Photo Credit- Team Navrashtra
Marathi Breaking news live updates: उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अध्यक्ष अजित पवार कराड दौऱ्यावर असून, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी त्यांनी अभिवादन केले. मात्र, या दौऱ्यात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या कोयना बँकेत भेट दिली आहे. त्यामुळे उदयसिंह पाटील-उंडाळकर लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.
12 Mar 2025 07:26 PM (IST)
सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. रेडी रेकनर दरासंदर्भात सध्या संपूर्ण राज्यात सर्वेक्षण सुरू आहे. मागील काही वर्षांमध्ये काही भागांमध्ये रेडी रेकनर दर वाढले, तर काही ठिकाणी दर स्थिर ठेवण्यात आले. 2023-24 आणि 2024-25 मध्ये कोणतीही दरवाढ झालेली नाही. काही माध्यमांमध्ये 10-15 टक्के दरवाढ होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र त्या निराधार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत सांगितले. विधानपरिषद सदस्य सर्वश्री सुनील शिंदे, ॲड.अनिल परब, सचिन अहिर यांनी मालमत्तांच्या खरेदी विक्री वेळी जमा होणाऱ्या मुद्रांक शुल्क संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.
12 Mar 2025 06:56 PM (IST)
पुढील आर्थिक वर्षात (२०२५-२६) भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) विकास दर ६.५ टक्क्यांपेक्षा जास्त असेल. मूडीज रेटिंग्जने हा अंदाज लावला आहे. चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ६.३ टक्के दराने वाढण्याचा अंदाज आहे. सरकारी भांडवली खर्चात वाढ, कर कपात आणि कमी व्याजदरांमुळे वाढत्या वापरामुळे पुढील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था जलद गतीने वाढेल, असे मूडीजने म्हटले आहे.
12 Mar 2025 06:23 PM (IST)
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचं वारं असतानाही भाजपने कॉंग्रेसला धक्का देत विजय मिळवला होता. त्यानंतर आता पुन्हा पराभवाची धूळ चारली आहे. १० महापालिकांच्या निवडणुकीत ९ ठिकाणी विजय मिळवला आहे. कुरुक्षेत्र, करनाल, फरिदाबाद, गुरुग्राम या ठिकाणच्या निवडणुकीत भाजपाने भगवा फडकवला आहे. सात महापालिकांसाठी महापौर आणि प्रभाग सदस्य, चार नगरपरिषदा आणि २१ पंचायत समितींसाठी अध्यक्ष तसंच सदस्य निवडीसाठी ही निवडणूक घेण्यात आली होती. सोहना, असंध आणि इस्माइलबाद या तीन ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी पोटनिवडणूक पार पडली.
12 Mar 2025 05:27 PM (IST)
स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या तरुणीवरील बलात्कारप्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. अजय मिसार यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव पुणे पोलिसांनी राज्य सरकारकडे पाठवला आहे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जाणार आहेत. त्यादृष्टीने पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास व इतर नियोजन केले जात आहे.
12 Mar 2025 04:36 PM (IST)
पुण्यातील स्वारगेट बससथनकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये काही दिवसांपूर्वीच धक्कादायक घटना घडली होती. बसस्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला होता. या घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला अटक केल्यानंतर १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. गुरुवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयासमोर उभे केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
12 Mar 2025 03:37 PM (IST)
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. 17 मार्चपर्यंत अटक करू करू नये, असे कोर्टाने म्हटले असून पुढील सुनावणी 17 मार्चला होणार आहे. कोरटकर हजर राहावेत की नको, यावर आज सुनावणी झाली. पोलिसांची विनंती कोर्टाने फेटाळली आहे.
