ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (फोटो- ट्विटर)
मुंबई: राज्यामध्ये महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व शासकीय विभागांसाठी धोरणात्मक कार्यक्रम हाती घेतला होता. सर्व मंत्र्यांच्या खात्यांचे मागील 100 दिवसांचे कामकाजाचा निकाल हाती आला आहे. यामध्ये अनेक विकासकामे, योजना आणि प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस हाती घेण्यात आला होता. यावर आता ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी भाष्य केले आहे.
ग्रामविकास मंत्री जायकुमार गोरे म्हणाले, ” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसाचा धोरणात्मक कार्यक्रम ज्या पद्धतीने राबवला त्यासाठी त्यांचे अभिनंदन करणे आवश्यक आहे. त्यांनी आम्हाला केवळ 100 दिवसांचा कार्यक्रम दिला नाही तर त स्वतः हे काम कसे सुरू आहे यावर जातीने लक्ष ठेवून होते. ग्रामविकास खात्याला दिलेले कार्यक्रम आम्ही 100 दिवसांत पूर्ण केलेले आहे. ”
पुढे बोलताना जयकुमार गोरे म्हणाले, “आमच्या खात्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यासाठी मी सगळे राज्यमंत्री, सचिव, सीईओ या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो. आमच्या खात्याचा 4 था क्रमांक आला आहे. खरेतर तो पहिला यावा अशीच आमची इच्छा होती. ग्रामविकास खात्याचे काम प्रचंड व्यापक आहे त्याचे परिणाम दिसायला वेळ लागेल.”
महायुतीच्या 100 दिवसांचा प्रशासकीय निकाल आला हाती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय कामकाजाचा हा 100 दिवसांचा निकाल शेअर केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले. या निकालानुसार वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी 10 मुद्यांवर उत्कृष्ट कार्य करणारे 5 मंत्रालयीन विभागांचे सचिव, 5 मंत्रालयीन विभागांचे आयुक्त, 5 जिल्हाधिकारी, 5 पोलिस अधीक्षक, 5 मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.), 4 महापालिका आयुक्त, 3 पोलिस आयुक्त, 2 विभागीय आयुक्त आणि 2 पोलिस परिक्षेत्र महानिरीक्षक यांची नावे जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे.
महायुतीच्या 100 दिवसांचा प्रशासकीय निकाल आला हाती; कोणत्या नेत्याचा विभाग ठरला अव्वल? वाचा यादी
या सर्व अधिकाऱ्यांनी व त्यांच्या टीमने प्रभावी व कल्पक अंमलबजावणीने राज्याचे प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान व लोकाभिमुख केल्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक कौतुक करतो आणि त्यांना भविष्यातही अशाच प्रकारे उत्तम कार्य करण्यासाठी शुभेच्छा देतो असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
काय आहे निकाल?
सर्वोत्तम कामगिरी करणारे विभाग कोणते?