Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karmala News: इंदापूरला आठ तास वीज, करमाळ्यालाच चार तास का? शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करा; आमदार नारायण आबा पाटील यांची मागणी

करमाळा तालुक्यात शेतीपंपांना केवळ ४ तास वीज मिळत असल्याच्या निषेधार्थ आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला. इंदापूरप्रमाणे करमाळ्यालाही ८ तास वीज देण्याची मागणी करण्यात आली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 08, 2026 | 06:18 PM
Karmala News: इंदापूरला आठ तास वीज, करमाळ्यालाच चार तास का? शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करा; आमदार नारायण आबा पाटील यांची मागणी
Follow Us
Follow Us:
  • इंदापूरला आठ तास वीज, करमाळ्यालाच चार तास का?
  • शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करा
  • आमदार नारायण आबा पाटील यांची मागणी
करमाळा (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांना अवघा चार तास वीजपुरवठा केला जात असताना शेजारच्या इंदापूर तालुक्यात आठ तास वीजपुरवठा दिला जात आहे. हा करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांवर झालेला अन्याय असून शासनाने याबाबत फेरविचार करून तालुक्याला किमान सहा ते आठ तास सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी आमदार नारायण आबा पाटील यांनी केली.

शेतीसाठी नियमित व पुरेशा वीजपुरवठ्याच्या मागणीसाठी आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी करमाळा शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला. दत्त मंदिरापासून सुरू झालेला मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चात तालुक्यातील शेतकरी, वीज ग्राहक आणि विविध गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोर्चानंतर आयोजित सभेत बोलताना आमदार पाटील म्हणाले, “करमाळा हा दुष्काळी तालुका असून शेती मोठ्या प्रमाणावर वीजपुरवठ्यावर अवलंबून आहे. मात्र सध्या शेतकऱ्यांना केवळ चार तास वीज मिळत आहे. दुसरीकडे इंदापूर तालुक्यात आठ तास वीज दिली जाते. एकाच प्रदेशातील दोन तालुक्यांमध्ये असा भेदभाव का केला जात आहे, याचे उत्तर शासनाने द्यावे.”

MLC election Maharashtra : विधानपरिषद निवडणुकीआधी राजकीय हालचालींना वेग; राजेंद्र राऊतांची आमदार विजय देशमुख यांना सदिच्छा भेट

ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांचे पीक वाचवायचे असेल तर किमान सहा ते आठ तास अखंडित वीजपुरवठा करणे आवश्यक आहे. अन्यथा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन करमाळा तालुक्यातील वीजपुरवठा वाढवावा. यानंतर तहसीलदार शिल्पा ठोकडे तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

मोर्चामध्ये श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, जेऊरचे सरपंच पैलवान पृथ्वीराज पाटील, कंदरचे सरपंच मौला मुलाणी, पंचायत समितीचे माजी सदस्य सुहास रोकडे, आदिनाथ कारखान्याचे संचालक महिंद्र पाटील, राजाभाऊ कदम, देवानंद बागल, दत्ता सरडे यांच्यासह तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्च्याचे नियोजन व सूत्रसंचालन आमदार नारायण पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केले.

Solapur News: उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर ॲक्शन मोडमध्ये! सोलापुरात २५ कडुलिंबाच्या झाडांची कत्तल टळली; कटर मशीनसह ॲसिड जप्त

Web Title: Mla narayan patil leads grand protest in karmala against msedcl electricity discrimination

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 06:16 PM

Topics:  

  • Electricity Issue
  • Farmer Issue
  • Karmala
  • Protest
  • Solapur
  • Solapur News

संबंधित बातम्या

Power Crisis In India : देशात अंधाराचे सावट? वीज प्रकल्पांकडे उरला अवघा काही दिवसांचा कोळसा; केंद्राची चिंता वाढली
1

Power Crisis In India : देशात अंधाराचे सावट? वीज प्रकल्पांकडे उरला अवघा काही दिवसांचा कोळसा; केंद्राची चिंता वाढली

Pandharpur News : सत्कार नको, विठ्ठल भक्तांची सेवा करा! श्रीकांत यादवांचा पदभार स्वीकारताच हार-तुरेंना नकार
2

Pandharpur News : सत्कार नको, विठ्ठल भक्तांची सेवा करा! श्रीकांत यादवांचा पदभार स्वीकारताच हार-तुरेंना नकार

Solapur News : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; अभिनव स्नॅक्सला तात्काळ व्यवसाय बंदचे आदेश
3

Solapur News : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; अभिनव स्नॅक्सला तात्काळ व्यवसाय बंदचे आदेश

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार; अक्षय, श्वेता अन् तुलसीची चमकदार कामगिरी
4

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार; अक्षय, श्वेता अन् तुलसीची चमकदार कामगिरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.