अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जागावाटपाबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने वंचित बहुजन आघाडी नाराज आहे. या पार्श्वभूमीवर वंचितचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी महाविकास आघाडीला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. सन्मानजनक जागा न सोडल्यास स्वबळावर निवडणूक लढवण्याचा इशारा दिला वंचितने दिला आहे. वंचितच्या या भूमिकेमुळे आता शहरात तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली असून याचा फटका नेमका कोणाला बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.