Photo Credit- X @ Devendra Fadnavis मुंबईत टाटांच्या आणखी एका नव्या हॉटेलचे भूमीपूजन
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या हस्ते आज (10 फेब्रुवारी) ताज बँडस्टँड प्रोजेक्टच्या भूमिपूजन कऱण्यात आले. यावेळी आमदार आशिष शेलार आणि पर्यटन मंत्री दीपक केसरकर यांची उपस्थित होत. हा भव्य प्रकल्प टाटा समूहाच्या पुढाकाराने उभारण्यात येत आहे. हा प्रकल्प ताज महल पॅलेसच्या ऐतिहासिक वारशाला पुढे नेणारा असून, लक्झरी आणि प्रतिष्ठेचे नवे प्रतिक ठरणार आहे. सुमारे २ एकर जागेत विस्तारलेल्या या प्रकल्पात ३३० आलिशान खोल्या आणि ८५ अपार्टमेंट्स असतील.
यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा, विविध जेवणाचे पर्याय, अत्याधुनिक कन्व्हेन्शन स्पेस आणि सुंदर लँडस्केप गार्डनचा समावेश आहे. २०२५ मध्ये या प्रकल्पाचे बांधकाम सुरू होईल आणि पुढील चार वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात इंडियन हॉटेल कंपनीचे आभार मानले आणि वांद्रे येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य हॉटेलच्या प्रकल्पाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, रतन टाटा यांच्यासाठी हे हॉटेल विशेष महत्त्वाचे होते. हॉटेलच्या उभारणीत काही अडचणी असल्याचे टाटा यांनी कधीकाळी त्यांना सांगितले होते. नव्या हॉटेलच्या नियोजन आणि डिझाइनमुळे मुंबईच्या सौंदर्यात अधिक भर पडेल, असेही त्यांनी नमूद केले.
MCD Election: विधानसभेनंतर केजरीवाल दिल्ली महापालिकेतील सत्ताही गमावणार..? भाजप पुन्हा गेम करणार
ताज ग्रुपचे महाराष्ट्रात भरीव अस्तित्व असले तरी नागपुरात त्यांचे हॉटेल नाही, याकडे लक्ष वेधत त्यांनी टाटा ग्रुपच्या सीईओंना विनंती केली की, नागपुरात हॉटेल सुरू करण्याची घोषणा आजच करावी. टाटांच्या ताज ग्रुपचे हे हॉटेल 21व्या शतकातील एक भव्य स्मारक ठरेल. ताज ग्रुपने आतिथ्य सेवा (हॉस्पिटॅलिटी) क्षेत्रात नवे मापदंड निर्माण केले असून, जगभरात त्यांची प्रतिष्ठा आहे. परदेशात गेल्यावर “भारत म्हणजे ताज” असे वाटते, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मुंबई महानगरपालिकेने या हॉटेलच्या उभारणीत आलेल्या अडचणी दूर करण्यास मदत केली, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, स्वर्गीय रतन टाटा यांच्या हयातीतच हा प्रकल्प पूर्ण झाला असता तर त्यांना अधिक आनंद झाला असता, असे सांगत त्यांनी टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच, भविष्यात अशा प्रकल्पांसमोर अडथळे आल्यास सरकार त्यासाठी पाठबळ देईल, असही त्यांनी नमुद केलं.
भारताच्या Education System चे आले रिपोर्ट कार्ड, 70% लोकांनी दाखवला विश्वास मात्र
“विकसनासाठी सरकार म्हणून आम्ही एक प्रकारे भागीदार आहोत. मुंबईला अशा आणखी भव्य हॉटेल्सची गरज आहे, त्यामुळे तुम्ही अशा प्रकल्पांची संख्या वाढवावी, असे आवाहन मी तुम्हाला करतो,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच, या उपक्रमात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी ताज ग्रुपचे आभार मानले.