १२४३१ पुरुषांनी या योजनेचा गैरवापर केल्याचा दावा करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. या योजनेवरून विरोधकांकडून अनेकदा जोरदार निशाणा साधला जात आहे. त्यातच अनेक पुरुषांनी या योजनेतून लाभ घेतल्याचे समोर आले आहे. याबाबतची तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर, त्या सर्वांना लाभार्थ्यांच्या यादीतून वगळण्यात आले. चौकशीत असे दिसून आले की, फसवणूक करून लाभार्थी बनलेल्या पुरुषांनी जवळजवळ एक वर्ष योजनेचा निधी घेतला, ज्यामुळे सरकारी तिजोरीला अंदाजे २४.२४ कोटी रुपयांचा फटका बसला.
नियमबाह्य पद्धतीने लाटले पैसे
या योजनेच्या महिला लाभार्थ्यांसाठी सरकारने काही निकष निश्चित केले होते, ज्या अंतर्गत एका कुटुंबातील फक्त दोन महिला पात्र होत्या. शिवाय लाभार्थी महिलेचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असलेल्या महिला या योजनेसाठी अपात्र मानल्या.
तब्बल ७७९८० अपात्र महिलांनाही फायदा
असे असूनही ७७९८० अपात्र महिलांनी अनेक महिन्यांपासून या योजनेचा बेकायदेशीरपणे लाभघेतला आहे. सरकारने एकूण १६४.५२ कोटी रुपये अपात्र खात्यांमध्ये हस्तांतरित केले, ज्यापैकी १४०.२८ कोटी रुपये महिलांना मिळाले.
ई-केवायसीच्या निर्णयाला स्थगिती
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य दिले जात आहे. मात्र, या योजनेच्या माध्यमातून अनेक पुरुषांनी तसेच काही महिलांनी निकषात बसत नसतानाही पैसे घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सरकारने सर्वच महिलांना ई-केवायसी बंधनकारक केली होती. पण, आता या ई-केवायसीच्या निर्णयाला राज्य सरकारने तात्पुरती स्थगिती दिली आहे.
हेदेखील वाचा : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी ! e-KYC च्या ‘त्या’ निर्णयाला राज्य सरकारची स्थगिती






