मुंबई : भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणी दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मजूर असल्याचे भासवून वर्षानुवर्ष मुंबई बँक, हजारो ठेवीदार आणि सहकार विभागाची फसवणूक केल्याचा दरेकर यांच्यावर आरोप आहे. याबाबत आम आदमी पक्षाने दोन महिन्यांपूर्वी तक्रार दाखल केली होती. याच प्रकरणी आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे(Praveen Darekara charged in Mumbai Bank case; The case of contesting elections from the working class).
मजूर नसुन देखील याच संवर्गातून मुंबै बँकेच्या संचालकपदाची निवडणूक लढवून सुमारे २० वर्षे सरकारची फसवणूक केली असल्याचा आरोप दरेकरांवर करण्यात आला आहे. मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलिस स्टेशनमध्ये प्रवीण दरेकरांविरोधामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. आम आदमी पक्षाचे नेते धनंजय शिंदेंच्या तक्रारीवरुन या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
मुंबै बँकेची निवडणूक झाली त्यावेळी मजूर म्हणून प्रवीण दरेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला होता. या निवडणुकीमध्ये ते निवडून देखील आले होते. परंतु सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवले होते. दरेकर १९९७ पासून मुंबै बँकेवर मजूर प्रवर्गातून संचालक म्हणून निवडून येत आहेत. मात्र मजूर नसतानाही निवडणूक लढवून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
[read_also content=”भांडण, कटकटी, आजारपण, पैसा टिकत नाही, लग्न जुळत नाही… होलिका दहनाच्या दिवशी करा हा एक छोटाशा उपाय; आयुष्यातील सर्व Problems होळीत जळून राख होतील https://www.navarashtra.com/religion/religion/do-this-on-the-day-of-holika-dahan-is-a-small-solution-all-the-problems-in-life-will-be-burnt-to-ashes-in-holi-nrvk-252446.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]