• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Marathi Breaking News Today Live Updates Add Main Events Date 01 May

Top Marathi News Today: 100 दिवसांचा प्रशासकीय निकाल जाहीर

Marathi breaking live marathi headlines update Date 01 may : महाराष्ट्रासह देशभरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी वाचत रहा. राजकारण, मनोरंजन, स्पोर्ट्स अशा सर्वच क्षेत्रातील लाईव्ह अपडेट जाणून घ्या.

  • By प्रीति माने
Updated On: May 01, 2025 | 07:15 PM
Top Marathi News today Live

Top Marathi News today Live

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Marathi Breaking news live updates : आज 1 मे असून संपूर्ण राज्यभरामध्ये महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे. अनेक ठिकाणी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन करणाऱ्या मिरवणूका आणि प्रभात फेरी निघाल्या आहेत. त्याचबरोबर राजकीय नेत्यांनी देखील सोशल मीडियावर महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या निमित्ताने मराठी लोकांनी अस्मितेसाठी दिलेल्या लढ्याची आणि प्राण गमावलेल्या वीरांना स्मरले जात आहे.

The liveblog has ended.
  • 01 May 2025 05:10 PM (IST)

    01 May 2025 05:10 PM (IST)

    20 एप्रिलनंतर देशावर 10 लाख सायबर हल्ले

    पहलगाम हल्ल्यानंतर भारतात सायबर हल्ल्यात झपाट्याने वाढ, इकोज ऑफ पहलगाम नावाचा अहवाल तयार, महाराष्ट्र सायबर सेलचा अहवाल, 20 एप्रिलनंतर देशावर 10 लाख सायबर हल्ले

  • 01 May 2025 04:40 PM (IST)

    01 May 2025 04:40 PM (IST)

    पहलगाम हल्ल्याच्या न्यायालयीन चौकशीची मागणी, SC ने याचिकाकर्त्याला फटकारले

    जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी होत आहे. केंद्र सरकार देखील सतर्क झाले असून महत्वाच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. त्यातच एक मोठी बातमी समोर येत आहे. पहलगाम हल्ल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. ती याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे.

  • 01 May 2025 04:21 PM (IST)

    01 May 2025 04:21 PM (IST)

    जयंत पाटलांचे महाराष्ट्र दिनी खास पत्र

    महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शरद पवार गटाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचं भावनिक पत्र लिहिले आहे. त्यांच्या या पत्रामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

    सर्वांना महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

    खडतर परिस्थितीतून, अमूल्य त्यागातून, अमर्यादित संघर्षातून हा दिवस आज आपल्याला पहायला मिळतोय. या गौरवशाली महाराष्ट्राच्या मातीत रुजलेले पुरोगामी विचारांचे रोपटे देशासाठी नेहमीच दिशादर्शक राहिले आहे. मुंबई,… pic.twitter.com/IbnVXC1pFO

    — Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 1, 2025

  • 01 May 2025 03:45 PM (IST)

    01 May 2025 03:45 PM (IST)

    मुंबईच्या नव्या पोलीस आयुक्तांनी स्वीकारला पदभार

    मुंबई पोलिस आयुक्तपद हे नेहमीच प्रतिष्ठेचे आणि जबाबदारीचे प्रतीक राहिले आहे.  मुंबईचे नवे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी पदभार स्वीकारला  आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by NavaRashtra (@navarashtra)

  • 01 May 2025 03:43 PM (IST)

    01 May 2025 03:43 PM (IST)

    जनगणना करण्याचा निर्णय योग्यचं - नरहरी झिरवाळ

    "जातनिहाय जनगणना व्हावी ही बऱ्याच दिवसांची मागणी आहे. जनगणना व्हावीच कारण जनगणनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या अडचणीला सामोरे जावं लागतं. म्हणून जनगणना करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो योग्यचं आहे," असे मत मंत्री नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केले आहे.

  • 01 May 2025 03:21 PM (IST)

    01 May 2025 03:21 PM (IST)

    को्टयवधींचा खर्च करुन शाळांमध्ये बसवलेली 'ई-लर्निंग' यंत्रणा ठप्प

    काेट्यवधी रुपये खर्च करून महापािलकेच्या शाळांमध्ये ई लर्निंग यंत्रणा सुरु करण्यात आली होती. मात्र गेल्या तीन वर्षापासून ई लर्निंग यंत्रणा बंद झाली आहे. इंटरनेट सुविधा नसल्यामुळे ही सुविधा बंद पडली आहे (वाचा सविस्तर) 

  • 01 May 2025 02:29 PM (IST)

