ऐन निवडणुकीत राज ठाकरेंना दणका; मनसेच्या उमदेवाराने दिला उद्धव ठाकरेंना पाठिंबा
विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे. मात्र मतदानाची तारिख जसजशी जवळ येत आहे तसं राज्यात राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. अब्दुल सत्तार यांचा पराभव करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी भाजला साद घातली असतानाच आज नांदगाव मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना धक्का दिला आहे. भर प्रचारसभेत मनसेच्या उमेदवाराने उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. निवडणूक शेवटच्या टप्प्यात असताना मनसेच्या उमेदवारांनी माघार घेऊन शिवसेना ठाकरे पक्षाला पाठिंबा दिल्याने राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
उद्धव ठाकरे यांची आज नांदगाव मतदारसंघातील मनमाडमध्ये सभा पार पडली. मात्र मनमाडमध्ये हाय पॉलिटीकल ड्रा्मा पहायला मिळाला. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार गणेश धात्रक यांच्यासाठी मनसेचे उमेदवार अकबर सोनावाला यांनी निवडणुकीतून माघार घेतली आणि उद्धव ठाकरे यांच्या व्यासपीठावर जाऊन गणेश धात्रक यांना समर्थन दिलं.