Top Marathi News today Live
Marathi Breaking news live updates : दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. एकाच आठवड्यामध्ये छावा चित्रपटाने कोट्यवधी रुपयांचा गल्ला कमावला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनकथेवर आधारित असलेल्या या चित्रपटामधील अभिनेता विकी कौशलच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र संभाजीमहाराजांचा ठावठिकाणे सांगणारे शिर्के बंधूंना चित्रपटामध्ये व्हिलन दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. शिर्केंचे वंशजांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन गणोजी राव शिर्के व कान्होजी राव शिर्के यांना खलनायक दाखवण्यात आले असून हे चित्रपटामधून काढून टाकण्यात यावे. राजेशिर्के कुटुंबाची बदनामी करणाऱ्या बाबी लवकरात लवकर वगळण्यात याव्या, अशी मागणी शिर्केंच्या वंशजांनी केली आहे.
22 Feb 2025 06:10 PM (IST)
व्हिडिओ शेअर करत शरद पवार गटाचे नेते व खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, “काही दिवसांपूर्वी विकिपीडिया या माहिती स्त्रोतावर छत्रपती संभाजी महाराजांबाबत काही चुकीची आणि आक्षेपार्ह माहिती टाकण्यात आली होती. अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावर देखील नाराजी व्यक्त करण्यात आली. यानिमित्ताने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. एकेकडे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत असतानाच विकिपीडीयावर असे आक्षेपार्ह माहिती टाकली जाते. तेव्हा असा प्रश्न निर्माण होतो की हे जाणून बुजून केलेलं कारस्थान आहे का? या आधी देखील या पद्धतीचे प्रयत्न करुन झाले आहेत. या पापाचे वाटेकरी कोण?” असा सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे.
22 Feb 2025 05:58 PM (IST)
होळी सणासाठी गावी जाणाऱ्या संख्या मोठ्या प्रमाणात असते. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीने मुंबईसह राज्यभरातील नागरिक होळीनिमित्त आपलं गाव गाठतात. मात्र, गावी जाताना या प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागतो. शिवाय, आगाऊ बुकींग करताना बस आणि ट्रेनच्या तिकीट फूल झाल्यानं या प्रवाशांना निश्चित स्थळ गाठता येत नाही. त्यामुळे प्रवाशांची होणारी ही गैरसोय दूर करण्यासाठी मध्य रेल्वेने पुढाकार घेतला आहे. याचपार्श्वभूमीवर मध्य रेल्वेनं 28 होळी स्पेशल ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
22 Feb 2025 05:38 PM (IST)
आज महाराष्ट्रातील अनेक लोक हे विदेशात राहत आहेत. अशा नागरिकांना भारतीय नागरिकांसाठी बरेच काही करण्याची इच्छा असते, त्यामुळे अशा एनआरआय लोकांना एकत्रित करून त्यांच्याकडून एकीकडे आपल्या देशात विविध विकासकामे करणे तसेच या एनआरआय मध्ये काँग्रेसची विचारधारा वाढवण्याचे काम केले जात आहे, या माध्यमातून २०२९ साली देशात काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्याच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न काँग्रेस एनआरआय सेलच्या वतीने प्रयत्न केले जातील, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनिवासी भारतीय विभागाच्या महाराष्ट्र अध्यक्ष विद्या कदम यांनी दिली.
22 Feb 2025 04:58 PM (IST)
मंत्री आशिष शेलार यांनी घेतले भराडी मातेचे दर्शन घेतले. यावेळी ते म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेच्या जीवावर ठाकरेंनी मातोश्री 1 ते मातोश्री 2 पर्यंत प्रवास केला आणि मुंबईकर नागरिक विकास कामांना मुकले. त्यामुळे मुंबईकरांची सेवा करण्याची संधी आम्हाला दे असं साकडं आशिष शेलार यांनी देवीला घातले असल्याचा टोला लगावला आहे.
