Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू; कशी आहे महायुतीची रणनीती?
Maharashtra Local Body Election 2025 : राज्यातील महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. नोव्हेंबरपासून निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहेत. त्याआधीच महायुतीने जुळवाजुळव आणि रणनीती आखण्याचे काम सुरू केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी महायुतीचे घटक पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत. तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता आहे. विशेषतः मुंबईत उद्धव ठाकरे गटाविरोधात महायुतीने ताकदीने लढण्याची तयारी केली असून, बीएमसीवरील सत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने कंबर कसली आहे.
दुसरीकडे, ठाण्यात मात्र महायुतीतर्फे स्वतंत्र मैत्रीपूर्ण लढती होण्याची चिन्हे दिसत आहेत. महापालिका निवडणुकीसंदर्भात भाजपकडूनही तसे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रंगतदार होणार असल्याचे दिसू लागले आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व महानगरपालिका निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पूर्वी होणे महत्त्वाचे आहे. राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाने यासाठी तयारीला सुरुवात केली आहे. नोव्हेंबरनंतर महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत.
Todays Gold-Silver Price: सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा बदल! सविस्तर वाचा आजच्या किंमती
मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे गटाचे वर्चस्व कायम असताना, भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस अशी महायुती एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहे. बीएमसीवर सत्ता स्थापनेसाठी महायुतीकडून जोरदार तयारी सुरू आहे. मात्र ठाणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एकत्रितपणे लढणार आहे. पण त्याचवेळी शिवसेना (शिंदे गट) मात्र स्वतंत्रपणे उमेदवार उभे करणार असल्याची माहिती आहे.
दिवाळीनंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा रणसंग्राम पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. नोव्हेंबरनंतर दोन ते तीन टप्प्यात या निवडणुका पार पडण्याची शक्यता असून, याबाबत आयोग आणि राज्य सरकारकडून तयारी सुरू आहे. काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती घटक पक्ष ताकदीने आणि एकत्रितपणे मैदानात उतरणार आहेत. मात्र ठाणे आणि इतर काही भागांत मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता असल्याचेही बोलले जात आहे.
IND vs SL Asia Cup 2025 : सुपर ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर धावबाद होऊनही शनाका नाबाद? क्रिकेटचा हा अनो
मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे गटाचे वर्चस्व कायम आहे. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत संभाव्य युतीची चर्चा सुरू असून, त्यामुळे ठाकरे गटाची ताकद आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीनेही मुंबईत एकत्र येऊन ताकदीने लढण्याचा प्लॅन आखल्याचे सूत्रांकडून समजते. ज्या महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये युती शक्य नाही, तेथे महायुती घटक पक्ष स्वतंत्र किंवा मैत्रीपूर्ण लढतीत उतरतील, अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर होणाऱ्या या निवडणुका राज्याच्या राजकारणाला रंगत आणणार, यात शंका नाही.
मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाला शह देण्यासाठी महायुतीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. मात्र राज्यातील इतर काही महानगरपालिका निवडणुकांमध्ये वेगवेगळी समीकरणे दिसण्याची शक्यता आहे.काही ठिकाणी भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अशी युती होईल, तर काही ठिकाणी भाजप–शिवसेना (शिंदे गट) असे समीकरण राबवले जाऊ शकते. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्रपणे लढण्यावर भर दिला असल्याची माहिती आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगरपालिका निवडणुकांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र लढण्याचा विचार सुरू आहे . याशिवाय, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरसारख्या महत्त्वाच्या महानगरपालिका निवडणुकांबाबत महायुतीत अजूनही चर्चा सुरू असून, अंतिम निर्णयाची सर्वांनाच उत्सुकता आहे.