मुंबई : संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर हे नेते उपस्थित नव्हते. त्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता, कोण ओ मिलिंद नार्वेकर? पूर्वी मातोश्रीमध्ये बॉयचं काम करायचे ते काय? हो… अशी खील्ली नारायण राणे यांनी उडवली होती. त्यावरून आता शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकरांनी राणेंना टोला लगावलाय. नार्वेवकर म्हणाले, बॉय का? अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करून विनंत्या केल्याचं विसरलात? वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?
काय म्हणाले होते राणे
संजय राऊत यांच्या मंगळवारच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, एकनाथ शिंदे हे नेते उपस्थित नव्हते. त्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता, कोण ओ मिलिंद नार्वेकर? पूर्वी मातोश्रीमध्ये बॉयचं काम करायचे ते काय? हो… माझ्यासमोरची गोष्ट आहे ओ. मी पाहिलं आहे, बेल मारली की येस सर… काय आणू? असं म्हणणारा आता नेता बनला. काय अपग्रेडेशन स्पीड आहे ओ, अशा शब्दात राणेंनी मिलिंद नार्वेकरांची खिल्ली उडवली.