RVG Educational Foundation चा वार्षिक दिन सोहळा थाटामाटात संपन्न
आरव्हीजी एज्युकेशनल फाउंडेशनच्या वतीने आयोजित वार्षिक दिन समारोह दिनांक 5 ऑक्टोबर 2025 रोजी मुकेश पटेल ऑडिटोरियम, एनएमआयएमएस परिसर, विले पार्ले (पश्चिम), मुंबई येथे अत्यंत आनंदोत्साही व गौरवपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या विशेष सोहळ्यात ICAI चे अध्यक्ष चरणजोत सिंग नंदा मुख्य अतिथी म्हणून आणि टेक्नोक्राफ्ट ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शरद सराफ विशिष्ट अतिथी म्हणून उपस्थित होते.
समारंभाची सुरुवात आरव्हीजी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी झाली, त्यानंतर सन्मान सोहळा पार पडला. अलीकडेच झालेल्या सीए IPCC व सीए फाइनल परीक्षांमध्ये ऑल इंडिया रँक 1 मिळवलेल्या सीए राजन काबरा व इतर मेरिट होल्डर विद्यार्थ्यांना स्वर्णपदक (गोल्ड मेडल) प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
याशिवाय, आरव्हीजीच्या त्या विद्यार्थ्यांना, ज्यांनी मागील दोन सीए फायनल परीक्षांमध्ये सर्वाधिक गुण मिळवले, तसेच सर्वोत्कृष्ट विद्यार्थी व विद्यार्थीनी निवडले गेले, त्यांना स्लिव्हर मेडल देऊन गौरवण्यात आले.
आरव्हीजी एज्युकेशनल फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील गोयल यांनी विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आणि सांगितले की आरव्हीजी सतत प्रगतीच्या मार्गावर अग्रसर आहे, तसेच विद्यार्थ्यांचे यश संस्थेची प्रतिष्ठा अधिक दृढ करते. त्यांनी अशीही घोषणा केली की, विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येच्या मागणीला पाहता, 1800 हून अधिक विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे नवीन छात्रावास भवन बांधणीच्या प्रक्रियेत आहे, ज्याची पूर्णता वर्ष 2028 पर्यंत होणार आहे.
Mumbai Water Supply : मुंबईकरांवर पाणीकपाकीचं संकट; ‘या’ दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद
या प्रकल्पासाठी आरव्हीजी अलुमनी आणि समाजातील दानवीरांकडून उत्साहवर्धक पाठिंबा मिळाला आहे. संस्थेचे वरिष्ठ ट्रस्टी सुशील गाडिया यांनीही या प्रतिष्ठित संस्थेशी जोडले गेले याबद्दल अभिमान व्यक्त केला आणि सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सेवेत योगदान देणे हे त्यांच्या साठी अत्यंत सन्मानाचे आहे. मुख्य अतिथी व विशिष्ट अतिथींचे प्रेरणादायक मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी उत्साहवर्धक ठरले आणि त्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी प्रेरणा दिली.