Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar News: ‘आठवा अजूबा’ ब्रीजवर पुन्हा वाद; नवराष्ट्रच्या बातमीनंतर मनसे प्रशासनाला धारेवर धरणार

मिरा-भाईंदरमधील तथाकथित ‘आठवा अजूबा’ ब्रीज पुन्हा एकदा चर्चेत आला असून ब्रीजवरील त्रुटींनंतर मनसे आक्रमक झाली आहे. शहराध्यक्ष संदीप राणे यांनी प्रत्यक्ष पाहणी करत ब्रीजची दुरुस्ती करून तातडीने उद्घाटन करण्याची मागणी केली आहे. रखडलेल्या प्रकल्पातील विलंब आणि कथित अनियमिततेची चौकशी करण्याची मागणीही मनसेने केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 09, 2026 | 12:17 PM
‘आठवा अजूबा’ ब्रीजवर पुन्हा वाद; नवराष्ट्रच्या बातमीनंतर मनसे प्रशासनाला धारेवर धरणार

‘आठवा अजूबा’ ब्रीजवर पुन्हा वाद; नवराष्ट्रच्या बातमीनंतर मनसे प्रशासनाला धारेवर धरणार

Follow Us
Follow Us:
  • ‘आठवा अजूबा’ ब्रीज पुन्हा वादात
  • मनसेची तातडीने उद्घाटनाची मागणी
  • थूक पट्टीनंतर मनसे आक्रमक
विजय काते, मीरा- भाईंदर: मीरा- भाईंदर शहरातील नागरिकांच्या दळणवळणासाठी महत्त्वाचा मानला जाणारा तथाकथित “आठवा अजूबा” ब्रीज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ब्रीजवरील काही भागांवर पुन्हा थूक पट्टी लावण्यात आल्याचे समोर आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली असून, ब्रीजचे काम पूर्ण करून तातडीने उद्घाटन करावे, अशी मागणी मनसेने केली आहे. दैनिक नवराष्ट्र मध्ये या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर मनसेचे मिरा-भाईंदर शहराध्यक्ष संदीप राणे यांनी कार्यकर्त्यांसह संबंधित ब्रीजची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी ब्रीजच्या रखडलेल्या कामकाजावर आणि वारंवार समोर येणाऱ्या त्रुटींवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

या प्रकरणावर संदीप राणे म्हणाले की, नागरिकांच्या पैशातून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. ब्रीजचे काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात विविध त्रुटी समोर येत आहेत. त्यामुळे हा प्रकल्प भ्रष्टाचाराचे प्रतीक बनला असून नागरिकांमध्ये त्याबाबत तीव्र नाराजी आहे. मनसेच्या वतीने प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडे ब्रीजची आवश्यक दुरुस्ती करून तो तातडीने वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच या प्रकल्पातील विलंब आणि कथित अनियमिततेची चौकशी करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता “आठवा अजूबा” ब्रीज लवकर सुरू झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Mira Bhayandar: गोल्डन चौकी परिसरात अनधिकृत मशिद आणि मंदिरावर कारवाई; परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

स्थानिक नागरिकांच्या मते, मिरा-भाईंदर परिसरात वाढती वाहतूक कोंडी ही मोठी समस्या बनली आहे. अशा परिस्थितीत हा ब्रीज लवकर सुरू झाल्यास वाहतुकीचा ताण कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. मात्र, वारंवार उघड होत असलेल्या त्रुटींमुळे या प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. दरम्यान, प्रशासनाकडून ब्रीजच्या कामासंदर्भात अंतिम निर्णय आणि उद्घाटनाची तारीख जाहीर होण्याची प्रतीक्षा नागरिक करत आहेत.

मिरा-भाईंदर येथील ‘आठवा अजूबा ब्रीज’ (उड्डाणपूल) हा एमएमआरडीए (MMRDA) द्वारे उभारण्यात आलेला एक वादग्रस्त पूल आहे, जो त्याच्या विचित्र रचनेमुळे सोशल मीडियावर ‘आठवा अजूबा’ म्हणून प्रचंड ट्रोल झाला. हा १०० कोटींचा डबल-डेकर चार पदरी पूल असून, तो पुढे फाटकाजवळ उतरताना अचानक दोन पदरी होतो. हा उड्डाणपूल मिरा-भाईंदर शहरात मेट्रो मार्गासमांतर उभारण्यात आला आहे .या विचित्र बांधकामामुळे भविष्यात मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता। वाढत्या टीकेमुळे या पुलाच्या डिझाईनवरून मोठा राजकीय वादही निर्माण झाला होता. पुलाच्या या रचनेवर खुलासा करताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते की, जागेच्या अभावामुळे आणि मेट्रोच्या खांबांमुळे पुलाला उतरताना अरुंद करणे भाग पडले.

Mira Bhayandar crime: भाईंदरमध्ये खळबळ! गुरुद्वारासमोरील झुडपांत सापडला अर्धनग्न जळालेला मृतदेह; पोलीस तपास सुरु

Web Title: Mns demand eighth wonder bridge opening mira bhayander

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 12:17 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mira Bhayander
  • MNS

संबंधित बातम्या

काँग्रेसने गुंडाळलेल्या योजनांना मुख्यमंत्र्यांची गती, ‘७५ वर्षे शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले’; रवींद्र चव्हाणांचा घणाघात
1

काँग्रेसने गुंडाळलेल्या योजनांना मुख्यमंत्र्यांची गती, ‘७५ वर्षे शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले’; रवींद्र चव्हाणांचा घणाघात

Maharashtra Earthquake: महाराष्ट्र हादरलं! नाशिकमध्ये 3.6 तर पालघरमध्ये 3.1 रिश्टर तीव्रतेचा भूकंप, प्रशासन सतर्क, जीवितहानी नाही
2

Maharashtra Earthquake: महाराष्ट्र हादरलं! नाशिकमध्ये 3.6 तर पालघरमध्ये 3.1 रिश्टर तीव्रतेचा भूकंप, प्रशासन सतर्क, जीवितहानी नाही

Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यासाठी मोठी घोषणा! दलित वस्त्यांच्या विकासासाठी ५ कोटींच्या कामांना मंजुरी
3

Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यासाठी मोठी घोषणा! दलित वस्त्यांच्या विकासासाठी ५ कोटींच्या कामांना मंजुरी

८.६८ लाख पशुधनाला लसीकरणाचे कवच! पशुसंवर्धन विभागाची मोहीम; घटसर्प, एकटांग्या, आंत्रविकार आजारावर उपचार
4

८.६८ लाख पशुधनाला लसीकरणाचे कवच! पशुसंवर्धन विभागाची मोहीम; घटसर्प, एकटांग्या, आंत्रविकार आजारावर उपचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.