मुंबई : मुंबईतील मालाड भागातून आगीची घटना समोर आली आहे. मालाड येथील जनकल्याण नगर येथील एका इमारतीला भीषण आग लागली आहे. इमारतीच्या एका फ्लॅट मधून आगीचे लोट येत असून या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.
Maharashtra | Fire breaks out in a building in Jankalyan Nagar in Malad area of Mumbai. Five fire tenders present at the spot. No injuries reported so far. Details awaited.
— ANI (@ANI) December 3, 2022
#Mumbai : Big Fire reported in #Malad residential building pic.twitter.com/eVlew6h23j
— Sonu Kanojia (@NNsonukanojia) December 3, 2022
११ वाजताच्या सुमारास कांदिवली पश्चिम येथील जनकल्याण नगर परिसरातील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही भीषण आग लागली आहे. आगीचे मोठमोठे लोट खिडकीतून बाहेर येताना दिसत आहेत. यावेळी जीव वाचवण्यासाठी एका तरुणीने तिसऱ्या मजल्यावरुन खाली उडी घेतली.
बहुमजली इमारतीतील बहुतांश फ्लॅटमध्ये कुटुंबं राहतात. आगीच्या ज्वाळांचे लोट पाहून तेथील लोकांमध्ये घबराट पसरली. तिसर्या मजल्याशिवाय वरच्या मजल्यावरही आग पोहोचली होती. मात्र, लवकरच या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. ज्या फ्लॅटमध्ये आग लागली तेथील रहिवासीही पूर्णपणे सुरक्षित आहेत. आगीच्या कारणाचा तपास अधिकारी करत आहेत.
मालाड येथील इमारतीला लागलेली आग भीषण असून आग विझवण्यासाठी ५ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करीत आहेत.