राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरूवात
महाराष्ट्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठ्या योजनेची घोषणा केली होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजेनची घोषणा सरकारतर्फे करण्यात आली होती. या योजनेनुसार राज्य सरकार महिलांच्या खात्यात दर महिना १,५०० रूपये जमा करणार आहे. तसेच जुलै व ऑगस्ट महिन्याचे पैसे १७ ऑगस्टला जमा होणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र आजपासून महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरूवात झाली आहे. आजपासून लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरूवात झाली आहे. भाजपा आमदार राम सातपुते यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.
राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची घोषणा केली होती. मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेनुसार प्रत्येक महिन्याला महिलांच्या खात्यात १,५०० रूपये जमा केले जाणार आहेत. त्यानुसार जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे.
बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रत्यक्षात लाभ मिळायला सुरुवात झाली.
3-4 दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनचे पवित्र औचित्य साधून स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळायला सुरुवात झाली आहे. 31… pic.twitter.com/O4O16fqL8V
— Ram Satpute (@RamVSatpute) August 14, 2024
लाडकी बहीण योजनेवर विरोधकांनी प्रचंड टीका केली. अजून ते टीका करताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना आणण्यात आल्याचा आरोप विरोधक करत आहेत. दरम्यान त्यांच्या आरोपांना मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री प्रत्युत्तर देखील देत आहेत. दरम्यान स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला व रक्षाबंधनाची ओवाळणी राज्य सरकारने महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे.