मुंबई : भाजप नेते व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवत 4 एप्रिल रोजी मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. स्वत:ला मजूर दाखवत मुंबै बँकेच्या संचालकपदी बेकायदा निवडून येत कोट्यवधीचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याचप्रकरणी अधिक चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे(Mumbai Police issues notice to Praveen Darekar).
भाजप नेते प्रवीण दरेकर यांची मुंबै बँकेवर मजूर या प्रवर्गातून संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली होती. प्रवीण दरेकर नेमकी कुठे मजुरी करतात, असा सवाल करत आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांनी प्रवीण दरेकरांविरोधात पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर सहकार विभागानेही प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवले होते. त्यामुळे दरेकर यांना संचालकपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र, प्रवीण दरेकर तब्बल 20 वर्षे संचालकपदावर होते. म्हणून त्यांनी सरकारची तब्बल 20 वर्षे फसवणूक केली, असा आरोप त्यांच्याविरोधात करण्यात आला.
बोगस मजूरप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केल्यास अटकपूर्व जामिनासाठी प्रवीण दरेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या जामिनावर 29 मार्च रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, वेळेअभावी सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे दरेकरांच्या वकिलांनी पुढील सुनावणीपर्यंत दिलासा देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य करत पुढील सुनावणीपर्यंत प्रवीण दरेकरांना याप्रकरणात अटक करू नये, असे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत.
[read_also content=”घरात-दुकानात, वाहनांना ‘लिंबू-मिरची’च का बांधतात? अध्यात्म आणि विज्ञान काय सांगते? https://www.navarashtra.com/religion/religion/nimbu-mirchi-totka-nrvk-257586.html”]
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]