12 Mar 2025 03:36 PM (IST)
स्वप्ननगरी मुंबईत गुन्हेगारीचा वाढता आलेख पोलिसांसाठी चिंतेचा विषय आहे. २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये आयपीसी आणि बीएनएस अंतर्गत नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या संख्येत १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
12 Mar 2025 03:13 PM (IST)
आशिया खंडातील सर्वात मोठी असलेल्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत उद्यापासून (रविवार) सलग चार दिवस बंद राहणार आहे. लासलगाव व्यापारी संघटनेने तसे पत्र बाजार समितीला दिले आहे. होळी निमित्ताने बाजार समिती बंद राहणार असून सोमवारपासून बाजार समितीचे व्यवहार पुन्हा सुरू होतील.
12 Mar 2025 02:45 PM (IST)
आमदार सुरेश धस यांचा गुंड कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या याचा जामीन अर्ज वकिलांनी मागे घेतला आहे. पोलिसांनी खोक्याला प्रयागराजमधून अटक करण्यात आल्याने वकिलांनी अर्ज मागे घेतला. दरम्यान, खोक्याला पुढील एक-दोन दिवसांत बीडमध्ये आणले जाणार आहे.
12 Mar 2025 02:34 PM (IST)
राज्याच्या अर्थसंकल्पात निधी वाटपावरून महायुतीतील असमतोल समोर आला आहे. भाजपच्या मंत्र्यांच्या विभागांना सर्वाधिक निधी देण्यात आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या वाट्याला तुलनेने कमी निधी आल्याने महायुतीतील अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे.
12 Mar 2025 02:06 PM (IST)
OPPO Reno 13 स्मार्टफोनचा नवीन कलर व्हेरिअंट 12GB + 512GB आणि 8GB + 256GB या दोन स्टोरेज पर्यायात लाँच करण्यात आला आहे. OPPO कंपनीने OPPO Reno 13 स्मार्टफोन स्काय ब्लू कलर ऑप्शनमध्ये लाँच केला आहे. स्मार्टफोनच्या 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत भारतात 43,999 रुपये आणि 8GB + 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 39,999 रुपये आहे. OPPO Reno 13 स्मार्टफोनमध्ये 6.59-इंचाचा 1.5K मायक्रो-कर्व्हड AMOLED डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि टच सॅम्पलिंग रेट 240Hz आहे. या फोनचा डिस्प्ले Corning Gorilla Gass 7i प्रोटेक्शनला सपोर्ट करतो.
12 Mar 2025 01:35 PM (IST)
आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांचा खोटा पीए बनून जीवनाचा आनंद घेणाऱ्या भामट्याला उत्तराखंडमधील हरिद्वार पोलिसांनी अटक केली आहे. अमरिंदर सिंग असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक बनावट बीसीसीआय कार्डही जप्त केले आहे.
12 Mar 2025 01:23 PM (IST)
रस्ते अपघातांना आळा घालण्यासह बेशिस्त चालकांवर कडक कारवाई करण्यासाठी सरसकट सर्व चालकांची इग्ज टेस्ट करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. त्यासाठी नवीन उपकरणे परिवहन विभाग खरेदी करणार आहे. अपघातामध्ये घट होण्यासंदर्भात करण्यात येणाऱ्या उपाययोजना या संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना परिवहन विभागातर्फे लवकरच चालकांचे ड्रग्ज टेस्टिंग सुरू करण्यात येत असल्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले, अशा प्रकारे चालकांची ड्रग्ज टेस्टिंग करण्याचा देशात हा पहिलाच प्रयोग असणार आहे.
12 Mar 2025 12:37 PM (IST)
बीड : सतीश भोसले उर्फ खोक्या याचा जामीन अर्ज वकिलाने मागे घेतला. खोक्याला पोलिसांनी अटक केल्यामुळे अर्ज मागे घेतला. ज्यावेळी बीड पोलीस बीड कोर्टामध्ये सादर करतील, त्यावेळेस पुन्हा नव्याने अर्ज केला जाणार असल्याची माहिती खोक्याचे वकील शशिकांत सावंत यांनी दिली.
