कल्याण : डोंबिवली पूर्वेकडील सावळाराम क्रीडा संकुलातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टेनिस कोर्टचे लोकार्पण तसेच डोंबिवली पश्चिमेत अत्याधुनिक ग्रंथालयाचे काल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. तत्कालीन स्थायी समिती सभापती दीपेश मात्रे यांच्या निधीतून हे टेनिस कोर्ट आणि ग्रंथालय उभारण्यात आलं आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या या वास्तूचं लोकार्पण होत असताना कल्याण-डोंबिवली महापालिकेचा (KDMC) कोणताही अधिकारी या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित नसल्याने एकच आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे हा लोकार्पण सोहळा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. (Kalyan Dombivali Dispute)
कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivali) शहरातील टेबल टेनिस खेळाडूंना व्यासपीठ निर्माण करण्यासाठी, त्यांना सरावासाठी सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी तत्कालीन स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी डोंबिवली पूर्वेकडील सावळाराम क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाचे टेबल टेनिस कोर्ट उभारण्याचा निर्णय घेतला. या टेबल टेनिस कोर्टचे आणि ग्रंथालयाचे काल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, शहर प्रमुख राजेश मोरे, युवा सेना पदाधिकारी योगेश म्हात्रे उपस्थित होते.
[read_also content=”भाजपाची नवीन खेळी 2024 च्या निवडणुका आणि राज्यपाल बदल, ‘या’ तीन नावांची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा; कुठली आहेत 3 नावे? https://www.navarashtra.com/india/bjp-new-move-next-elections-and-governor-change-these-three-names-are-a-big-talk-in-political-circles-what-are-the-three-names-369399.html”]
प्रत्यक्षात ही महापालिकेची वास्तू असताना या लोकार्पण सोहळ्यात एकही महापालिका अधिकारी फिरकला नाही इतकंच नव्हे तर महापालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्याला या लोकार्पण सोहळ्याबाबत कल्पनाही नव्हती. याबाबत महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, या कार्यक्रमाबद्दल आम्हाला कोणतीही माहिती दिलेली नाही. महापालिकेच्या दोन वास्तूंचा लोकार्पण सोहळा होतो मात्र याबाबत महापालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्याला काहीच माहीत नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते 15 फेब्रुवारीला कल्याणमध्ये लोकार्पण
कल्याण डोंबिवलीतील विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 15 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या संदर्भातली माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. या पत्रकार परिषदेत महापालिकेचे अधिकारी संजय जाधव, कार्यकारी अभियंता अर्जुन अहिरे, जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी दिली. कल्याणमधील प्रेक्षणीय स्थळ असलेल्या काळा तलावाचे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत करण्यात 17 कोटी निधी खर्चून सुशोभिकरण करण्यात आले आहे. त्याचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पात बाधित झालेल्याना बीएसयूपी योजनेतील घरे वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोब आंबिवली आणि वाडेघर येथील मलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण करण्यात येणार आहे. काळा तलाव व्यतिरिक्त अन्य विकास कामांचे लोकार्पण सभेच्या ठिकाणाहून ऑनलाईन पद्धतीने केले जाणार आहे. सायंकाळी 5 वाजता कल्याण पश्चिमेतील संतोषी माता रोजनजीक असलेल्या यशवंतराव चव्हाण मैदाना जाहिर कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता पार पडणार आहे.