जपानच्या साकुराजिमा ज्वालामुखीचा भयानक विस्फोट ; ४ किलोमीटरपर्यंत हवेत राखेच ढग, हाय अलर्ट जारी, VIDEO (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Japan Sakurajima Volcano Explodes : टोकियो : जपानच्या (Japan) दक्षिण-पश्चिम क्यूश प्रेदशात साकुराजिमा जाव्लामुखीचा भीषण विस्फोट झाला आहे. १६ नोव्हेंबर रोजी ज्वालामुखीचा तीव्र उद्रेक झाला असून यामुळे हवेत राखेचे आणि धुराचे मोठे लोट पाहायला मिळत आहे. ज्वालामुखीपासून ४.४०० मीटर उंचीवरपर्यंत स्फोट झाला आहे. या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला असून सरकारने हाय अलर्ट जारी केला आहे.
जपान हादरला! २४ तासांत सात भूकंपाचे तीव्र धक्के; त्सुनामीचा इशारा जारी
स्थानिक वेळेनुसार, दुपारी १२.५७ च्या दरम्यान मिनामिडाके क्रेटरमधून प्रंचड धूर आणि राखेचे ढग हवेत दिसू लागले. मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटाची तीव्रता इतरी होती की राखेचा गुब्बारा तब्बल ४,४०० फूट उंचीपर्यंत पोहोचला होता. जपानच्या हवामान विभागने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १३ महिन्यांत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या विस्फोटाची नोंद झाली आहे. पहिला स्फोट हा पहाटे १ वाजता तर या स्फोटानंतर दीड तासानंतर पुन्हा दुसरा २.२८ वाजता ३,७०० मीटर उंचीपर्यंत स्फोट आणि तिसरा विस्फोट ८.५० वाजता झाला.
The Sakurajima volcano in Kagoshima Prefecture, southwestern Japan erupted early Sunday morning, with plumes rising up to 4,400 meters above the summit crater. This is the recording of the initial moments of the eruption. pic.twitter.com/Wm5lvw1ITX — Massimo (@Rainmaker1973) November 16, 2025
सुदैवाने या स्फोेटात कोणत्याही जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही. पायरोक्लास्टिक प्रवाहस म्हणजे कोणत्याही प्रकारचा गरम पदार्थ किंवा वायूचा प्रवाह देखील झालेला नाही. यामुळे सध्या चिंतेचे कारण नाही. पकतु हवामान शास्त्र विभागाने सतर्कतामुळे लोकांना ज्वालामुखीच्या परिसरातून दूर राहण्यास सांगितले आहे.
विमान उड्डाणे रद्द
साकुराजिमा हा जपानमधील सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एक आहे. या ज्वालीमुखीचा सतत उद्रेक होत होता. सध्या या उद्रेकामुळे कागोशिमा विमानतळावरील ३० उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. तसेच लोकांना अधिकृत माध्यमांवर अपडेट राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
भूकंपाने हादरला होता जपान
काही दिवसांपूर्वीच जपानच्या पूर्व किनारपट्टीवर भूकंपाचे (Earthquake) तीव्र झटके जाणवले होते. एक ६.७ तीव्रतेचा तर दुसरा ५.० तीव्रतेचा भूकंप पाठोपाठ झाला होता. यानंतर काही तांसानी ५.४, ५.६, ५.१ रिश्टर स्केलचे तीन झटके बसले होते. यामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते.
जगावर पुन्हा मोठं संकट येणार? 4,000 हून अधिक लोक रुग्णालयात, सर्व शाळा बंद, सरकारकडून ‘महामारी’ जारी
Ans: जपानमध्ये दक्षिण-पश्चिम क्यूश प्रेदशात साकुराजिमा जाव्लामुखीचा भीषण स्फोट झाला आहे.
Ans: सुदैवाने जपानच्या ज्वालामुखी साकुराजिमाच्या उद्रेकामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
Ans: साकुराजिमा ज्वालामुखीचा शेवटचा उद्रेक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी झाला,
Ans: जपान हा पॅसिफिक महासागराच्या रिंग ऑफ फायरवर स्थित आहे. या भागात पृथ्वीच्या भू-गर्भाखालील टेक्टोनिक प्लेट्स सतत हालचाली करत असतात. यामुळे या भागात सतत भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो. तसेच यामुळे त्सुनामीचाही मोठा धोका निर्माण होतो.






