मुंबई: एमपीएससीची (MPSC 2022) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एमपीएससीकडून ३४० नव्या जागांसाठी भरती (MPSC Vacancy) केली जाणार आहे. यामध्ये उपजिल्हाधिकारी, पोलीस अपअधीक्षक, शिक्षणाधिकारी, तहसीलदार आणि सहायक गट विकास अधिकारी यासह विविध पदांसाठी जागा आहेत. एमपीएससीकडून ११ मे २०२२ रोजी १६१ संवर्गाच्या भरतीकरीता (MPSC Recruitment) जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्येच ३४० नव्या पदांचा समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे आता एकूण ५०१ जागांवर भरती होणार आहे.
[read_also content=”कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची तब्येत पुन्हा बिघडली, डॉक्टर म्हणाले- ‘मेंदूपर्यंत ऑक्सिजन…’ https://www.navarashtra.com/movies/comedian-raju-srivastavas-health-worsened-again-doctor-said-oxygen-to-brain-317355.html”]
भरतीविषयीची माहिती
१.उपजिल्हाधिकारी,गट अ-३३
२.पोलीस उपअधीक्षक,गट अ-४१
३.सहायक राज्यकर आयुक्त, गट अ-४७
४. उपमुख्य कार्यकारी अधिकारी,गट अ-१४
५. उपनिबंधक,सहकारी संस्था, गट अ-२
६. शिक्षणाधिकारी, गट अ-२०
७. प्रकल्प अधिकारी (आयटीडीपी),गट अ-६
८. तहसीलदार, गट अ-२५
९. सहायक गट विकास अधिकारी,गट ब -८०
१०. उपअधीक्षक,भूमी अभिलेख,गट ब-३
११.सहायक निबंधक,सहकारी संस्था,गट ब -२
१२. उपशिक्षणाधिकारी, गट ब-२५
१३ सहायक प्रकल्प अधिकारी, गट ब-४२
एकूण जागा – ३४०
राज्य सेवा पूर्व परीक्षा (MPSC ) २०२२ ही २१ ऑगस्ट २०२२ रोजी घेतली जाईल. या भरती परीक्षेद्वारे महाराष्ट्र राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये उमेदवारांची भरती केली जाईल. राज्यातील ३७ जिल्हा केंद्रावर २१ ऑगस्ट रोजी परीक्षा होणार आहे.
१९ ते ३८ वर्षे वयोगटातील उमेदवार या परीक्षांसाठी अर्ज करू शकतात. आरक्षित वर्गाला उच्च वयोमर्यादेत सूट मिळेल. जोपर्यंत शैक्षणिक पात्रतेचा संबंध आहे, पदवीधर उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. http://mpsc.gov.in/ या एमपीएससीच्या संकेतस्थळावर यासंदर्भातील अधिक माहिती उपलब्ध आहे.