मुंबई : आज देशात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येतं आहे. याचं औचित्य साधून राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वजारोहण केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जनतेला संबोधित करत स्वातंत्र्यादिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि अनेक नवीन योजनाही घोषित केल्या.
[read_also content=”ठाण्यात मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं ध्वजारोहण! https://www.navarashtra.com/thane/chief-minister-eknath-shinde-hoisted-the-flag-at-midnight-in-thane-nrps-316149.html”]
साडे तीन वर्षांपासून कोविडच्या विषाणूनं आपल्याला बंधिस्त केलं होतं. संकट अद्याप गेलेलं नाही, पण आपण सगळ्यांनी विषाणूनं घातलेल्या बेड्या तोडल्या आहे… असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, ‘स्वातंत्र्य महोत्सवाबरोबरच आपण येणारे सणही काळजी घेऊन जल्लोषात साजरे करू. नवे सरकार आले आहे. पहिल्या दिवसापासून आम्ही काम करतोय. 28 जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला असून 15 लाख हेक्टर जमिनीवरील पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 15 हजार नारिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं. ‘
[read_also content=”आरएसएस मुख्यालयात स्वांतत्र्यदिन साजरा, मोहन भागवतांनी केलं ध्वजारोहण https://www.navarashtra.com/maharashtra/independence-day-celebration-at-rss-headquarters-mohan-bhagwat-hoisted-the-flag-nrps-316158.html”]