    01 May 2025 02:29 PM (IST)

    चंद्रशेखर बावनकुळे नागपूरमध्ये शासकीय कार्यक्रमात उपस्थित

    भाजप नेते व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रदिनानिमित्त कस्तुरचंद पार्क, नागपूर येथे आयोजित शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहन केले.तसेच पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यातील मृत नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

    मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा!
    प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ।।

    महाराष्ट्रदिनानिमित्त कस्तुरचंद पार्क, नागपूर येथे आयोजित शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहन केले. पोलिसांची मानवंदना स्वीकारली. पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यातील मृत नागरिकांना… pic.twitter.com/zvdwKiLGbr

    — Chandrashekhar Bawankule (@cbawankule) May 1, 2025

  • 01 May 2025 02:12 PM (IST)

    01 May 2025 02:12 PM (IST)

    मोरबे धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

    रसायनी येथील पिल्लई महाविद्यालयात थर्ड इअरमध्ये शिकणारा अनिकेत किसन भगत (वय 20) याचा मोरबे धरणात बुडून मृत्यू झाला. अनिकेत भगत हा सुकापूर, पनवेल येथील विद्यार्थी असून, बुधवारी परीक्षा संपल्यावर आणि एक मे पासून सुट्टी असल्याने मित्रांसोबत नवी मुंबई महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या परिसरात आला.

  • 01 May 2025 01:44 PM (IST)

    01 May 2025 01:44 PM (IST)

    लोणावळा - कर्जत घाट भागात टनेल होणार

    कर्जत आणि लोणावळा या भागातील मध्य रेल्वेचे मार्गावर बोगदा काढण्याचा प्रस्ताव खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वे प्रशासनाला सुचविला आहे. या प्रस्तावाला मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक यांच्याकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.दरम्यान,खासदार बारणे यांच्याकडून कर्जत,पनवेल आणि उरण तालुक्यातील रेल्वे प्रश्नांवर ही बैठक बोलाविली होती.

  • 01 May 2025 01:31 PM (IST)

    01 May 2025 01:31 PM (IST)

    भारतीय संगीत लवकरच जगाची ओळख

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत वेव्हज परिषदेचे उद्घाटन झाले. भारताकडे हजारो वर्षांचा कथांचा खजिना आहे. लोककलेने इतिहास जिवंत ठेवलाय. भारताच्या कानाकोपऱ्यात अद्भूत टॅलेंट आहे. भारतीय सिनेमा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचला. भारतीय कॉन्टेन्टची जगाला भुरळ पडली आहे. भारतीय संगीतही जगाची लवकरच ओळख बनेल. भारतात ऑरेंज इकॉनॉमीची सुरूवात होतेय.

  • 01 May 2025 01:16 PM (IST)

    01 May 2025 01:16 PM (IST)

    राहुल गांधींच्या भूमिकेपुढे सरकारला गुडघे टेकावे लागले - राऊत

    केंद्रात सरकार मोदींचं अन् सिस्टिम राहुल गांधींची चालली आहे. राहुल गांधींच्या भूमिकेपुढे सरकारला गुडघे टेकावे लागले. जातीय जनगणनेचा विषय राहुल गांधी यांनी उचलला. तो पर्यंत या देशातील जनतेला माहितही नव्हतं. विरोध भाजपचा होता. कॅबिनेटच्या निर्णयाच स्वागत करतो, राहुल गांधी यांचं अभिनंदन करतो” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

  • 01 May 2025 01:14 PM (IST)

    01 May 2025 01:14 PM (IST)

    व्यापाऱ्यांना विकला गेलेला महाराष्ट्र निर्माण केला - राऊत

    महाराष्ट्र किती कमजोर झाला, त्याची श्वेतपत्रिका काढा. 106 हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहण्याचा तुमचा अधिकार नाही, लायकी शब्द वापरणार नाही. 106 हुतात्म्यांच्या स्वप्नांना संपवून टाकलं. व्यापाऱ्यांना विकला गेलेला महाराष्ट्र निर्माण केला” अशा गंभीर शब्दांत खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे.

  • 01 May 2025 01:08 PM (IST)

    01 May 2025 01:08 PM (IST)

    IPL 2025 : मुंबई इंडियन्सला मोठा झटका! फिरकी गोलंदाज विघ्नेश पुथूर आयपीएल २०२५ मधून बाहेर

    मुंबई इंडियन्स संघाला मोठा झटका बसला आहे. २४ वर्षीय डावखुरा मनगट फिरकी गोलंदाज विघ्नेश पुथूर दुखापतीमुळे आयपीएलच्या  उर्वरित हंगामातून बाहेर पडला आहे. त्याच्याऐवजी  मुंबईने आयपीएल २०२५ च्या उर्वरित हंगामासाठी लेग-स्पिनर रघु शर्माला संघात सामील केले आहे.

