मुंबई : बोगस मजूर प्रकरणी भाजपाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर पुन्हा एकदा पोलिस चौकशीला हजर राहिले. तेथे त्यांची तीन तास चौकशी करण्यात आली. यावेळी पोलिस स्टेशनबाहेर मोठ्या प्रमाणात भाजपच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. चौकशीनंतर दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनावर निशाणा साधला.राज्य सरकार सूडबुद्धीने काम करत असून मला अटक करण्याचा खटाटोप सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला(Mumbai Bank bogus labor case Govt cracks down on arrests; Praveen Darekar’s sensational allegation after three hours of interrogation).
मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर दरेकर यांची 4 एप्रिल रोजी रमाबाई आंबेडकर पोलिस स्टेशनमध्ये चौकशी झाली होती. त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानुसार दरेकर सोमवारी चौकशीसाठी हजर झाले होते.
पोलिस दबावाखाली काम करत आहेत. महाविकास आघाडी सरकारकडून माझी छळवणूक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी पोलिस चौकशीला संपूर्ण सहकार्य करत असल्याचेही प्रवीण दरेकर म्हणाले.
दरम्यान, पोलिसांच्या प्रश्नांना योग्य उत्तरे दिली. पण सरकारलाच मला छळायचे असेल म्हणून पुन्हा बोलावण्यात आले असेल असे दरेकर चौकशीला जाण्यापूर्वी म्हणाले. माझ्याविरोधात षडयंत्र रचण्यात आले असून आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे , भाई जगताप आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंविरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारादेखील दरेकर यांनी दिला. तशा नोटीसा निघाल्या असल्याची माहितीही त्यांनी दिली. मुंबै बँकेचा नफा 15 कोटी आणि दोन हजार कोटी रुपयांचा आरोप करता, तुमच्या पब्लिसिटीसाठी एखादी इन्स्टिट्यूशन बदनाम करता, हे योग्य नाही, असेदेखील ते म्हणाले.
[read_also content=”घरात-दुकानात, वाहनांना ‘लिंबू-मिरची’च का बांधतात? अध्यात्म आणि विज्ञान काय सांगते? https://www.navarashtra.com/religion/religion/nimbu-mirchi-totka-nrvk-257586.html”]
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]