Maharashtra Breaking News
15 Oct 2025 12:30 PM (IST)
शेंद्रे तालुका सातारा येथील ॲल्युमिनियम फाउंड्री कंपनीमध्ये ॲल्युमिनियमच्या 69 विटा चोरून नेणाऱ्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने गस्तीदरम्यान चौकशी करून ताब्यात घेतले. याप्रकरणी अन्य दोन संशयितांपैकी एकाला पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून एकूण गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व अल्युमिनियमच्या विटा असा १ लाख ८७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
15 Oct 2025 12:20 PM (IST)
महाविकास आघाडी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या भेटीला गेले आहे. राज ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्येही मतदारयाद्यांचा मुद्दा गाजणार आहे.
15 Oct 2025 11:24 AM (IST)
महाराष्ट्रातील गडचिरोली येथील नक्षलवादी महाराष्ट्र पोलिसांसमोर शरण आले आहे. नक्षल कमांडर मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ भूपती याने गडचिरोली पोलीस मुख्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले, जवळपास 60 नक्षलवाद्यांनी आज आत्मसमर्पण केले. त्यांनी आपली शस्त्रे खाली ठेवून संविधान हातामध्ये घेतले आहेत.
15 Oct 2025 11:05 AM (IST)
देशामध्ये असा एकही व्यक्ती सापडणार नाही ज्याला ए. पी. जे. अब्दुल कलाम माहिती नाहीत. एरोस्पेस शास्त्रज्ञ, भारताचे माजी राष्ट्रपती आणि सर्वांच्या जिव्हाळ्याची व्यक्ती म्हणजे ए. पी. जे. अब्दुल कलाम. त्यांना ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाते, कारण त्यांनी भारताच्या क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र कार्यक्रमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये प्रमुख पदे भूषवली. आजच्या दिवशी 1931 साली रामेश्वरम येथे त्यांचा जन्म झाला. त्यांच्या कार्यासाठी त्यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 27 जुलै 2015 रोजी त्यांचा मृत्यू झाला. पण आजही प्रत्येक भारतीयांच्या मनात ए. पी. जे. अब्दुल कलाम जीवंत आहेत.
15 Oct 2025 11:00 AM (IST)
सर्वच महिलांना आपली त्वचा कायमच सुंदर आणि देखणी हवी असते. त्वचेची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या फेसपॅकचा वापर केला जातो. त्यामुळे तुम्ही सुद्धा घरच्या घरी बेसन हळदीचा फेसपॅक बनवून त्वचेची काळजी घेऊ शकता. यासाठी मोठ्या वाटीमध्ये बेसन, हळद, दही घेऊन मिक्स करून घ्या. तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसाच ठेवा. यामुळे त्वचेवर चमकदार ग्लो येईल आणि त्वचा अधिक सुंदर दिसेल. बेसन फेसपॅक लावल्यामुळे त्वचा मुलायम आणि सुंदर होईल.जास्त वेळ जागरण केल्यामुळे त्वचा अधिकच निस्तेज होऊन जाते आणि काळे डाग येऊ लागतात. त्यामुळे ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे आवश्यक आहे. झोपल्यामुळे शरीरासोबतच त्वचेला सुद्धा अनेक फायदे होतात.
15 Oct 2025 10:50 AM (IST)
सोलापूर शहरातील न्यू बुधवार पेठ परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीची चाकूने वार करून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मृत महिलेचं नाव यशोदा सुहास सिद्धगणेश, तर आरोपीचं नाव सुहास तुकाराम सिद्धगणेश असं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
15 Oct 2025 10:40 AM (IST)
सध्या जिल्ह्यात ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ हा स्लोगन जोरदार व्हायरल होत आहे. संपूर्ण नाशिक जिल्हा कायदा व सुव्यवस्थेचा जिल्हा म्हणून ओळख निर्माण करून पाहत आहे. मालेगाव पोलिसांनी देखील नाशिकपाठोपाठ ‘अॅक्शन मोड’वर येत कारवाईला सुरुवात केली. त्यानुसार, शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या वीस जणांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली.