  • 01 May 2025 12:41 PM (IST)

    01 May 2025 12:41 PM (IST)

    100 दिवसांचा प्रशासकीय निकाल हाती

    महायुती सरकारने विकासकामे, योजना आणि प्रक्लप पूर्ण करण्याचा मानस हाती घेण्यात आला होता. यामध्ये आता 100 दिवसांचा निकाल हाती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन या निकाल जाहीर केला आहे.

    100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले. या निकालानुसार वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी 10 मुद्यांवर… pic.twitter.com/svAqMiLPok

    — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 1, 2025

  • 01 May 2025 12:16 PM (IST)

    01 May 2025 12:16 PM (IST)

    परप्रांतीयांमुळेच महाराष्ट्रामध्ये समस्या - राजू पाटील

    महाराष्ट्रामध्ये पाणी, ट्रॅफिक, लोकलची गर्दी या समस्या परप्रांतीयांमुळेच झाली आहे असे विधान राजू पाटील यांंनी केले आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by NavaRashtra (@navarashtra)

  • 01 May 2025 11:45 AM (IST)

    01 May 2025 11:45 AM (IST)

    हुतात्मा चौक स्मारकाला मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

    ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना आज हुतात्मा चौक स्मारक, मुंबई येथे पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

    स्मरण हुतात्म्यांचे
    औचित्य महाराष्ट्र दिनाचे...

    🚩मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना आज हुतात्मा चौक स्मारक, मुंबई येथे पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड.… pic.twitter.com/623cYtDkXw

    — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 1, 2025

  • 01 May 2025 11:31 AM (IST)

    01 May 2025 11:31 AM (IST)

    खंडणी मागणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल

    तुमच्या पतीचा खून झाला आहे. तसेच तुमच्या आणि तुमच्या मुलाच्या जीवाला धोका आहे, असे सांगून एका महिलेकडे दहा लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. ही घटना 16 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील जाधववाडी, नवलाख उंबरे येथे घडली.

  • 01 May 2025 11:11 AM (IST)

    01 May 2025 11:11 AM (IST)

    पंतप्रधान मोदींच्या मराठीत खास शुभेच्छा

    महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीमध्ये खास शुभेच्छा दिल्या आहेत.

    भारताच्या विकासात कायमच महत्त्वाची भूमिका बजावत आलेल्या, महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. जेव्हा आपण महाराष्ट्राबद्दल विचार करतो, तेव्हा समोर येतो तो या भूमीचा गौरवशाली इतिहास आणि इथल्या जनतेचे धैर्य. हे राज्य प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे आणि त्याच वेळी…

    — Narendra Modi (@narendramodi) May 1, 2025

  • 01 May 2025 11:09 AM (IST)

    01 May 2025 11:09 AM (IST)

    अमित शाहांनी दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

    सांस्कृतिक पुनःजागरणाची पुण्यभूमी महाराष्ट्रवासियांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.स्वधर्माच्या रक्षणाचा संकल्प असो, लोककला असो, शेती संस्कृतीचा विकास असो किंवा देशाची आर्थिक समृद्धी असो, महाराष्ट्राने देशाच्या इतिहासात उल्लेखनीय भूमिका बजावली आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

    सांस्कृतिक पुनःजागरणाची पुण्यभूमी महाराष्ट्रवासियांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

    स्वधर्माच्या रक्षणाचा संकल्प असो, लोककला असो, शेती संस्कृतीचा विकास असो किंवा देशाची आर्थिक समृद्धी असो, महाराष्ट्राने देशाच्या इतिहासात उल्लेखनीय भूमिका बजावली आहे. महाराष्ट्रातील माझ्या…

    — Amit Shah (@AmitShah) May 1, 2025

Web Title: Marathi breaking news today live updates add main events date 01 may

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 01, 2025 | 11:07 AM

Topics:  

  • daily news
  • Latest Marathi News
  • political news

संबंधित बातम्या

Shrirang Barne affidavit News : खासदार श्रीरंग बारणे हाजीर हो….! शपथपत्रात दिली खोटी माहिती दिल्या प्रकरणी न्यायालयाचा दणका
1

Shrirang Barne affidavit News : खासदार श्रीरंग बारणे हाजीर हो….! शपथपत्रात दिली खोटी माहिती दिल्या प्रकरणी न्यायालयाचा दणका

Maharashtra Golden Data : राज्य सरकारने तयार केला गोल्डन डेटा; बोगस लाभार्थ्यांवर एका क्लिकमध्ये बसणार वचक
2

Maharashtra Golden Data : राज्य सरकारने तयार केला गोल्डन डेटा; बोगस लाभार्थ्यांवर एका क्लिकमध्ये बसणार वचक

Raigad News : मराठीचा झेंडा अटकेपार; World Food India Expo 2025 साठी सुधागडच्या प्रकल्पाची निवड
3

