महायुतीचा पुढील मुख्यमंत्री कोण? अमित शहा यांचे जाहीर सभेत संकेत (फोटो सौजन्य-X)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (8 नोव्हेंबर) राज्यात विविध ठिकाणी राजकीय सभा होत आहे. धुळ्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, तर सांगलीतून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मैदानात उतरले आहेत. यावेळी विधानसभा निवडणुकीच अपेक्षित कामगिरी झाल्यास आगाम महायुतीच्या सरकारची सूत्रे कोणाच्या हाती असतील याची चर्चा सध्या सुरु आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कायम राहणार की मुख्यमंत्री बदलले जाणार, याची चर्चा सुरु असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आगामी मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्ट संकेत दिले.
सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यांची जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी महायुतीचा मुख्यमंत्रीपदासाठी कोणता चेहरा असेल, याबाबत जाहीर सभेत संकेत दिले आहे.या सभेत अमित शहा यांनी महाविकास आघाडीवर टीका केली असून राज्यात महायुतीचे सरकार स्थापन करण्यासाठी पुन्हा एकदा मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी मतदारांना केले. भाषण करताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाष्य केले. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. म्हणून, प्रत्येक दिवशी आपण सर्वांनी निर्णायक भूमिका बजावली पाहिजे. मी दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना आणायचं आहे, अशी इच्छा महाराष्ट्रातील जनतेची आहे, असे अमित शाह म्हणाले.
हे सुद्धा वाचा: “फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे मालक”, देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल
महाराष्ट्रातील सभेत अमित शहा म्हणाले की, शरद पवारांच्या चार पिढ्याही जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० परत आणू शकत नाहीत.’नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस पक्षाने जम्मू आणि काश्मीर विधानसभेत काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे, असे कलम 370 परत आणण्याची मागणी केली आहे. आज मी संभाजी महाराजांच्या भूमीवरून म्हणतोय – शरद पवार साहेब, तुमच्या चार पिढ्या आल्या तरी आम्ही कलम ३७० परत येऊ देणार नाही.
जम्मू-काश्मीर विधानसभेत नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात कलम 370 परत आणण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. हा प्रस्ताव मांडत असताना विधानसभेत चांगलाच गदारोळ झाला आणि त्यावरून भाजपचे आमदार आणि सत्ताधारी यांच्यात बाचाबाची झाली. यावरून पंतप्रधान मोदींनी विरोधकांवरही निशाणा साधला आहे.
‘हे आघाडीचे लोक ना देश सुरक्षित करू शकतात ना देशाची इज्जत वाढवू शकतात. हे काम करायचे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करावे लागतील. पंतप्रधान मोदींच्या आश्वासनावर दगडफेक झाली आहे, तर काँग्रेस पक्षालाच आश्वासनाचा विसर पडला आहे. त्यांनी कर्नाटक, हिमाचल प्रदेश किंवा तेलंगणामध्ये दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. राम मंदिराचा उल्लेख करत अमित शाह म्हणाले की, भगवान श्रीराम ५०० वर्षे तंबूत बसले होते. काँग्रेस पक्ष राम मंदिराच्या कामाला थारा देत होता, पंतप्रधान मोदी आले तेव्हा पाच वर्षात त्यांनी भूमिपूजनही केले आणि राम मंदिर बांधून पावन केले.
‘पंतप्रधान मोदींनी वक्फ बोर्ड बदलण्यासाठी विधेयक आणले आणि विरोधक त्याला विरोध करत आहेत. कर्नाटकच्या वक्फ बोर्डाने मंदिर आणि शेतकऱ्यांच्या जमिनीसह संपूर्ण गाव वक्फ मालमत्ता म्हणून घोषित केले. मी पवार साहेबांना विचारतो, उद्धवजी, तुम्ही वक्फला विरोध करणार का? महाविकास आघाडीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांच्या जमिनी वक्फला हस्तांतरित करतील.
हे सुद्धा वाचा: जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, विरोधक आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की