Maharashtra Breaking News
22 Nov 2025 09:45 AM (IST)
Today’s Gold Rate: भारतात 22 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,397 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,364 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,298 रुपये आहे. भारतात 22 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,13,640 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,23,970 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 92,980 रुपये आहे. भारतात 22 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 160.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,60,900 रुपये आहे.
22 Nov 2025 09:41 AM (IST)
22 Nov 2025 09:38 AM (IST)
जर एखाद्या रात्री अचानक WhatsApp वर तुम्हाला मेसेज आला की Hi, तुम्हाला जॉब मिळाला आहे… तर? अशा परिस्थितीतत तुमचा मोबाईल नंबर त्यांच्याकडे कसा गेला, हाच प्रश्न तुमच्यासमोर असेल. हे ऐकण्यासाठी किंवा वाचण्यासाठी अगदी सामान्य वाटत असलं तरी देखील याचा मोठा परिणाम होऊ शकतो. कारण हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. जर तुमचा WhatsApp नंबर लीक झाला किंवा एकाद्या चुकीच्या व्यक्ती हाती पडला तर तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं. आता असंच झालं आहे. संपूर्ण WhatsApp मेंबर डायरेक्टरी डार्क वेबवर विकली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
वाचा सविस्तर- WhatsApp Data Leak: तुमचा नंबर लीक नाही झाला ना? सर्वच भारतीयांचा व्हॉट्सअॅप डेटा धोक्यात, अशी करा तुमची सुरक्षा
22 Nov 2025 09:37 AM (IST)
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दोन सामन्यांची मालिका सुरु आहे, या मालिकेच्या दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाली आहे. या मालिकेचा दुसरा सामना हा गुवाहाटी येथे खेळवला जात आहे. जर तुम्ही कसोटी क्रिकेटचे चाहते असाल, तर तुम्ही कदाचित हे लक्षात घेतले असेल की पहिल्या सत्रानंतर दुपारचे जेवण दिले जाते आणि गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्यांमध्ये, पहिल्या सत्रानंतर प्रवासाचा ब्रेक किंवा चहाचा ब्रेक घेतला जातो, तर दुसरा ब्रेक डिनर ब्रेक असतो. तथापि, पारंपारिक कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच, आजपासून, २२ नोव्हेंबरपासून, पहिल्या सत्रानंतर चहाचा ब्रेक आणि दुसऱ्या सत्रानंतर दुपारचे जेवणाचा ब्रेक घेतला जाईल.
वाचा सविस्तर- IND vs SA : कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच दुपारच्या जेवणापूर्वी चहापानाचा ब्रेक, सामन्यांच्या वेळेतही करण्यात आला बदल
22 Nov 2025 09:34 AM (IST)
जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu & Kashmir) पुन्हा एकदा दहशतीची सावट दाटू लागली आहे. ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) आणि पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने (Pakistan) भारताविरुद्ध पुन्हा मोठा कट रचल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. विशेषतः दिल्लीसारख्या आत्मघातकी बॉम्बस्फोटांचे मॉडेल आता काश्मीरमध्ये वापरले जाऊ शकते, असा गंभीर इशारा देण्यात आला आहे. चालत्या वाहनांत IED लावून नागरीक आणि सुरक्षा दलांना लक्ष्य करण्याचा पाकिस्तानचा डाव असल्याचे उघड झाले आहे.
22 Nov 2025 09:29 AM (IST)
कपडे वाळवताना अचानक एका महिलेला विजेचा जोरदार धक्का बसला. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात तिच्या मुलालाही विजेचा धक्का बसला. यात माय-लेकाचा होरपळून जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी (दि.21) सकाळच्या सुमारास खापरखेडा येथील दहेगाव रोडवरील जयभोलेनगरात घडली. निर्मला उत्तम सोनटक्के (वय ५१) आणि मुलगा लोकेश सोनटक्के (वय ३१) असे यामध्ये मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. लोकेश हा भानेगाव खुल्या कोळसा खाणीत कंत्राटदारीवर काम करत होता. गुरुवारी रात्रीची ड्युटी करून तो सकाळी घरी येऊन झोपला होता. नेहमीप्रमाणे आई निर्मला अंघोळीनंतर लोखंडी तारेवर कपडे वाळवत होत्या. या लोखंडी तारेच्या अगदी वरूनच वीजवाहिनी गेली आहे.
22 Nov 2025 09:28 AM (IST)
रायझिंग स्टार्स आशिया कपच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये भारत अ संघ सुपर ओव्हरमध्ये पराभूत झाला. बांगलादेश अ संघाने विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशीला सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी पाठवण्यात आले नाही. कर्णधार जितेश शर्माने सामन्यानंतर पराभवाचे कारण स्पष्ट केले. शुक्रवारी, २१ नोव्हेंबर रोजी दोहा येथे झालेल्या सुपर ओव्हरमध्ये बांगलादेशकडून पराभव पत्करल्यानंतर भारत अ संघ स्पर्धेतून बाहेर पडला.
Marathi Breaking news live updates: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. योजनेअंतर्गत केवायसी करण्याची अंतिम मुदत वाढवून ३१ डिसेंबरपर्यंत करण्यात आली असून महिलांना आता अद्ययावत प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे.
योजनेनुसार लाभ मिळण्यासाठी वडील किंवा पतीची केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र, पती व वडील दोघेही हयात नसलेल्या महिलांसाठी केवायसी प्रक्रियेत अडचणी निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर सरकारने अशा महिलांसाठी नवीन पर्यायी केवायसी प्रक्रिया सुरू केली असून त्यांच्या अर्जांची अडथळ्याविना नोंदणी होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.






