मुंबईकरांवर सध्या पाणीकपातीचं सावट येताना दिसत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील जलशद्धीकरणासाठी केंद्रातील 100 किलोव्हॅट विद्युत केंद्रामधील विद्युत मीटर अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. याकामासाठी मुंबईत पुढील दोन दिवस पाणीकपातीला नागरिकांना सामोरं जावं लागणार आहे. जलशुद्धीकरणाच्या या कामामुळे मुंबईतील काही भागात सलग तीन दिवस पाणीकपात असू शकते असं पालिकेच्य़ा वतीने सांगण्यात आलेलं आहे.
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
पिसे, पांजरापूर येथील जलशुद्धीकरण कामामुळ उद्या म्हणजेच मंगळवार आणि बुधवारी दिनांक 7,8 आणि 9 ऑक्टोबर रोजी मुंबईत पाणीकपात राहणार आहे. तसंच हे काम अत्यावश्यक असल्या कारणाने काही ठिकाणी मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे सलग तीन दिवस पाणी नसणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरा असं आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे.
मुंबईतील या भागात होणार पाणीकपात
शहर विभागातील ए, बी, ई, एफ दक्षिण आणि एफ उत्तर विभागात संपूर्ण कार्यक्षेत्रात तसेच, पूर्व उपनगरांतील एम पूर्व आणि एम पश्चिम विभागात संपूर्ण परिसरात 10 टक्के पाणी कपात लागू केली जाणार आहे. पूर्व उपनगरांतील एल विभाग (कुर्ला पूर्व), एन विभागात विक्रोळी, घाटकोपर व घाटकोपर पूर्व, एस विभागात भांडूप, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी पूर्व आणि टी विभागाात मुलुंड पूर्व आणि पश्चिम क्षेत्रात 10 टक्के पाणी कपात होणार असल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे नागरिकांनी उद्या म्हणजेच मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी पाणी जपून वापरावं असं पालिकेच्य़ा वतीने आवाहन करण्यात आलेलं आहे.
वेगावर नियंत्रणासाठी आणखी गतिरोधक? BMCचा विचार – वाहतूक विभागाशी चर्चा सुरू