फोटो - सोशल मीडिया
मुंबई : राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे. याचा लाखो महिलांना फायदा होत आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यात एक कोटीपेक्षा अधिक महिलांच्या खात्यात दोन हप्ते जमा करण्यात आले आहेत. अन्नपूर्णा योजनेंतर्गत तीन गॅस सिलिंडर देण्याची योजना सुरू केली आहे, असे त्यांनी सांगितले.
हेदेखील वाचा : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; आता…
मुख्यमंत्री शिंदे यांनी सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती यावेळी दिली. त्यांनी सांगितले की, ‘मुलींना उच्च शिक्षण मोफत, महिलांना प्रवासात सवलत या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचे काम राज्य शासन करत आहे. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प आपण केला आहे. सर्वसामान्य घरातील महिलांना घर चालवण्यासाठी अनेक अडचणी येतात. त्या लक्षात घेऊन आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली’.
ते म्हणाले, एक कोटीपेक्षा जास्त महिलांना या योजनेचा आतापर्यंत लाभ घेता आला आहे. तसेच लाडकी बहीण योजनबरोबरच लाडका भाऊ योजना म्हणजेच युवा प्रशिक्षण योजना सुरू झाली आहे. त्या अंतर्गत आपण मुलांना सहा हजार, आठ हजार, दहा हजार याप्रमाणे स्टयपेंड देवून स्कील रोजगार निर्माण कला आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
मराठा आरक्षणाविषयी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी सरकारची भूमिका आरक्षण कमी करण्याची नाही. सरकारने मराठ्यांना 10 टक्के आरक्षण दिले आहे. तसेच त्या अनुषंगाने ओबीसीसारख्या सवलती मराठ्यांना देण्यास सुरुवात केली आहे. आरक्षण देण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे
देशाच्या 3 कोटी लखपती दीदी बनवण्याच्या प्रक्रियेत महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल, देशातील तीन कोटी दीदीमध्ये राज्यातील 50 लाख दीदींचा समावेश राहील. देश 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. यात महाराष्ट्राचा वाटा मोठा राहणार असून 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
हेदेखील वाचा : केंद्राप्रमाणेच राज्य कर्मचाऱ्यांना लागू होणार सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन; शिंदे सरकारचे ‘हे’ मोठे निर्णय एकदा पहाच