22 Feb 2025 04:38 PM (IST)
अनधिकृत धार्मिक स्थळा संदर्भात आज नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मात्र त्या अगोदरच पालिका प्रशासन आणि पोलिसांनी अनधिकृत धार्मिक स्थळावर कारवाई केल्याने मोर्चा स्थगित केलाय. या ठिकाणी भाजपा आमदार देवयानी फरांदे देखील दाखल झाल्या असून प्रशासनाला चार वाजेपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. चार वाजेपर्यंत अनधिकृत दर्गा हटवावी अशी मागणी त्यांनी केली आहे नाहीतर आम्ही आमची पुढची भूमिका मांडू असा इशारा देखील देवयानी फरांदे यांनी दिला आहे.
22 Feb 2025 04:11 PM (IST)
ठाण्यातील महाराष्ट्र आरोग्य मित्र संघटनेचे कर्मचारी बेमुद संपावर गेले आहेत. काम जास्त आणि पगार कमी असल्याने या कर्मचाऱ्यांनी आंदोलन छेडले आहे.
22 Feb 2025 04:09 PM (IST)
सुरेश धस यांनी परळीमध्ये जाऊन महादेव मुंडे यांच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेतली आहे. यावेळी आमदार सुरेश धस यांनी महादेव मुंडे यांना धीर दिला. मुंडे कुटुंब यावेळी भावुक झाले होते. “महादेव मुंडे यांचा मर्डर झाला त्याठिकाणीची गाडी जाते आणि बॉडी जागेवर राहाते. भास्कर केंद्रे, सचिन सानप, गोविंद भताने या पोलिसांची वारंवार या प्रकरणात नावं येतात, या प्रकरणात पोलिसांचा हात आहे का?” असा सवाल यावेळी सुरेश धस यांनी उपस्थित केला आहे.
22 Feb 2025 03:42 PM (IST)
ठाण्यातील दिवा परिसरात ठाणे महापालिकेकडून होणार कारवाई बेकायदेशीर आणि अनधिकृत इमारती वरती होणार कारवाई आहे. दरम्यान या बाबत नागरिक आक्रमक झाले आहेत.
22 Feb 2025 03:39 PM (IST)
“महाराष्ट्रवर, मराठी माणसांवर, देशावर जेव्हा संकट आले तेव्हा मराठी साहित्यिक आणि कलाकारांनी आवाज उठवला नाही. भूमिका कधीच घेतल्या नाही. अलीकडे साहित्यिक आणि कलवतांनी भूमिका घेणे बंद केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर भटकती आत्मा अशी टीका केली होती. त्यामुळे त्या भटकती आत्मास पंतप्रधान कार्यालयाने मोदी यांच्या शेजारी कसे बसू दिले? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
22 Feb 2025 02:58 PM (IST)
केंद्रीय कृषी मंत्री आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी टाटा समूहावर जोरदार नाराजी व्यक्त केली आहे. एअर इंडियाच्या सेवांवर त्यांनी टीका करत सोशल मीडिया पोस्ट केली आहे. शिवराज सिंह चौहान यांनी विमान प्रवासामध्ये त्यांना तुटलेल्या सीटवर प्रवास करावा लागला. प्रवासादरम्यान, तुटलेल्या सीटवरुन आणि पाण्यात असलेल्या सीटवरुन प्रवास करावा लागल्यामुळे शिवराज सिंह चौहान यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आज मुझे भोपाल से दिल्ली आना था, पूसा में किसान मेले का उद्घाटन, कुरुक्षेत्र में प्राकृतिक खेती मिशन की बैठक और चंडीगढ़ में किसान संगठन के माननीय प्रतिनिधियों से चर्चा करनी है।
मैंने एयर इंडिया की फ्लाइट क्रमांक AI436 में टिकिट करवाया था, मुझे सीट क्रमांक 8C आवंटित हुई। मैं जाकर…
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) February 22, 2025
22 Feb 2025 02:14 PM (IST)
दक्षिण मुंबईतील मरीन लाईन्स परिसरातील एका निवासी इमारतीला आग लागली आहे. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. मरीन लाईन्स परिसरात गोल मशीदजवळील मरीन चेंबर ही पाच मजली निवासी इमारतीत शनिवारी दुपारी १२.३० च्या सुमारास भीषण आग लागली. गोल मशिदीजवळील प्रसिद्ध जाफर हॉटेलच्या जवळ ही इमारत आहे.
