कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य; नागरिकांच्या हाडांच्या आजारात वाढ (फोटो सौजन्य - pinterest)
कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्यांवर खड्ड्याचं साम्राज्य निर्माण झालं आहे. नागरिकांना या रस्त्यांवरून प्रवास करताना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग देखील मंदावत आहे, त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना सतत एक्सलेटर आणि ब्रेक दाबावे लागत आहेत. त्यामुळे नागरिकांना मणक्याच्या आजारांचा सामना करावा लागत आहे.
हेदेखील वाचा- ऊंट किती दिवस जिवंत राहू शकतो? जाणून घ्या तुमच्या प्रश्नांचं उत्तर
कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांमधून प्रवास करताना येथील नागरिक मोठ्या प्रमाणात हाल सहन करत आहेत. खड्ड्यांमधील प्रवासामुळे नागरिकांना मणक्याचे, गुडघ्याचे आजार जडले आहेत. तर महिला विशेषतः गरोदर महिलांना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मानसिक तणावाला सामोरं जावं लागत आहे. कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची मागणी नागरिकांकडून आणि राजकीय नेत्यांकडून सतत केली जात आहे. मात्र नागरिकांच्या या मागणीकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
कल्याण डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोडींची समस्या देखील वारंवार निर्माण होत आहे. या सर्व समस्येवर तात्काळ उपाययोजना करावी आणि या रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. वाहतूक कोंडीसोबतच खड्ड्यांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर देखील परिणाम होत असल्याचं पाहायला मिळत आहे. याबाबत डॉ. प्रशांत पाटील यांनी माहिती दिली आहे.
हेदेखील वाचा- Breaking: मानखुर्द ते वाशी लोकल विस्कळीत ; सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांचे हाल
डॉ. प्रशांत पाटील यांनी सांगितलं आहे की, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांसह नागरीकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यातून दुचाकी आणि चार चाकी वाहने चालविल्याने सतत गाडीला गचके बसतात. या गचक्यांमुळे नागरीकांना मणक्याच्या आजारां सामोरं जावं लागत आहे. तसेच खड्ड्यांमधून वाहन चालवताना वाहन चालकांना सतत एक्सलेटर आणि ब्रेक दाबावे लागतात. त्यामुळे त्यांना गुडघे दुखीच्या समस्याना समोरे जावे लागत आहे. या आजाराचे रुग्ण उपचारासाठी रुग्णलयात येत आहे. त्याची संख्या वाढल्याचं दिसून येत आहे.
वाहतूक कोंडीचा सगळ्यात जास्त त्रास हा महिलांना होत आहे. महिला घरातून निघताना कमी पाणी पिऊन निघतात. त्यामुळे त्यांना स्टोनचा आजाराची लक्षणे दिसून येत आहे. स्टोनच्या तक्रारी असलेल्या महिला उपचारासाठी रुग्णालयात येत आहेत. विशेषतः गरोदर महिलांना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय सतत वाहन कोंडीत अडकून पडल्याने दुचाकी आणि चार चाकी वाहन चालकांचे मानसिक संतुलन बिघडते. त्यांना बीपीचा त्रास होतो. त्यातून त्यांचा स्वभाव चिडचीडा होताना दिसून येत आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ते चांगले केल्यास या आजारांना आळा बसण्यास मदत होईल अशी माहिती डॉ पाटील यांनी दिली आहे.