15 Oct 2025 10:35 AM (IST)
15 Oct 2025 10:25 AM (IST)
हारमध्ये एनडीएची सत्ता आल्यास कोण मुख्यमंत्री होणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घालणार का हे पहावे लागणार आहे. महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्ली यांच्या विधानसभा निवडणुका भाजपने जिंकल्या आहेत. दरम्यान या तीनही राज्यांमध्ये मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवताना राष्ट्रीय स्वयंमसेवक संघाची भूमिका महत्वाची ठरली आहे. महाराष्ट्रात महायुती जिंकल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मुख्यमंत्री म्हणून संघाने देखील मान्यता दिल्याचे समोर आले होते. दरम्यान यंदा एनडीए जिंकल्यास नितीश कुमार यांचा मुख्यमंत्रीपदाचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.
15 Oct 2025 10:15 AM (IST)
एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘प्रेमाची गोष्ट २’ दिवाळीच्या शुभमुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येत असतानाच, या चित्रपटातील तिसरं गाणं ‘दिसला गं बाई दिसला २.०’ सध्या प्रचंड गाजतं आहे. आधीच ट्रेंडिंगमध्ये असलेल्या पहिल्या दोन गाण्यांनंतर हे गाणंही रसिकांच्या प्लेलिस्टमध्ये झळकू लागलं आहे. ‘दिसला गं बाई दिसला २.०’ या नव्या आवृत्तीने जुन्या आठवणींना नवा झगमगाट दिला आहे. गौतमी पाटीलच्या अफाट एनर्जीने आणि ललित प्रभाकरच्या जबरदस्त साथीनं या गाण्याला एक वेगळंच रूप मिळालं आहे.
15 Oct 2025 10:10 AM (IST)
अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवरील स्पिन बोल्दाकमध्ये आज पहाटे सुमारास तालिबानी आणि पाकिस्तानी सैन्यात जोरदार चकमक झाली. स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, हा संघर्ष पहाटे साडेचार वाजता सुरू झाला. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या सीमा व्हिडिओमध्ये स्पिन बोल्दाक-चमन सीमा क्रॉसिंगवर घडलेल्या चकमकीचे दृश्य दिसते.
स्पिन बोल्दाक हे क्षेत्र उत्तरेला कंधार शहराशी आणि दक्षिणेला पाकिस्तानमधील चमन व क्वेटाशी महामार्गाने जोडलेले आहे. पश्चिमेकडील चमन सीमा क्रॉसिंग शहराच्या आग्नेयेस स्थित आहे. अफगाण तालिबानच्या दाव्यानुसार, पाकिस्तानी सैन्याशी झालेल्या चकमकीनंतर १५ मिनिटांच्या आत त्यांनी पाकिस्तानी जवानांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले आणि त्यांची शस्त्रे जप्त केली.
15 Oct 2025 10:05 AM (IST)
गोव्याचे कृषीमंत्री आणि माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे आज वयाच्या ७९व्या वर्षी निधन झाले. कुटुंबातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना घरी असताना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तत्काळ फोंडा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच पहाटे १ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
15 Oct 2025 09:59 AM (IST)
अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे लिखित ‘मना’चे श्लोक आता नव्या नावासह चित्रपटगृहात रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचे नवे नाव निर्मात्यांनी अखेर जाहीर केले आहे. चित्रपटाला नवे नाव ‘तू बोल ना’ हे देण्यात आले आहेत. तसेच आता नव्या नावानं, नव्या उत्साहात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर हा चित्रपट येत्या गुरुवारी, १६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे.
