कणकवली : कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथील शेखवाडी आणि खडक वाडी येथे वादळी वाऱ्यात नुकसान झालेल्या कुटुंबियांच्या मदतीसाठी भाजप आमदार नितेश राणे धावून गेले. या ठिकाणी पंधरा ते वीस घरांचे नुकसान या वादळी वाऱ्यात झालेले होते. घरांचे छत, छताचे पत्रे, कौले वाऱ्याने उडून गेली होती. तर काहींच्या घरावर झाडे पडून नुकसान झाले होते. या सर्वांना मदतीचा हात म्हणून सिमेंट पत्रे आणि छताची कौले आमदार नितेश राणे यांनी तातडीने घरपोच देण्यात आली. आमदार नितेश राणेंच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी भेट दिली आहे, सर्वांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त नागरिकांना नुकसान भरपाईसाठी आम्ही प्रयत्नशील असणार असल्याची माहिती भाजपा उपाध्यक्ष गोट्या सावंत यांनी दिली.
[read_also content=”‘भाजपने देवेंद्र फडणवीसांचे राजकारण संपवले आता पुढचा नंबर…’अरविंद केजरीवाल यांचा घणाघात https://www.navarashtra.com/maharashtra/bjp-has-ended-the-politics-of-devendra-fadnavis-arvind-kejriwal-attack-nrpm-534512.html”]
यावेळी भाजप उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी उपसभापती बुलंद पटेल, राजू पेडणेकर, चंद्रकांत परब, इम्रान शेख, अनिल खोचरे, आबा खोचरे, बडेमिया शेख आदींच्या उपस्थितीत नुकसानग्रस्त नागरिकांना आधार देण्यात आला.
त्यामध्ये सरफराज शेख, बशीर शेख, सईश शेख, नुरमुहम्मद शेख, आबीदाबा शेख, सफराज शेख, सलाम शेख, हुसेनबी शेख, निमायत पटेल यांना पत्रे तर बाबू पटेल, चाँद पटेल, नयफ पटेल, राफार पटेल, अयुब पटेल, रमिज पटेल, हमिर पटेल, सुलतान पटेल, सईद नाईक, अब्बास शेख, इमरान शेख, गुलाब शेख, अब्दुल शेख, शोयब पटेल, नासीर पटेल, सरफराज शेख, शनिफ शेख, मोहसीन शेख, मुकसाना नाईक, शाहरूख शेख यांना कौले आणि पत्रे भाजपा उपाध्यक्ष गोट्या सावंत यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. दरम्यान या सर्वच नुकसानग्रस्त कुटूंबियांनी आमदार नितेश राणे यांचे आभार मानले आहेत.
नितेश राणेंच्या माध्यमातून कौले आणि पत्र्याची मदत
चक्रीवादळ झाल्यानंतर काल आमदार नितेश राणे यांच्याशी मी संपर्क साधून झालेल्या नुकसानीची माहिती दिली होती. त्यानुसार आमदार नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याशी संपर्क साधून तातडीने पंचनामे करावेत आणि स्वतः प्रत्यक्ष पाहणी करावी अशी सूचना केली होती. त्यानुसार स्वतः जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. आता नुकसान भरपाई देण्यासाठी प्रशासन काम करत आहेत, आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून ३५०० हजार कौले, ५०० कोने आणि पत्रे यांचे वाटप भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करण्यात आले आहे. शासनाची मदत चांगल्या प्रकारे मिळावी यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे हे प्रयत्न करत आहेत, अशी माहिती भाजपा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या यांनी दिली आहे.