मुंबई – आमच्या अंतयात्रा काढणार होते, तुमची पोस्टमार्टम करायला पोलिस आले आहे ते आधी बघा असे सांगताना शरद पवारांच्या नादी लागूण संजय राऊतांनी शिवसेनेचे वाटोळे केले आहे. असा आरोप आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. आम्ही उद्धव ठाकरेंना काही सांगायला गेलो की संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेससोबत का रहावे हे ठाकरेंना पटवून देत असा आरोप आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. तर संजय राऊतांची लेखणी चांगली आहे,त्यांची वाणी चांगली आहे, ते हुशार असतील तर यातून ते बाहेर निघतील असेही संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
संजय राऊतांना कसली भीती वाटत नाही, त्यांना आत्मविश्वास आहे की, ते जे करताय ते सर्व खरे करत आहे. म्हणून घाबरायचे काही कारण नाही, मोठ्या प्रमाणावर अधिकारी गेल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
शिवसैनिक आज खूश झाला आहे. ज्यांच्यामुळे शिवसेना फुटली 40 आमदार 12 खासदार बाहेर पडले, राऊतांच्या भोंग्यामुळे सर्वांना त्रास झाला आहे. तर संजय राऊत हे केवळ पक्षाचे प्रवक्ते आहे ते काही मास लिडर नाही.यांच्याबद्दल काही उठाव होऊच शकत नाही, देशात कायदा आहे त्यानुसार काही केले नसेल तर संजय राऊत सुटतील.