12 Mar 2025 12:33 PM (IST)
रितेश-जिनेलिया म्हणजे, पॉवर कपल असंही म्हटलं जातं. पण, सध्या हे दोघेही खूप चर्चेत आहेत याचं कारण असं, की आयफा अवॉर्ड्स 2019 मधला तो व्हिडीओ जो खूप चर्चेत होता. या व्हिडीओवरुन बराच काळ, अगदी आजही चर्चा रंगतात. याचदरम्यान आता या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आता स्वतः जिनेलिया देशमुखने आपले स्वतःचे मत स्पष्ट केले आहे.
12 Mar 2025 12:03 PM (IST)
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज पहिली सुनावणी पार पडली. यावेळी त्यांचे बंधू धनंजय देशमुख हेदेखील तिथे उपस्थित होते. यानंतर पुढील सुनावणी 26 मार्चला होणार असल्याची माहिती आहे.
12 Mar 2025 11:41 AM (IST)
संतोष देशमुख हत्या प्रकऱणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकमधील गंगापूर भागातील स्थानिक नागरिकांनी त्याला पाहिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर नाशिक पोलीस दल अलर्ट मोडवर आले असून नाशिकमध्ये त्याचा शोध सुरू झाला आहे.
12 Mar 2025 11:38 AM (IST)
रस्ते अपघातांना आळा घालण्यासह बेशिस्त चालकांवर कडक कारवाई करण्यासाठी सरसकट सर्व चालकांची इग्ज टेस्ट करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. त्यासाठी नवीन उपकरणे परिवहन विभाग खरेदी करणार आहे. अपघातामध्ये घट होण्यासंदर्भात करण्यात येणाऱ्या उपाययोजना या संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना परिवहन विभागातर्फे लवकरच चालकांचे ड्रग्ज टेस्टिंग सुरू करण्यात येत असल्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले, अशा प्रकारे चालकांची ड्रग्ज टेस्टिंग करण्याचा देशात हा पहिलाच प्रयोग असणार आहे.
12 Mar 2025 11:37 AM (IST)
दोन दिवसावर होळीचा सण येऊन ठेपला आहे.रंगांची उधळण करण्यासाठी नागरिक उत्साहित आहे.बाजार पेठाही रंगांनी सजल्या आहेत.नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात होळीचे अनेक रंग आले असून नागरिक खरेदी करत आहेत. मात्र मागच्या वेळी पेक्षा यावर्षी नागरिकांचा प्रतिसाद हवा तसा नसल्याचे व्यापारी सांगत आहेत. तर रंगांच्या दरात अल्प वाढ झाल्याने पुढील दोन दिवसात नागरिक मोठ्या प्रमाणात रंग खरेदी करणार असल्याचे व्यापारी सांगत असून,बाजारात कोणतेही बनावट अथवा शारीरिक व्याधी होणारे रंग नसून नैसर्गिक रंग विक्रीसाठी आणल्याचे व्यापारी सांगत आहेत.त्यामुळे यावर्षी मोठ्या उत्साहात आणि आनंदात होळीचा सण साजरा होणार आहे.
