Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MSRTC Electric Bus : एसटीच्या ई-बस पुरवठ्यात मोठा घोळ? 1,288 बसांचे लक्ष्य अपूर्ण; कंत्राट रद्द करण्याची मागणी

MSRTC Electric Bus News : एसटी महामंडळासाठी भाडेतत्त्वावर इलेक्ट्रिक बस पुरविणाऱ्या कंत्राटदार कंपनीला दिलेली वाढीव मुदत संपल्यानंतरही १,२८८ बस पुरवठ्याचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 22, 2026 | 12:20 PM
एसटीच्या ई-बस पुरवठ्यात मोठा घोळ? 1,288 बसांचे लक्ष्य अपूर्ण; कंत्राट रद्द करण्याची मागणी

एसटीच्या ई-बस पुरवठ्यात मोठा घोळ? 1,288 बसांचे लक्ष्य अपूर्ण; कंत्राट रद्द करण्याची मागणी

Follow Us
Follow Us:
  • एसटीच्या ई-बस पुरवठ्यात मोठा घोळ?
  • 1,288 बसांचे लक्ष्य अपूर्ण
  • कंत्राट रद्द करण्याची मागणी
मुंबई : एसटी महामंडळासाठी भाडेतत्त्वावर इलेक्ट्रिक बस पुरविणाऱ्या कंत्राटदार कंपनीला शासनाने दिलेली वाढीव मुदत आज संपुष्टात आली. मात्र, ठरवून दिलेले १,२८८ बस पुरवठ्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात कंपनी अपयशी ठरल्याने सरकारने हे कंत्राट तत्काळ रद्द करावे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

भाडेतत्त्वावरील ५,१५० इलेक्ट्रिक बस घेण्याच्या प्रकल्पाचे उद्घाटन १३ फेब्रुवारी २०२४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. करारानुसार दरमहा २१५ बसेस एसटीला उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात बस पुरवठा अत्यंत संथ गतीने झाल्याचा आरोप बरगे यांनी केला.

Maharashtra Weather: उकाड्यानंतर पावसाची हजेरी; मुंबई उपनगरात रिमझिम पावसाने वातावरण आल्हाददायक

यावेळी बरगे यांनी म्हटलं की, आतापर्यंत इलेक्ट्रिक बस पुरवठादारांकडून एसटीला ९ मीटर लांबीच्या २६० आणि १२ मीटर लांबीच्या ४७८ अशा फक्त ७३८ बसेसच मिळाल्या आहेत. शासनाने मध्यस्थी करत कंपनीला २२ मे २०२६ पर्यंत १,२८८ बस पुरवठ्याचे सुधारित उद्दिष्ट दिले होते. मात्र, वाढीव मुदतीनंतरही सदर कंपनी अपेक्षित बसेस पुरविण्यात अपयशी ठरली आहे.“मुदतवाढ, सवलती आणि शासनाची नरमाई यामुळेच कंत्राटदार कंपनीला वारंवार अभय मिळाले. आता तरी राज्य सरकार कंपनीवर कारवाई करणार का?” असा सवाल बरगे यांनी उपस्थित केला असून दम असेल तर कारवाई करून दाखवा, असे आव्हानही बरगे यांनी सरकारला दिले.

वेळेत बस पुरवठा न केल्यामुळे कंपनीकडून सुमारे १५ कोटी रुपयांचा दंड आकारला जाणे अपेक्षित आहे . तसेच, या प्रकल्पामुळे एसटीला आतापर्यंत १६१.३१ कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे, आधीच आर्थिक संकटात असलेल्या एसटीला ही तोट्याची रक्कम सरकारने भरून द्यावी, अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने २०३७ पर्यंत महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या (MSRTC) २२,००० बसेसचा संपूर्ण ताफा पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतरित करण्याचे महत्त्वपूर्ण लक्ष्य ठेवले आहे. राज्याने नवीन डिझेल बसेसची खरेदी पूर्णपणे रद्द केली आहे.

२०३७ पर्यंत १००% ई-बस
महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या म्हणण्यानुसार, २०३७ पर्यंत आपल्या संपूर्ण MSRTC ताफ्याचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करणारे भारतातील पहिले राज्य बनण्याच्या मार्गावर राज्य आहे.

Thane Station News: ठाणे रेल्वे स्थानक होणार ‘हायटेक’; प्रवाशांसाठी वाढणार अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाच्या सुविधा!

Web Title: Msrtc electric bus contract demand cancel over delay in supply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 12:20 PM

Topics:  

  • Electric Buses
  • maharashtra
  • msrtc
  • Shrirang Barge
  • st bus

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
1

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन
2

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक
3

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती
4

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.