मुंबईकरांनो, रविवारी घराबाहेर पडण्याआधी लोकलचे वेळापत्रक बघा, अन्यथा...
मध्य रेल्वेवर उद्या म्हणजेच रविवारी, (14 जुलै) रेल्वे रुळांच्या देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. जेणेकरून आठवड्याच्या उर्वरित काळात प्रवाशांना कोणत्याही गैरसोयीला सामोरे जावे लागू नये. यासाठी मध्य रेल्वेकडून मेगा ब्लॉकची घोषणा केली आहे. त्याअंतर्गत मध्य मार्गावरील ठाणे आणि दिवा स्थानकांच्या ५ आणि ६ क्रमांकावर सकाळी १०.५० ते दुपारी ३.२० पर्यंत ब्लॉक असेल. यासोबतच हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. ट्रान्सहार्बर आणि वेस्टर्न लाईनवर कोणत्याही प्रकारचा ब्लॉक असणार नाही. रविवार 14 जुलै रोजी प्रवास करणाऱ्यांनी रेल्वेचे वेळापत्रक आणि ट्रेनची उपलब्धता तपासल्यानंतरच प्रवास करावा.
कुठे :ठाणे – दिवादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर
कधी : सकाळी १०.५० ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत
परिणाम – सकाळी ९.४६ सीएमटी – बदलापूर, सकाळी १०.२८ सीएमटी – अंबरनाथ, दुपारी २.४२ सीएमटी – आसनगाव, दुपारी ३.१७ वाजता कल्याण – सीएसएमटी धिम्या मार्गाने वळवण्यात येईल. तसेच सकाळी 9.50 वाजता, ताची वसई रोड-दिवा मेमू कोपरपर्यंत धावेल. कोपर ते दिवा स्थानकांदरम्यान लोकल रद्द करण्यात येणार आहेत. सकाळी 11.45 वाजता, ताची दिवा – वसई रोड मेमू कोपरवरुन धावेल. दुपारी 12.55 वाजता वसई रोड-दिवा मेमू कोपरपर्यंत धावेल. दुपारी 2.45 वाजता दिवा-वसई रोड मेमू कोपरवृण येथून धावेल. रत्नागिरी – दिवा जलद पॅसेंजर पनवेल येथे बंद ठेवण्यात येणार आहे.
कुठे: कुर्ला-वाशी दरम्यानचा अप आणि डाऊन मार्ग
कधी: सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – पनवेल/बेलापूर अप आणि डाऊन लोकल रद्द होतील. सीएसएमटी-कुर्ला, पनवेल-वाशी दरम्यान विशेष लोकल धावणार आहे. ब्लॉक काळात हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकादरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
कुठे: माहीम दरम्यान मुंबई सेंट्रल – अप आणि डाउन
कधी : शनिवारी मध्यरात्री १२.१५ ते पहाटे ४.१५
परिणाम: ब्लॉक कालावधी दरम्यान, सर्व अप आणि डाऊन एक्स्प्रेस मार्ग सांताक्रूझ – चर्चगेट दरम्यान धीम्या मार्गावर वळवले जातील. त्याचप्रमाणे पश्चिम रेल्वेवर रविवारचा ब्लॉक रद्द करण्यात आला.