औरंगाबाद : शहरातील प्रियदर्शनी उद्यान सिडको येथील स्व.बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामास महाराष्ट्राचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray ) यांनी आज गुरुवारी सकाळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी स्मारकाच्या विकास कामांची माहिती दिली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी स्मारकाच्या विकास कामांची व स्मृती वनाची पाहणी करून कामाची आढावा घेतला.
[read_also content=”माझी तयारी कशी आहे हे येणारा काळच सांगेल; हार्दिक पांड्याचे सूचक वक्तव्य https://www.navarashtra.com/sports/cricket/only-time-will-tell-how-i-am-prepared-indicative-statement-of-hardik-panda-nrvk-228064.html”]
आज (दि. 27 जानेवारी) पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्व.बाळासाहेब ठाकरे स्मारक आणि उद्यानाला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी स्मारक परिसरात पाहणी केली आणि स्मारकाच्या कामाची प्रगती बघून समाधान व्यक्त केले. या दरम्यान मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री सुभाष देसाई, रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, आमदार अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकात खैरे, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय,शहर अभियंता एस डी पानझडे,माजी महापौर नंदकुमार घोडेले, मनपा उद्यान अधीक्षक विजय पाटील आदी उपस्थित होते.
[read_also content=”महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा प्रकार खपवून घेणार नाही, फडणवीसांची टिका https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/devendra-fadnavis-criticizes-the-decision-to-make-wine-available-in-the-super-market-nrps-228638.html”]