मंत्री मंगलप्रभात लोढा (फोटो- ट्विटर)
विविध क्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या माध्यमाने क्रांती
‘एआय’ तंत्रज्ञानामुळे पत्रकारांचा अमूल्य वेळ वाचणार
पत्रकार कक्षात एआय संदर्भात प्रशिक्षण वर्गाचे आयोजन
मुंबई: जगभरात आता विविध क्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या माध्यमाने क्रांती घडत असून प्रसिद्धी माध्यमातही याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. ‘एआय’ तंत्रज्ञान अत्याधुनिक पत्रकारितेला नवा पैलू देत असून यामुळे पत्रकारांचा अमूल्य वेळ ही वाचणार आहे. प्रत्येक क्षेत्रात अपस्किलींगला खूप महत्व आहे हे लक्षात घेवून राज्यात असा नाविन्यपूर्ण उपक्रम कौशल्य विकास विभागाने राबविला असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता न नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालय येथील पत्रकार कक्षात एआय संदर्भात प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यान आले. तिसऱ्या दिवशीच्या सत्रात ‘एआय’ तंज्ञानाच्या वापरासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण सत्राला कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपुर्वा पालकर, एआय तज्ज्ञ किशोर जस्नानी,उपकुलसचिव राजेंद्र तलवारे, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, सरचिटणीस दिपक भातोसे तसेच प्रिंट,इलेक्ट्रॉनिक, डिजिटल माध्यमांचे पत्रकार यावेळी या प्रशिक्षणाला उपस्थित होते.
Mangal Prabhat Lodha यांनी केला केईएम रूग्णालयाचा दौरा; गैरसोयीबाबत प्रशासनाला थेट…
मंत्रालय आणि विधिमंडळ संघाच्या सदस्य पत्रकारांनी या प्रशिक्षण कार्यशाळेला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे अत्याधिक आनंद झाला असल्याच्या भावना यावेळी कौशल्य विकास मंत्री लोढा यांनी व्यक्त केली. नवनवीन तंत्रज्ञान आल्यानंतर नेहमीच मनुष्यबळासंदर्भात चर्चा होते. मात्र या तंत्रज्ञानाने अधिकाधिक रोजगार उपलब्ध होतील, असेही त्यांनी नमूद केले.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत व रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या माध्यमातून मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघातील पत्रकारांसाठी खास चार दिवसीय कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. आज या शिबिराला भेट देऊन उपस्थित… pic.twitter.com/xA7XnUnPeo — Mangal Prabhat Lodha (@MPLodha) November 13, 2025
मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे सरचिटणीस दिपक भातोसे यांनी कौशल्य,रोजगार, उद्योजकता न नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून चार दिवसीय एआय प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत उत्कृष्ट असून या नाविन्यपूर्ण उपक्रमांचा पत्रकारांना नक्कीच उपयोग होणार असल्याचे सांगितले.
मंगल प्रभात लोढा यांनी केला केईएम रूग्णालयाचा दौरा
मुंबईचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केईएम रुग्णालयाचा पाहणी दौरा करून तिथल्या प्रशासनाला गैरसोयीबाबत धारेवर धरल्या नंतर आता तिथे व्यवस्थेत बदल करण्याचे आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहे. येत्या १५ दिवसात केईएम रुग्णालयात रुग्णांच्या नोंदीसाठी दहा नवी केंद्र उभारली जाणार आहेत. तसेच खाजगी एमआरआय ही पालिका दरानुसार करण्यासाठी निविदा काढली जाणार आहे. त्यामुळे रुग्णांचा पैसा आणि वेळ ही वाचणार आहे. के.ई.एम. रुग्णालयातील रुग्णांची गैरसोय, अपुऱ्या सुविधा, नागरिकांच्या सूचना आणि उपाययोजनांबाबत कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमित साटम यांची आज पालिका मुख्यालयात संयुक्त आढावा बैठक झाली. या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येत्या १५ दिवसात रुग्ण सेवा सुधारण्याचे आश्वासन दिले आहे.