22 Feb 2025 02:02 PM (IST)
अंढेरा येथे गांज्याची शेती केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या गांज्याच्या शेतीचा एलसीबीकडून पर्दाफाश करण्यात आला. अंढेरा पोलिसांना मात्र याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे समोक आले आहे. या कारवाईमध्ये तब्बल १२ कोटींची अफूची झाडे पकडली. रात्री उशिरापर्यंत ‘एलसीबी’च्या पथकाची कारवाई सुरू होती. १५ क्विंटल ७२ किलोची अफूची झाडे जप्त करण्यात आली. ही राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे समजते.
22 Feb 2025 01:34 PM (IST)
बीड हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असलेल्या वाल्मिक कराडवरही मकोका लावण्यात आला आहे. वाल्मिक कराड सध्या तुरुंगात असला तरी दिवसेंदिवस वाल्मिक कराडचे एक एक कारनामे समोर येत आहेत. अशातचं आता संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. आरोपींना जेलमध्येही कोणीतरी जाऊन भेटत आहे, असे देखील ते म्हणाले आहेत.
22 Feb 2025 01:15 PM (IST)
नाशिक महापालिकेकडून अनधिकृत धार्मिक स्थळाचे अतिक्रमण हटवले जात आहे. त्यामुळे नाशिकमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी जमावबंदी असताना ते ठिकाणी पाहण्यासाठी आलेल्या काळाराम मंदिराचे महंत सुधीर दास यांना पोलिसांनी ताब्यात घेतसे आहे. त्यांच्यासह काही आंदोलकांनाही ताब्यात घेत पोलिसांच्या वाहनात टाकून दुसऱ्या जागेवर हलवण्यात आले आहे.
22 Feb 2025 12:52 PM (IST)
नाशिक तालुक्यातील राहुड घाटात शुक्रवारी (दि. २१) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सात ते आठ वाहनांमध्ये झालेल्या विचित्र भीषण अपघातात एक महिला ठार तर १७ जण जखमी झाले आहेत. त्यातील पाच गंभीर जखमींना नाशिक येथे हलविण्यात आले आहे. अपघातानंतर राहुड घाटात वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. चांदवड तालुक्यातील राहुड घाटात मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास कंटेनर, दोन ट्रक, दोन ते तीन कार अशा एकूण सहा ते सात वाहने एकमेकांवर आदळून अपघात झाला.
22 Feb 2025 12:36 PM (IST)
12 फेब्रुवारी रोजी सालासर युनिक रिअल्टर्सच्या कर्मचाऱ्याने मीरारोड पोलिस ठाण्यात श्री सावलिया होम्स एलएलपीचे भागीदार रोशन मालू आणि इतरांविरुद्ध जबरदस्ती कब्जा आणि अतिक्रमण प्रकरणी तक्रार दाखल केली होती. तक्रारीत नमूद केलेली जमीन सर्वे क्रमांक 478 असल्याचा दावा करण्यात आला.
22 Feb 2025 12:26 PM (IST)
कुख्यात गुंड गजानन मारणे याच्या टोळीतील मुलांकडून निरपराध मुलाला झालेल्या मारहाण प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पोलिसांच्या कामावर नाराजी व्यक्त करत ताशेरे ओढले आहेत. पुणे पोलिसांनी आत्मपरिक्षण केले पाहिजे. तसेच, पुणे पोलीस डोळे बंद करून बसलेत का अशा भाषेत त्यांनी पुणे पोलिसांना सुनावले. कोथरूड भागातील भेलकेनगर परिसरात मिरवणूकीदरम्यान एका निरपराध आयटी इंजिनिअर देवेंद्र जोग या तरुणाला गुंड गजा मारणे याच्या टोळीतील चौघांनी बेदम मारहाण केली होती
22 Feb 2025 12:09 PM (IST)
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या १९ व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांची प्रतीक्षा २४ फेब्रुवारी २०२५ रोजी संपणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील भागलपूर येथील शेतकऱ्यांना भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी अर्थसंकल्प सादर करतील आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या ज्याला पीएम किसान सन्मान निधी योजना असेही म्हटले जाते त्याचा १९ व्या हप्त्याअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २००० रुपये हस्तांतरित करतील अशी माहिती आता समोर आली आहे.