15 Oct 2025 09:56 AM (IST)
शहरं | 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर | 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर | 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर |
---|---|---|---|
चेन्नई | ₹1,17,660 | ₹1,28,360 | ₹96,270 |
बंगळुरु | ₹1,17,660 | ₹1,28,360 | ₹96,270 |
पुणे | ₹1,17,660 | ₹1,28,360 | ₹96,270 |
केरळ | ₹1,17,660 | ₹1,28,360 | ₹96,270 |
कोलकाता | ₹1,17,660 | ₹1,28,360 | ₹96,270 |
मुंबई | ₹1,17,660 | ₹1,28,360 | ₹96,270 |
हैद्राबाद | ₹1,17,660 | ₹1,28,360 | ₹96,270 |
नागपूर | ₹1,17,660 | ₹1,28,360 | ₹96,270 |
लखनौ | ₹1,18,300 | ₹1,29,040 | ₹97,120 |
जयपूर | ₹1,18,300 | ₹1,29,040 | ₹97,120 |
चंदीगड | ₹1,18,300 | ₹1,29,040 | ₹97,120 |
दिल्ली | ₹1,18,300 | ₹1,29,040 | ₹97,120 |
नाशिक | ₹1,18,180 | ₹1,28,920 | ₹97,000 |
सुरत | ₹1,18,200 | ₹1,28,940 | ₹97,020 |
15 Oct 2025 09:52 AM (IST)
तब्बल ४८ वर्षांपूर्वीच्या गुन्ह्याचा थरारक शेवट अखेर झाला आहे. १९७७ मध्ये झालेल्या हत्येच्या प्रयत्नाच्या प्रकरणात ७१ वर्षीय चंद्रशेखर मधुकर कालेकर यांना अखेर अटक करण्यात आली आहे. १९७७ साली मुंबईतील कुलाबा परिसरात कालेकर यांचा एका महिलेशी वाद झाला होता. रागाच्या भरात त्यांनी त्या महिलेला चाकूने वार केले. या प्रकरणी भा. दं. वि. कलम 307 अंतर्गत हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यांना तेव्हा अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं, मात्र नंतर त्यांनी कोर्टाच्या तारखांना हजेरी लावणं बंद केलं आणि अखेर फरार घोषित करण्यात आलं.
15 Oct 2025 09:50 AM (IST)
बुधवार, 15 ऑक्टोबरपासून देशांतर्गत क्रिकेट हंगामातील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा रणजी ट्रॉफी 2025 रंगणार आहे. या वर्षी स्पर्धेत एकूण 38 संघ भाग घेणार असून, त्यातील 36 संघ एलीट ग्रुपमध्ये तर 6 संघ प्लेट ग्रुपमध्ये सहभागी आहेत. पहिल्या फेरीत एकूण 19 सामने होणार असून, संपूर्ण स्पर्धा दोन टप्प्यांमध्ये 138 सामन्यांपर्यंत नेण्यात आली आहे. गतविजेता विदर्भ आपल्या ट्रॉफी कायम राखण्याच्या निर्धाराने मैदानात उतरलेला आहे. इराणी ट्रॉफी जिंकण्याने विदर्भाचा आत्मविश्वास दुणावलेला आहे, त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असेल. विदर्भचा पहिला सामना नागालँडविरुद्ध होणार आहे.
15 Oct 2025 09:45 AM (IST)
ऋषभ शेट्टीच्या “कांतारा चॅप्टर १” या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर अद्भुत कामगिरी केली आहे. या चित्रपटाने अनेक मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेतच, पण आता तो बॉक्स ऑफिसवर असा विक्रम प्रस्थापित करण्याच्या मार्गावर आहे जो यापूर्वी फक्त एका कन्नड चित्रपटाने मिळवला होता.
15 Oct 2025 09:39 AM (IST)
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, पक्षांतरांची लाट आणखी वाढण्याची शक्यता आहे. महायुतीत आपला पक्ष बळकट करण्यासाठी प्रवेशयात्रांची चढाओढ सुरू झाली आहे. यवतमाळ-वणीमध्ये शिवसेना (शिंदे गट) ने भाजपला मोठा धक्का दिला असून, भाजप नेते विजय चोरडीया आणि ऍड. कुणाल चोरडीया यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. या घडामोडीमुळे आगामी निवडणुकांत भाजप अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.
