मुंबई – भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangehskar) मागील सप्ताहापासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात कोविड-१९च्या संसर्गाच्या कारणाने दाखल आहेत. लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर प्रतित सामदानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळेच डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना आणखी काही दिवस उपचार करण्यात येतील. त्यांची प्रकृती आधी प्रमाणेच स्थिर आहे. कोणालाही त्यांना भेटण्याची परवानगी नाही असेही डॉक्टरांनी सांगितले आहे.
सर्वांनाच कुटुंबाची प्रायव्हसी जपण्याचे आवाहन
डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीबद्दल वेळोवेळी माहिती देण्यात येत असून वयोमानानुसार त्यांची काळजी घेण्याची गरज असल्यानेच त्या अतिदक्षता कक्षात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार केले जात आहेत. प्रकृती स्थिर असली तरी त्यांना कोविड आणि न्युमोनिया झाल्यामुळे त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली आणखी काही दिवस ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. लता मंगेशकर यांच्या कुटुंबियांनी चाहत्यांसह सर्वांनाच कुटुंबाची प्रायव्हसी जपण्याचे आवाहन केले आहे.