12 Mar 2025 11:34 AM (IST)
12 मार्च रोजी आज IRCTC आज वेबसाईट आणि अॅप आज अचानक डाऊन झाला आहे. आज सकाळी तात्काळ तिकीट बुक करताना युजर्सना ही समस्या उद्भवली. आउटेज ट्रॅकिंग वेबसाइट डाउनडिटेक्टरनुसार, IRCTC सेवांमध्ये व्यत्ययाबद्दलच्या तक्रारी सकाळी 8 वाजल्यापासून येऊ लागल्या आणि सकाळी 8.20 वाजता त्यात मोठी वाढ दिसून आली. येथे तक्रार करणाऱ्या बहुतेक युजर्सनी सांगितले की त्यांना अॅपमध्ये समस्या येत आहेत, तर काहींनी वेबसाइट डाउन असल्याचे सांगितले. अॅप आणि वेबसाइट डाउन झाल्याची तक्रार करत याचा स्क्रीनशॉट देखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
12 Mar 2025 11:20 AM (IST)
धर्मासाठी ज्यांनी बलिदान दिले आणि आम्हाला हिंदू म्हणून जगण्याचा अधिकार दिला त्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे या भूमीत भव्य स्मारक करण्यात येईल, हा महायुती सरकारचा निर्धार आहे आणि सारे जग या स्मारकासमोर नतमस्तक होईल, यातून पुढच्या पिढ्या प्रेरणा घेतील असे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले. तर हिंदू धर्माकडे जो वाकड्या नजरेने पाहील त्याला तिथेच ठेचले जाईल हीच आमच्या महाराजांची शिकवण असून छत्रपती संभाजी नगर येथील स्वराज्यातील काळा ठिबका लवकरच हटवला जाईल असेही वक्तव्य त्यांनी केले.
12 Mar 2025 10:44 AM (IST)
गुंड सतीश भोसलेला अटक
12 Mar 2025 10:25 AM (IST)
मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी हिंदू समाजातील खाटीकांना "मल्हार सर्टिफिकेट" देण्याचा निर्णय घेतला आहे. मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉमच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. मात्र, जेजुरी देवस्थानचे विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी या योजनेच्या नावावर आक्षेप घेत त्वरीत नाव बदलण्याची मागणी केली आहे. त्यांनी मंत्री राणेंना पाठवलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, श्री मल्हार म्हणजे खंडोबा हे महाराष्ट्राचे पूज्य दैवत असून ते पूर्णपणे शाकाहारी आहे. त्यामुळे या नावाचा मटण व्यवसायाशी कोणताही संबंध नाही आणि योजनेचे नाव बदलावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.
12 Mar 2025 10:12 AM (IST)
11 मार्च 2025 रोजी भारतात iQOO Neo 10R स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. या हँडसेटमध्ये 1.5K रिझोल्यूशनसह AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे जो 120Hz पर्यंतच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. iQOO ने लाँच केलेल्या या नवीन डिव्हाईसमध्ये IP65 डस्ट आणि स्प्लॅश-रेसिस्टेंट बिल्ड आहे. iQOO Neo 10R मध्ये 50-मेगापिक्सेलचा ड्युअल रियर कॅमेरा युनिट आहे. स्मार्टफोनच्या iQOO Neo 10R च्या 8GB + 128GB व्हर्जनची किंमत 24,999 रुपये आणि 8GB + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 26,999 रुपये आणि फोनच्या 12GB + 256GB व्हर्जनची किंमत 28,999 रुपये आहे.
12 Mar 2025 10:00 AM (IST)
स्मार्टफोन कंपनी Xiaomi ने त्यांची नवीन स्मार्टफोन सीरिज भारतात लाँच केली आहे. या सीरिजअंतर्गत कंपनीने Xiaomi 15 आणि Xiaomi 15 Ultra हे दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. कंपनीने लाँच केलेल्या या दोन्ही स्मार्टफोनमध्ये स्मार्टफोन क्वालकॉमचे लेटेस्ट Snapdragon 8 Elite चिपसेट, Leica कॅमेरा, AI फीचर्स देण्यात आले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन चीनमध्ये देखील लाँच करण्यात आले आहेत. Xiaomi 15 स्मार्टफोन भारतात 64,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. Xiaomi 15 Ultra स्मार्टफोन 1,09,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे.
12 Mar 2025 09:44 AM (IST)
अटक टाळण्यासाठी जामिनासाठी प्रयत्नशील असलेल्या सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. शिरूर कासार पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गेल्या १५ ते २० दिवसांत त्याच्यावर तीन गुन्हे नोंदवले गेले असून, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर त्याच्याविरोधात NDPS कायद्याच्या कलम २० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.