राज्यात पावसाचा जोर वाढणार! 'या' जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट (Photo Credit- X)
हवामान विभागाने पालघर आणि पुणे जिल्ह्यांतील घाट क्षेत्रांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. याव्यतिरिक्त, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर यांसारख्या प्रमुख जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Thunderstorm accompanied with lightning, gusty winds 40-50 kmph, light to moderate rainfall very likely to occur at isolated places in the districts of Marathwada.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया. https://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/jFNr2GzG0C — Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 2, 2026
IMD च्या मते, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांसाठी पुढील ४८ तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. २ आणि ३ जुलै रोजी या भागांत मुसळधार पावसाची दाट शक्यता असून, ४ ते ६ जुलै दरम्यान पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन दिवसांपासून नागपूरसह संपूर्ण विदर्भ भागात सतत पाऊस पडत आहे. बुधवारी संध्याकाळी नागपूर शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण झाला आणि नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. ६ जुलैपर्यंत विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत सतत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे, ज्यामुळे स्थानिक नद्या आणि ओढ्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ शकते. अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
मराठवाड्यात शुक्रवारी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, तर इतर दिवशी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, ४ जुलैपर्यंत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचीही शक्यता आहे.






