आजपासून सुरू होणार आंगणेवाडी जत्रा (फोटो- सोशल मीडिया)
९ दर्शन रांगा आणि ७०० स्वयंसेवक
पहाटे ३ वाजता सुरू होणार देवीचे दर्शन
135 जादा बसेस सोडल्या जाणार
मालवण: नवसाला पावणारी आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान नसलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी वीचा वार्षिक जत्रोत्सव दि. ९ फेब्रुवारी बजी संपन्न होत आहे. (sindhudurg)भाविक हा केंद्रबिंदू बानून देवीच्या सुलभ आणि तत्पर र्शनासाठी अतिशय योग्य आणि सुसज्ज नयोजन करून आंगणे कुटुंबीय नांगणेवाडी आणि प्रशासन सज्ज झाले नाहे. जत्रोत्सवा दिवशी दि. ९ फेब्रुवारी बजी पहाटे ३ वाजता भाविकांसाठी देवीचे र्शन सुरू होणार आहे. त्यानंतर रात्री नऊ – बारा धार्मिक विधीसाठी भाविकांना वीचे दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. तर रात्री १ नंतर पुन्हा देवीचे दर्शन सुरू णार आहे. दि. १० रोजी मोड जत्रे दवशी सायंकाळी ७ वाजेपर्यंत भाविकांना र्शन होणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे यांनी दिली. तसेच जादा एसटी बसेस देखील सोडळणेत येणार आहेत.
९ दर्शन रांगा आणि ७०० स्वयंसेवक
जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेचे आयोजन श्री भराडी देवी मंदिराच्या प्रांगणात करण्यात आले होते. यावेळी मंडळाचे सचिव काका आआंगणे, कार्याध्यक्ष बाळा आंगणे, बाबू आंगणे आदी उपस्थित होते. जत्रोत्सव उत्साहात संपन्न होत असताना भाविकांचे सहकार्य नेहमीच लाभते, गतवर्षीच्या नियोजनात काही बदल यावर्षी करण्यात आले आहेत. भाविकांना अधिक सुलभ दर्शन देण्याचा प्रयत्न राहणार आहे. भविकांना एकूण नऊ दर्शन रांगांद्वारे दर्शन मिळणार आहे. तसेच महनीय व्यक्तीसाठी वेगळी दर्शन रांग असणार आहे.
ST च्या विश्रांतीगृहांमध्ये चालक -वाहकांनी केले मद्यपान? प्रताप सरनाईकांनी थेट दिले ‘हे’ निर्देश
यात्रा नियोजन तयारीच्या दृष्टीने मेहनत
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील विजय उमेदवार सुद्धा सोमवारी आई भराडीच्या दर्शनासाठी येणार आहेत. त्यामुळे होणारी अधिक गर्दी लक्षात घेता त्यादृष्टीने सुद्धा नियोजन केले आहे. आंगणे कुटुंबीय गेले ३ महिने यात्रा नियोजन तयारीच्या दृष्टीने मेहनत घेत आहेत. शासनाकडून फार मोठे सहकार्य मिळत आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी नियोजन बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.
आंगणेवाडी जत्रोत्सवासाठी जादा १३५ बसेस
आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागातून विविध मार्गावर जादा १३५ एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. दि. ८ ते दि. १० फेब्रुवारी या कालावधीत सदरच्या बसेस सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या सूत्रांकडून देण्यात आली. यामध्ये कुडाळ-आंगणेवाडी १५, वेंगुर्ले आगारासाठी कुडाळ-आंगणेवाडी १०, कसाल हिवाळे-आंगणेवाडी ४, कसाल-खोटले-आंगणेवाडी ५, निरुखे-पांग्रड-आंगणेवाडी ३, पणदूर-ओरोस आंगणेवाडी १ अशा कुडाळ आगारातून ३८ बसेस सोडण्यात येणार आहेत.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






