येत्या 27 तारखेला शिवाजी पार्कवर एकत्र या! राज ठाकरेंनी दिले आदेश, काय घोषणा करणार?
राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अवघे १२ दिवस निवडणुकीला उरले आहेत. प्रचारासाठी राजकीय पक्षांना जेमतेम २० दिवसांचा अवधी मिळाला आहे. त्यामुळे प्रचारासाठी राजकीय नेत्यांची चांगलीच धावपळ उडत आहे. त्यावर आज राज ठाकरे यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. मनसेचे उमेदवार सायंकाळच्या प्रचासाठी राज ठाकरेंकडे मागणी करत आहेत. त्यावरून राज ठाकरे यांनी सायंकाळची सभा हवी असेल तर निवडणूक आयोगाकडून संध्याकाळ थोडी वाढवून घ्या, असा उपरोधीक लोटा लगावला आहे.
हेही वाचा-Narendra Modi Dhule Speech: महाविकास आघाडी ही चालक आणि चाके नसलेली गाडी; धुळ्यातून मोदींनी तोफ डागली
केरळ आणि गोवा राज्या केवळ पर्यटनावर चालले आहेत. मात्र कोकणाला भारताचं कॅलिपोर्निया म्हटलं जातं. अवघ्या महाराष्ट्राला पोसण्याची क्षमता असता असणाऱ्या या कोकणाचं पर्यटन मात्र बहरलं नाही. रिफायनर, केमिकलचे प्रकल्प कोकणात येता, पर्यटनावरचे उद्योग उभारत नाहीत. इथल्या रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे एकदा हातात सत्ता द्या. केरळ आणि गोव्याकडे पाहायची गरज भासणार नाही.
इथल्या हजारो एकर जमीन हडप केल्या जातायेत. कोकणातील जनतेच्या डोळ्यादेखत घडतायेत मात्र कोकणातील माणसाला चिड येत नाही. नानार गेला आता दुसरा प्रकल्प आला आहे. तुमच्या जमिनी कवडीमोल भावाने विकत घेऊन मोठ मोठे प्रकल्प उभारतायेत. कोट्यवधी रुपये कमवतायेत. मात्र तुमचं अस्तित्व मिटवलं जात आहे. त्यांच्यासाठी पुन्हा मतदान करण्यासाठी उन्हातान्हात उभे राहणार आहात का? असा सवाल राज ठाकरे यांनी कोकणाच्या जनतेला केला. कोकणची जनता इथल्या जमिनी विकून मुंबईत जातात. मात्र हे कोकण तुमचं आहे, तुमच्या हक्काचं आहे. ते सोडू नका, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
हेही वाचा-Maharashtra Elections 2024 : महायुतीचा पुढील मुख्यमंत्री कोण? अमित शहा यांचे जाहीर सभेत संकेत
महाराष्ट्रातील आणि देशातीलही जनता दर पाच वर्षांनी त्याच त्याच नेत्यांना निवडून दिलं जातं. मग विकास कसा होणार? हे नेत्यांनाही समजलं आहे की काहीही झालं तरी आपल्याला उमेदवारी मिळणार आणि आपणचं निवडून येणार आहे. त्यामुळे जनतेच्या पैशाचा योग्य वापर होत नाही. त्यामुळे आपला आणि आपल्या कोकणाचा विकास खुंटल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
कोणीही पक्ष फोडत, कुठेही जातं. ना विचारधारा ना पक्ष. केवळ सत्तेत राहण्यासाठी यांची धडपड सुरू असते. जनता जर अशीच यांना निवडून देत राहिली तर यांना काहीही फरक पडणार नाही. त्यामुळे असे नेते, लोकप्रतिनीधी पुन्हा निवडून येऊ नये असं वाटत असले तर यावेळी यांना धडा शिकवा. यांना पुन्हा निवडून देऊ नका, एकदा महाराष्ट्र नवनिर्मान सनेनेच्या हातात सत्ता द्या असं आवाहन त्यांनी कोकणवासीयांना केलं.