22 Feb 2025 11:46 AM (IST)
नाशिक - पुणे रोडवरील काठे गल्ली परिसरातील एक धार्मिक स्थळ चर्चेमध्ये आहे. 25 वर्ष पाठपुरावा करून ही महापालिका अनधिकृत धार्मिक स्थळ हटवित नसल्याने हिंदुत्ववादी संघटनानी आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर आता काठे गल्ली परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्याच्या कारवाईला महापालिका प्रशासनाकडून सुरुवात झाली आहे. हे अनाधिकृत धार्मिक स्थळ काढले नाही तर सकल हिंदू समाज आज बजरंग बलीची प्राणप्रतिष्ठापना करणार आणि यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला महापालिका जबाबदार असेल, असे भाजपा आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी इशारा दिला.
22 Feb 2025 11:28 AM (IST)
कन्नड कार्यकर्त्यानी मराठी एसटी आणि चालकाला काळे फासल्याने तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकामध्ये होणारी एसटीची वाहतूक तात्पुरती थांबवली आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कर्नाटक सरकारच्या विरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. सकाळी दहा नंतर कोल्हापुरातून कर्नाटकला जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे
22 Feb 2025 11:26 AM (IST)
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मनसे नेते राज ठाकरे यांची भेट घेतली. दादरमधील राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट झाली. अचानक झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले. याबाबत मंत्री उदय सामंत म्हणाले की, दिल्लीत मराठी साहित्य संमेलन सुरु आहे. त्या बद्दल गप्पा मारल्या. राजकीय कुठचीही चर्चा झाली नाही. या भेटीला कोणी राजकीय स्पर्श करु नये. असे मत उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे.
22 Feb 2025 11:03 AM (IST)
मुंबईत बीएमसीने प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) पासून बनवलेल्या मूर्ती बनवण्यावर आणि विसर्जनावर बंदी घालण्यासाठी ‘निगेटिव्ह लिस्ट’मध्ये टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कडक आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पासून बनवलेल्या गणेशमूर्तींचे नैसर्गिक ठिकाणी विसर्जन करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतर आता बीएमसी देखील अॅक्शन मोडवर आली आहे
22 Feb 2025 10:40 AM (IST)
भारतीय वंशाचे काश पटेल यांनी शनिवारी (22 फेब्रुवारी) भगवद्गीतेवर हात ठेवून फेडर ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशम (FBI) च्या संचालक पदाची शपथ घेतली. ते या प्रतिष्ठित एजन्सीचे नेतृत्व करणारे नववे अधिकारी ठरले आहेत. शपथविधी सोहळा वॉशिंग्टन डी.सी. येथील आयझेनहॉवर एक्झिक्युटिव्ह ऑफिस बिल्डिंग (EEOB) येथे पार पडला. श्रीमत भगवतगीतेवर हात ठेवून शपथ घेतल्यानंतर त्यांनी म्हटले की, “मी अमेरिकन स्वप्न जगत आहे. जो कोणी मानतो की अमेरिकन स्वप्न आता संपले आहे, त्याने आजच्या सोहळ्याकडे पाहावे.”
22 Feb 2025 10:38 AM (IST)
भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र त्यांनी मध्यंतरी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेत चार तास बंद दाराआड चर्चा केली. यामुळे सुरेश धस यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. यानंतर आता पहिल्यांदाच आमदार सुरेश धस हे मस्साजोग गावामध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आहे.