दिवाळीत एसटी विभागाला मिळाले विक्रमी उत्पन्न (फोटो- सोशल मीडिया)
Pune ST Bus Department: दिवाळी सणानिमित्त पुण्यात राहणाऱ्या प्रवाशांना आपल्या गावी जाण्यासाठी पुणे एसटी विभागातून ९५७ ज्यादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. या गाड्यांद्वारे १० लाख ५१ हजार ३६६ प्रवाशांनी प्रवास केला. यामुळे पुणे एसटी विभागाला १४ कोटी ४ लाख ९६ हजार ४९८ रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे.दिवाळी काळात बाहेर गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी दरवर्षी एसटीकडून नियमित गाड्यांव्यतिरिक्त अतिरिक्त गाड्या सोडण्यात येतात. यंदाही ज्यादा गाड्यांचे नियोजन पुणे एसटी विभागाकडून करण्यात आले होते.
दि.१७ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत पुणे विभागाने प्रवाशांना मोठा दिलासा देत विक्रमी कामगिरी नोंदवली. केवळ सात दिवसांत पुणे विभागातून १० लाख ५१ हजार ३६६ प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून पुणे एसटी विभागाला १४ कोटी ४ लाख ९६ हजार ४९८ रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले.प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी पुणे विभागाने अतिरिक्त मनुष्यबळ आणि सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली. तसेच इतर विभागातून मदतीसाठी ६५ पर्यवेक्षक पुणे विभागात आले होते. यामुळे प्रवाशांचे नियोजन व्यवस्थित झाले असल्याचे पुणे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
ST Employee: एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! राज्य सरकारने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय
प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे विभागातून ९५७ ज्यादा गाड्या सोडण्यात आल्या, प्रवाशांनी या जादा गाडयांचा लाभ घेतला आहे. पुणे एसटी विभागातून १० लाखांहून अधिक प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला असून या माध्यमातून महामंडळाला १४ कोटी ४ लाख ९६ हजार ४९८ रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे.
– कमलेश धनराळे,
विभागीय वाहतूक अधिकारी,पुणे एसटी विभाग
ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक-त्रैमासिक पास योजना सुरु
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळाने) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक प्रतिसाद मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता राज्यातील ई-बस प्रवाशांना मासिक व त्रैमासिक पास सवलत योजना उपलब्ध होणार आहे.अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक-त्रैमासिक पास योजना सुरु, परिवहनमंत्र्यांची माहिती
मंत्री सरनाईक म्हणाले की, या पास योजनांचा मुख्य उद्देश नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने दररोज एकाच मार्गावर प्रवास करणाऱ्या नियमित प्रवाशांना ई-बस सेवेकडे आकर्षित करणे हा आहे. सध्या महामंडळाच्या ताफ्यात ई-बस प्रकल्पातील ४४८ बस आणि शिवाई प्रकल्पातील ५० ई-बसेस कार्यरत आहेत. भविष्यात या बसेसची संख्या आणखी वाढवण्याचा मानस आहे. अनेक प्रवाशांकडून ई-बस सेवेत पास प्रणालीची मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर महामंडळाने प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारा प्रवास देण्यासाठी ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.






