('...म्हणून काँग्रेस शिवसेनेसोबत'; प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी सांगितलं खरं कारण) Photo Credit- Social Media
मुंबई: विडंबन असो वा थेट परखड शब्द, जवळपास सर्व ठिकाणी टीकाटिप्पण्या होत असतात. पण सध्या कोणत्याही स्वरूपात टीका केल्यास त्याचे अवलोकन करणे दूरच राहिले, उलट टीकाकारांनाच इशारे दिले जात आहे, अशा शब्दांत शिंदेसेनेला सुनावले आहे. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने केलेल्या विडंबनात्मक गाण्यानंतर राजकीय वर्तुळातून त्याच्याविरोधात तीव्र पडसाद उमटत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकांकडून कुणाल कामराला धमक्या दिल्या गेल्या. या सर्व प्रकरणावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवसेनेला डिवचलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच एका अमेरिकन संशोधकाच्या पॉडकास्टसाठी मुलाखत दिली. या मुलाखतीत खुद्द पंतप्रधान मोदींनी टीका हा लोकशाहीचा आत्मा असल्याचे स्पष्टपणे सांगितले. पण मोदी समर्थक महायुतीच्या नेत्यांनाच हे मान्य नाहीये का? असा प्रश्न आहे. कणाल कामरा यांनी केलेल्या विडंबनात्मक गाण्यामुळे एकनाथ शिंदेंचे समर्थक भडकले आणि त्यांनी स्टुडिओची तोडफोड केली. त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औरंगजेबाशी तुलना केली म्हणूनही भाजप समर्थक भडकले होते. औरंगजेबाशी तुलना करताना ती वैयक्तिक नव्हे तर शासनपद्धतीचा संदर्भाने ती टीका करण्यात आली होता. पण त्याचाही वाद निर्माण केला गेला.
PM Modi Nagpur Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूर दौऱ्यामागचे नेमके कारण काय?
सपकाळ म्हणाले की, मोदीजी म्हणाले तसे टीका हा लोकशाहीचा आत्मा आहे .तर महाराष्ट्रातील महायुतीचे नेत्यांनीही ही भूमिका स्वीकारली पाहिजे. पण त्यांची भूमिका पूर्णपणे विरोधात असल्याप्रमाणे दिसते. कामरा यांच्या विडंबनात्मक टिकेमुळे एकनाथ शिंदे नाराज झाले. स्टुडिओची तोडफोड केली, कुणाल कामरावर गुन्हा दाखल कऱण्यापर्यंतच ते थांबले नाहीत तर विधानसभेत देखील सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातला. सत्ताधाऱ्यांची ही टीका स्वीकारण्याचे लक्षण कदापि नाही.
विशेष म्हणजे, सरकारी यंत्रणांचा वापर करून तोडफोडीला अधिकृत स्वरूप दिले जात असल्याचे दिसते. हा स्टुडिओ ज्या जागेवर होता, ती मूळतः एका स्वातंत्र्यसैनिकाची मालकी होती. विशेष म्हणजे, याच ठिकाणी मागील आठवड्यात भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार यांचा सत्कार करण्यात आला होता. मात्र, कुणाल कामरांनी स्टँड-अप परफॉर्म केल्यानंतर अचानक ही जागा बेकायदेशीर ठरविण्यात आली आणि पालिकेचे पथक स्टुडिओचे बांधकाम तोडण्यासाठी तिथे दाखल झाले. यावर प्रतिक्रिया देताना सपकाळ यांनी स्पष्ट मत व्यक्त केले की, सत्तेचा समतोल बिघडला असून संपूर्ण व्यवस्थाच कोलमडल्या आहेत.
Ghibli मुळे तुमची ओळख चोरली जातेय का? अब्जावधी डॉलर्समध्ये बाजारात विकला जातोय तुमचा चेहरा?
दरम्यान, हर्षवर्धन सपकाळ यांनी काल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला होता. सपकाळ म्हणाले की, काँग्रेसने सत्तेचे विकेंद्रीकरण केले, मात्र मोदी सरकार सत्तेचे केंद्रीकरण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. १४० कोटी लोकसंख्येच्या देशात केवळ काही आमदार आणि खासदारांद्वारे प्रतिनिधित्व करणे कठीण असल्याने नगरसेवक, सरपंच, सभापती आणि महापौर पदांची निर्मिती करून सत्ता लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली. मात्र, भाजपाला – विशेषतः नरेंद्र मोदींना केंद्रात आणि देवेंद्र फडणवीसांना राज्यात – सत्ता स्वतःच्या हातात ठेवायची असल्यामुळेच गेल्या तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीत. परिणामी, राज्यात प्रशासन राज सुरू असून सामान्य नागरिकांच्या अधिकारांवर गदा आणली जात असल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला.