माफी असावी साहेब! राज ठाकरेंना पत्र लिहून मनसेच्या बड्या नेत्याने दिला राजीनामा
ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मनसेच्या उमेदवारांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत मनसे नेते अविनाश जाधव यांनी राजिनामा दिला आहे. अविनाश जाधव हे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे उमेदवार होते. परंतु त्यांना देखील पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
अविनाश जाधव ठाणे आणि पालघरचे मनसेचे जिल्हाध्यक्ष होते. तर विधानसभा निवडणुकीत ठाणे आणि पालघर जिल्ह्यात अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारांनी निवडणुका लढवल्या होत्या. ठाणे शहर मतदारसंघातून अविनाश जाधव यांनी सुद्धा निवडणूक लढवली होती. परंतु त्यांचा या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार संजय केळकर यांनी पराभव केला. या मतदारसंघात अविनाश जाधव हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. ठाणे जिल्ह्यातील मनसेच्या इतर उमेदवारांचाही पराभव झाला. अखेर अविनाश जाधव यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारत ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष पदाचा राजिनामा दिला आहे. राजिनाम्याचं पत्र त्या पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सोपवलं असून त्यांच्या या निर्णयामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे.
विधानसभा निवडणुकीत ठाणे आणि पालघर येथील पराभवाची जबाबदारी घेऊन मी जिल्हाध्यक्ष पदाचा राजिनामा दिला आहे. काम करताना माझ्याकडू कळत-नकळत काही चूक झाली असल्यास आपण माफ करवावं, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदा स्वबळावर लढण्याचा निर्धार करत विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार रिंगणात उतरवले होते. तर काही जागांवर भाजपचा पाठिंबा मिळवला होता. शिवडीतून महायुतीने उमेदवार उतरवला नव्हता. त्यामुळे शिवडीत महायुतीने मनसेच्या बाळा नांदगावकर यांना पाठिंबा जाहीर केला होता. तर माहीम विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांना माघार घेण्यासाठी बोललं जात होतं. मात्र, सदा सरवणकर माघार घेण्यास तयार झाले नाहीत. त्यामुळे माहीममध्ये तिंरगी लढत पाहायला मिळाली. मात्र, माहीममध्येही मनसेला पराभ झाला. इथून अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात होते.
अविनाश जाधव ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. ठाण्यातही तिरंगी लढत पाहायला मिळाली. तर उद्धव ठाकरेंकडून ठाण्यात राजन विचारे, भाजपकडून संजय केळकर आणि मनसेकडून रिंगणात होते. ठाण्यातही मनसेला पराभवाचा सामना करावा लागला. ठाण्यात मनसे तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली. ठाण्यात भाजपच्या संजय केळकर यांचा विजय झाला तर मनसेच्या अविनाश जाधव यांचा पराभव झाला. तर कल्याण ग्रामीणमध्येही राजू पाटील यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं.
पालघरमध्येही मनसेने जाहीर केलेल्या उमेदवारांचाही दारुण पराभव झाला. त्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. ‘विधानसभा निवडणुकीत ठाणे आणि पालघरमध्ये पराभवाची जबाबदारी घेऊन मी माझ्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देतोय. काम करताना माझ्याकडून कळत नकळत काही चूक झाली असल्यास मला माफ करा, अशा आशायाचं पत्र लिहून अविनाश जाधव यांनी राजीनामा दिला आहे.