15 Oct 2025 09:35 AM (IST)
नेरुळ येथील मंजुळा बिल्डिंग परिसरात गेल्या पाच दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सायंकाळी पाणीपुरवठा होत नसल्याने परिसरातील नागरिकांचे हाल होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. वारंवार तक्रारी करूनही महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
15 Oct 2025 09:28 AM (IST)
जैसलमेर : राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात धावत्या एसी बसमध्ये अचानक भीषण आग लागली. धावत्या बसला आग लागल्याने प्रवाशांना बाहेर पडणे अवघड झाले होते. यातच 20 पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला. काही जणांनी खिडक्या तोडून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अनेकजण यशस्वी झाले. दरम्यान, आग लागल्यानंतर बसचे दरवाजे बंद होते, त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. या बसमध्ये एकूण 57 प्रवासी असल्याची माहिती सध्या दिली जात आहे.
15 Oct 2025 09:18 AM (IST)
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे घडत आहेत. असे असताना आता जेवणात बनवलेल्या भाजीत शाम्पूचे पाणी का टाकले, अशी विचारणा केल्याचा राग आल्याने एका मजुराने आपल्या सोबत वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय मजुराच्या डोक्यात वार करून खून केला. ही धक्कादायक घटना नाशिकच्या नांदूरशिंगोटे येथे घडली.
15 Oct 2025 09:15 AM (IST)
तब्बल ४८ वर्षांपूर्वीच्या गुन्ह्याचा थरारक शेवट अखेर झाला आहे. १९७७ मध्ये झालेल्या हत्येच्या प्रयत्नाच्या प्रकरणात ७१ वर्षीय चंद्रशेखर मधुकर कालेकर यांना अखेर अटक करण्यात आली आहे. १९७७ साली मुंबईतील कुलाबा परिसरात कालेकर यांचा एका महिलेशी वाद झाला होता. रागाच्या भरात त्यांनी त्या महिलेला चाकूने वार केले. या प्रकरणी भा. दं. वि. कलम 307 अंतर्गत हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यांना तेव्हा अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं, मात्र नंतर त्यांनी कोर्टाच्या तारखांना हजेरी लावणं बंद केलं आणि अखेर फरार घोषित करण्यात आलं.
15 Oct 2025 09:08 AM (IST)
गोव्याचे कृषीमंत्री आणि माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे आज वयाच्या ७९व्या वर्षी निधन झाले. कुटुंबातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना घरी असताना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तत्काळ फोंडा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच पहाटे १ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
रवी नाईक यांचे घर गोव्याची राजधानी पणजीपासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर आहे. त्यांच्या निधनाने गोवा तसेच राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक सून आणि तीन नातवंडे असा परिवार आहे. अंत्यसंस्कार आज दुपारी ३ वाजता पार पडणार आहेत.
15 Oct 2025 09:08 AM (IST)
जागतिक बाजारातील मिश्र संकेत आणि गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड यांनी दिलेल्या संकेतांचा विचार करता आज १५ ऑक्टोबर रोजी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, हिरव्या रंगात उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,२८७ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ८१ अंकांनी जास्त होता.
15 Oct 2025 09:01 AM (IST)
लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली असून, त्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्यातील पूरग्रस्त २९ जिल्ह्यांतील लाभार्थी महिलांना ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १५ दिवसांची अतिरिक्त मुदत देण्यात आली आहे.आदिती तटकरे म्हणाल्या की, या कालावधीत महिलांनी नियमानुसार ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. पूर्वी या योजनेची अंतिम मुदत नोव्हेंबरपर्यंत निश्चित करण्यात आली होती, मात्र पूरग्रस्त भागातील महिलांना अडचणींचा विचार करून सरकारने ही सवलत दिली आहे.
Marathi Breaking news live updates: अनेक दिवस सतत कोसळणाऱ्या पावसाने अखेर काही दिवसांपासून विश्रांती घेतल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला होता. मात्र, सणासुदीचा काळ पुन्हा एकदा पावसात भिजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिवाळीला अवघे दोन ते चार दिवस उरले असतानाच राज्यात पुन्हा पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
गणपती, नवरात्र आणि दसऱ्यानंतर आता दिवाळीतही महाराष्ट्रातील नागरिकांना छत्र्या घेऊनच सण साजरा करावा लागू शकतो. हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवसांत राज्याच्या काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. तथापि, उर्वरित भागांत उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता असल्याचेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.