मुंबई : मुंबै बँक, ठेवीदार व सहकार विभागाची मजूर असल्याचे भासवून फसवणूक केल्याप्रकरणी अटकेची टांगती तलवार असलेले विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने कोणताही दिलासा देण्यास नकार दिला. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात अटक न करण्याची त्यांची मागणीही फेटाळून लावली. तसेच अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात रितसर याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले(Mumbai Bank bogus labor case: Sword hanging over Praveen Darekar).
दरेकर हे २० वर्षे मजूर या प्रवर्गातून मुंबै बँकेवर निवडून येत होते. मात्र दरेकर हे मजूर नाहीत, अशी तक्रार आपचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे केली होती. ही तक्रार विभागीय सहनिबंधक बाजीराव शिंदे यांच्याकडे वर्ग करण्यात आली होती.
विभागीय सहनिबंधकांनी दरेकर यांच्यावर नोटीस बजावली. आपण मजूर कसे आहात हे सिद्ध करण्यास सांगितले. मात्र दरेकर यांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर केली नाहीत. अखेर ३ जानेवारी २०२२ रोजी विभागीय सहनिबंधकांनी दरेकर यांना मजूर संस्थेचे सदस्य म्हणून अपात्र ठरविले. त्यानंतर ‘आप’च्या धनंजय शिंदे यांनी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात दरेकर यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याबाबत तक्रार दाखल केली. त्याविरोधात दरेकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेत अटकेपासून दिलासा देण्यात यावा, अशी मागणी केली. त्यावर बुधवारी न्या. प्रसन्न वराळे आणि न्या. श्रीराम मोडक यांच्या खंडपीठापुढे तातडीची सुनावणी पार पडली.
आज दैवकृपेने आणि जनतेच्या आशिर्वादाने लोकप्रिनिधींनी आहोत. मात्र ‘त्या’ काळात सहकारी संस्थेत मी मूजरच होतो’. प्रतिज्ञा या मजूर सहकारी संस्थेत साल १९९७ मध्ये सभासद होतो. मात्र २५ वर्षांपूर्वीच्या याप्रकरणात पोलिसांनी नोंदवलेली ही तिसरी एफआयआर आहे अशी माहिती दरेकरांच्यावतीने ज्येष्ठ वकील आभात पोंडा यांनी खंडपीठाला दिली. तसेच मुंबई बँकेतील अध्यक्षपदाचा गैरवापर करत आर्थिक अफरातफर केल्याचा आरोपही बिनबुडाचा असल्याचा दावा करत दरेकरांना तातडीचा दिलासा देण्याची विनंती केली.
राज्य सरकारकडून दरेकरांच्या याचिकेला विरोध केला. तूर्तास दरेकरांविरोधात कोणतीही कठोर कारवाई करणार नसल्याची हमी देता येणार नाही. हे प्रकरण दरेकरांनी मजूर असल्याबद्दल दिलेल्या चुकीच्या माहितीला अनुसरून दाखल करण्यात आला आहे. सहकार विभागाच्या विभागीय सहनिबंधकांनी दरेकरांचे मजूरपद रद्द केलेले आहे. याचा तपास मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा करत असलेल्या मुंबई बँकेतील आर्थिक घोटाळ्यातील गुन्ह्याशी थेट संबंध नाही.
तसेच दरेकरांविरोधात हा गुन्हा दाखल होऊन फक्त दोनच दिवस झाले आहेत. त्यामुळे तपास प्राथमिक अवस्थेत असताना आरोपीला कोणताही दिलासा देणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे कारवाई पूर्वी ७२ तासांची नोटीसही सध्या देता येणार नाही, येत्याकाळात आवश्यकता भासल्यास आम्ही यावर प्रतिज्ञापत्र सादर करू अशी माहिती सरकारी वकील अरूणा पै यांनी या याचिकेला उत्तर देताना दिली. त्यांची दखल घेत खंडपीठाने दरेकर यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावत त्यांना दिलासा देण्यास नकार दिला.
मजूर असल्याचे भासवून दरेकर मुंबै बँकेवर संचालक व अध्यक्ष म्हणून अनेक वर्षांपासून निवडून येत आहेत. या काळात मुंबई बँकेत कोटय़वधी रुपयांचे घोटाळे झाल्याच्या अनेक तक्रारी असून त्याबाबत सहकार विभागाने वेळोवेळी सहकार कायदा १९६० च्या कलम ८९ अ अंतर्गत चौकशी करून अहवालही दिले आहेत. २०१५ पासून नाबार्डच्या काही अहवालात मुंबै बँकेतील अनियमितता व घोटाळय़ांवर ठपका ठेवण्यात आला आहे. २०१३ साली सहकार विभागाने ८९ अ अंतर्गत केलेल्या चौकशीत संचालक मंडळाने मुंबई बँकेची व ठेवीदारांची संगनमताने फसवणूक केल्याचे, विश्वासघात केल्याचे स्पष्टपणे नमूद करत कारवाईची शिफारस केली होती. मात्र, या अहवालावर सहकार विभागाकडून आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नव्हती. मात्र, २०२० मध्ये सहनिबंधक मुंबई बाजीराव शिंदे यांनी ८९अ खाली चौकशी करून अहवाल सादर केला होता. तसेच सहकार कायदा कलम ८३ अंतर्गत चौकशीचे आदेश जारी केले. यामुळे नेमके कोणी घोटाळे केले याची जबाबदारी निश्चित होणार आहे. मुंबै बँकेतील कथित गैरव्यवहाराबाबत आर्थिक गुन्हे विभागानेही गुन्हे दाखल केले आहेत. त्याचप्रमाणे सहकार विभागाचे विशेष लेखापरीक्षक नीलेश नाईक यांनी मुंबै बँकेचा चाचणी लेखापरीक्षण अहवाल तयार करून सहकार विभागाला सादर केला आहे. या अहवालाचा आढावा घेतल्यास २०१५ ते २०२० या काळात मुंबै बँकेत सुमारे दोन हजार कोटींचा आर्थिक घोटाळा व अनियमितता झाल्याचे दिसून येत असून याची चौकशी आर्थिक गुन्हे विभागाने करावी, अशी मागणी धनंजय शिंदे यांच्याकडून करण्यात आली आहे.
[read_also content=”भांडण, कटकटी, आजारपण, पैसा टिकत नाही, लग्न जुळत नाही… होलिका दहनाच्या दिवशी करा हा एक छोटाशा उपाय; आयुष्यातील सर्व Problems होळीत जळून राख होतील https://www.navarashtra.com/religion/religion/do-this-on-the-day-of-holika-dahan-is-a-small-solution-all-the-problems-in-life-will-be-burnt-to-ashes-in-holi-nrvk-252446.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]