Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: कोट्यवधींचा भुयारी मार्ग तयार, पण उद्घाटनाअभावी बंद; मसूर परिसरातील ग्रामस्थांची नाराजी

मसूर रेल्वे स्थानकाजवळ प्रवाशांच्या सोयीसाठी कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या भुयारी मार्गाचे काम चार महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले आहे. मात्र उद्घाटनाच्या प्रतीक्षेमुळे हा मार्ग अद्याप सुरू करण्यात आलेला नाही. या भुयारी मार्गामुळे मसूर, कोणेगाव, कवठे, कांबिरवाडी आणि वडोली भिकेश्वर येथील ग्रामस्थांना सुरक्षित प्रवास करता ...

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 22, 2026 | 01:31 PM
कोट्यवधींचा भुयारी मार्ग तयार, पण उद्घाटनाअभावी बंद; मसूर परिसरातील ग्रामस्थांची नाराजी

कोट्यवधींचा भुयारी मार्ग तयार, पण उद्घाटनाअभावी बंद; मसूर परिसरातील ग्रामस्थांची नाराजी

Follow Us
Follow Us:
  • मसूर रेल्वेस्टेशन नजीकच्या भुयारी मार्गाला मुहूर्त कधी ॽ
  • चार महिन्यापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
  • मसूर परिसरातील ग्रामस्थांची नाराजी
 

गजानन गिरी, मसूर : रेल्वे प्रशासनाने मसूरसह कोणेगाव – कवठे- कांबिरवाडी- वडोली भिकेश्वर या गावा अंतर्गत प्रवाशांच्या सोयीसाठी मसूर रेल्वे स्टेशन नजीकच दोन्ही बाजूला कोट्यावधी रुपये खर्च करून भुयारी मार्ग तयार करण्यात आला आहे. भुयारी मार्गाचे संपूर्ण काम झाले आहे. मात्र केवळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेत हा मार्ग रखडवत ठेवला आहे. या भुयारी मार्गाला उद्घाटनाचा मुहूर्त केव्हा मिळणार ॽ असा प्रश्न पडला आहे. सद्यस्थितीत जीवावर तांगटी तलवार ठेवली आहे. किंबहुना जीव मुठीत धरून प्रवाशांना या मार्गावरून मार्गस्थ व्हावे लागत आहे.

सदर भुयारी मार्गाचे काम दोन्ही बाजूने चार महिन्यापूर्वी पूर्ण झाले आहे. हा भुयारी मार्ग केवळ उद्घाटनाच्या निमित्ताने रखडवत ठेवला आहे. या भुयारी मार्गातून मसूरसह – कोणेगाव – कवठे – कांबिरवाडी – वडोली भिकेश्वर – या गावातील ग्रामस्थांना धोका न पत्करता या मार्गस्थ होता येणार आहे. कवठे, कोणेगाव या गावातील ग्रामस्थांना मल्हारपेठ – पंढरपूर मार्गावरून मसूरला जाण्या – येण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून याचा वापर करता येणार आहे. सद्यस्थितीत कवठे व कोणेगावच्या ग्रामस्थांना रेल्वेचा उड्डाणपुल संपल्यानंतर उजवीकडे वळसा घालत धोकादायक स्थितीत पाठीमागून, समोरून, खालील असे तिन्ही बाजूकडून वाहन येते का ? या भितीत प्रवास करावा लागत आहे.

Purandar Airport : भूसंपादन संमतीचा दावा खरा की खोटा? विमानतळ बाधित शेतकऱ्यांचा शासनालाच सवाल

मल्हारपेठ – पंढरपूर या राजमार्गावरील मसूर – उंब्रज रस्त्यावर उड्डाणपूल अल्पकाळात बांधला गेला. रेल्वेगेट बंदचा त्रास पूर्णता संपला. या मार्गावरील वाहतूक विना अडथळा सुरू झाली. परंतु भुयारीमार्ग केवळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने रकडवत ठेवला आहे. हा भुयारी मार्ग सुरू झाल्यास दैनंदिन वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे. गरजेचे असताना रेल्वे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याची तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटली आहे. केवळ औपचारिक उद्घाटनासाठी प्रवासांच्या जीवावर तांगटी तलवार ठेवत रेल्वे प्रशासन भुयारी मार्ग सुरू करण्याबाबत दिरंगाईसह कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे. आठ दिवसात रेल्वे प्रशासनाने तात्काळ भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला करावा. अन्यथा मसूरसह कवठे, कोणेगाव, कांबिरवाडी, ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशाराही दिला आला आहे.

रेल्वे प्रशासनाची निर्णयक्षमता कमी ॽ

रेल्वे उड्डाणपूल संपल्यानंतर उजवीकडे धोकादायक स्थितीत वळताना अनेक अपघात घडले आहेत. अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कित्येकजण जायबंदी झाले आहेत. या स्थितीत रेल्वेने भुयारी मार्ग केवळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेत रकडवला आहे. रेल्वे प्रशासनाकडे भुयारी मार्ग उदघाटनाची निर्णयक्षमता इतकी कमी असू शकते. हे आश्चर्याकारक मानले जात आहे.

घाटकोपर दुर्घटनेतून महापालिका काय शिकली? पश्चिम द्रुतगती महामार्गावर ‘डिजिटल’ होर्डिंगमुळे अपघात घडण्याची चालकांना भीती

Web Title: Masur railway station underpass ready awaits inauguration passengers face risk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 01:31 PM

Topics:  

  • maharashtra
  • railway
  • Satara

संबंधित बातम्या

पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा निविदा वादाच्या भोवऱ्यात; संदीप वाघेरेंकडून प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
1

पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा निविदा वादाच्या भोवऱ्यात; संदीप वाघेरेंकडून प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

Karjat News : साई डोंगरावरील 150 एकर वनजमिनीवर आदिवासींचा दावा; हक्कासाठी लढ्याची घोषणा
2

Karjat News : साई डोंगरावरील 150 एकर वनजमिनीवर आदिवासींचा दावा; हक्कासाठी लढ्याची घोषणा

पाणाडी जमिनीच्या खाली पाणी कसे शोधतात? भोंदूपणा, परंपरा की विज्ञान? जाणून घ्या सत्य
3

पाणाडी जमिनीच्या खाली पाणी कसे शोधतात? भोंदूपणा, परंपरा की विज्ञान? जाणून घ्या सत्य

Satara News : 22 शेतकऱ्यांच्या केबल चोरीचा छडा, पण पोलिसांच्या भूमिकेवर संशय; ग्रामीण भागात रंगली चर्चा
4

Satara News : 22 शेतकऱ्यांच्या केबल चोरीचा छडा, पण पोलिसांच्या भूमिकेवर संशय; ग्रामीण भागात रंगली चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.