Raigad News : मराठीचा झेंडा अटकेपार; World Food India Expo 2025 साठी सुधागडच्या प्रकल्पाची निवड

‘शरद पवार गटाचे आमदार असा शब्द मी वापरला होता’; छगन भुजबळ यांचे स्पष्टीकरण
4

‘शरद पवार गटाचे आमदार असा शब्द मी वापरला होता’; छगन भुजबळ यांचे स्पष्टीकरण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ASCI च्या 40व्या वर्धापनदिनी मोठा बदल, सुधांशू वत्स यांची अध्यक्षपदी नियुक्ती

ASCI च्या 40व्या वर्धापनदिनी मोठा बदल, सुधांशू वत्स यांची अध्यक्षपदी नियुक्ती

‘दशावतार’ चित्रपटाला राजकीय क्षेत्रातून मोठा प्रतिसाद! उद्धव ठाकरेंनी केले कौतुक

‘दशावतार’ चित्रपटाला राजकीय क्षेत्रातून मोठा प्रतिसाद! उद्धव ठाकरेंनी केले कौतुक

तोंडात आलाय फोड, होतायेत असहय्य वेदना? मग आजच करा हे घरगुती उपाय; लगेच मिळेल आराम

तोंडात आलाय फोड, होतायेत असहय्य वेदना? मग आजच करा हे घरगुती उपाय; लगेच मिळेल आराम

मुंबईकरांनो ही बातमी तुमच्यासाठी! लवकरच सुरु होणार e-Bike Taxi सर्व्हिस, भाडं वडापावच्या किमतीपेक्षाही कमी

मुंबईकरांनो ही बातमी तुमच्यासाठी! लवकरच सुरु होणार e-Bike Taxi सर्व्हिस, भाडं वडापावच्या किमतीपेक्षाही कमी

Local Body Elections: महापालिका निवडणूक रणधुमाळीला सज्ज! प्रतीक्षा मात्र बिगुल वाजण्याचीच; ९ महीने झाले तरी…

Local Body Elections: महापालिका निवडणूक रणधुमाळीला सज्ज! प्रतीक्षा मात्र बिगुल वाजण्याचीच; ९ महीने झाले तरी…

MakeMyTrip आणि Zomato ची भागीदारी, आता ट्रेन बुकिंगसोबतच करा 40,000 पेक्षा जास्त रेस्टॉरंट्समधून फूड ऑर्डर

MakeMyTrip आणि Zomato ची भागीदारी, आता ट्रेन बुकिंगसोबतच करा 40,000 पेक्षा जास्त रेस्टॉरंट्समधून फूड ऑर्डर

Deepika Liver Cancer: थकवा-मूठभर गळणारे केस, 5 लक्षणांनी तुटली दीपिका कक्कर, कॅन्सरचा 1 संकेत दुर्लक्षित करण्याचा परिणाम

Deepika Liver Cancer: थकवा-मूठभर गळणारे केस, 5 लक्षणांनी तुटली दीपिका कक्कर, कॅन्सरचा 1 संकेत दुर्लक्षित करण्याचा परिणाम

व्हिडिओ

पुढे बघा
Sangali : पाणी, गटार, रस्ते सुविधांचा आभाव, नागरिक आक्रमक

Sangali : पाणी, गटार, रस्ते सुविधांचा आभाव, नागरिक आक्रमक

Pimpri-Chinchwad : फडणवीसांच्या पोस्टरमुळे शिवरायांचा अपमान झाल्याचा आरोप, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Pimpri-Chinchwad : फडणवीसांच्या पोस्टरमुळे शिवरायांचा अपमान झाल्याचा आरोप, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Kolhapur Prakash Abikar : राज्य महोत्सव दर्जा मात्र सरकारने निधीच दिला नसल्याचा शिवसेनेचा आरोप

Kolhapur Prakash Abikar : राज्य महोत्सव दर्जा मात्र सरकारने निधीच दिला नसल्याचा शिवसेनेचा आरोप

Parbhani : शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Parbhani : शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Raigad : खोपोली-खालापूर ओबीसी समाजाचा मोर्चा, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणाची मागणी

Raigad : खोपोली-खालापूर ओबीसी समाजाचा मोर्चा, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणाची मागणी

Mahalaxmi Ambabai Temple : भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण आणि सुरक्षेसाठी होणार AI चा वापर

Mahalaxmi Ambabai Temple : भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण आणि सुरक्षेसाठी होणार AI चा वापर

Kolhapur : कोल्हापूरातील माणगाव ग्रामपंचायतीची ऐतिहासिक योजना

Kolhapur : कोल्हापूरातील माणगाव ग्रामपंचायतीची ऐतिहासिक योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.