मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देशभरात वायू प्रदूषण (Mumbai Air Pollution) ही गंभीर समस्या बनली आहे. वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे जे आरोग्यास हानी पोहोचवू शकते. दिल्लीतील अनेकांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील वायू प्रदूषण झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. हवेच्या खराब गुणवत्तेमुळे आज सकाळी मुंबईत धुळीचा थर पाहायला मिळाला.
[read_also content=”गोरगावमध्ये वृद्ध महिलेल्या घरी सुरू होते सेक्स रॅकेट, मुंबई पोलिसांनी केली कारवाई, 16 वर्षीय मुलीची केली सुटका! https://www.navarashtra.com/crime/mumbai-police-exposed-sex-racket-running-in-goregaon-area-neps-477937.html”]
दिल्ली आणि मुंबईत पुढील तीन दिवस वायू प्रदूषणाची समस्या कायम राहणार आहे. अशा स्थितीत आता काही दिवस नागरिकांना प्रदूषणाचा सामना करावा लागणार असल्याची माहिती पुढे येत आहे. 5 ते 7 नोव्हेंबरपर्यंत प्रदूषण जास्त असेल. दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीचे अध्यक्ष अश्विनी कुमार यांनीही यासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहिले आहे. अशा परिस्थितीत आता केंद्र सरकार यावर काय निर्णय घेते हे पाहावे लागेल.
दिवसेंदिवस मुंबईतील हवा प्रदूषणात वाढ होत असल्याने मानवासह इतर सजिवांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. कोरोनाच्या काळात अनेकांनी आजारावर मात केली, मात्र आता नागरिकांनी अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे. ज्या लोकांना कोरोना आहे त्यांना प्रदूषणामुळे अस्थमासारखे आजार होतात. अशा परिस्थितीत स्वतःची काळजी घेणं जास्त आवश्यक आहे