प्रताप सरनाईक यांचा थेट आदेश (Photo Credit- X)
मंत्री सरनाईक यांनी बैठकीत ठाणे व मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील MMRDA च्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. सेवा रस्ता विलीनीकरण घोडबंदर मार्गाचा भाग असलेल्या कापुरबावडी ते गायमुख या १०.३२ किलोमीटर मार्गाचे सेवा रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करून ते मुख्य रस्त्यामध्ये ३१ डिसेंबर अखेर विलीन करण्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
🗓️ ६ ऑक्टोबर २०२५ 📍 वांद्रे ठाणे व मिरा-भाईंदर म.न.पा. क्षेत्रातील विविध विकास कामाबाबत MMRDA अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली. यावेळी खालील कामांबाबत आढावा घेण्यात आला. – ठाणे आणि मीरा-भाईंदर क्षेत्रातील रहिवाशांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या मेट्रो ४ व ९ मार्गिकेची… pic.twitter.com/M2msM3X4eJ — Pratap Baburao Sarnaik (@PratapSarnaik) October 6, 2025
ठाणे व मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. विशेषतः मिरा-भाईंदर महापालिका हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महाराणा प्रताप पुतळा दरम्यानच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण जलद गतीने करण्याचे निर्देश दिले.
मेट्रोच्या पुलाचे काम सुरू असताना, त्याखालील मोकळ्या जागेवर भविष्यात अतिक्रमण होऊ नये यासाठी मंत्री सरनाईक यांनी महत्त्वाचा सल्ला दिला.






