Sanjay Raut News: "नैतिकता पाळायची म्हटलं तर ९० टक्के मंत्रिमंडळ खाली होईल'; संजय राऊतांची जहरी टीका
Sanjay Raut News: “सगळ्यात आधी महत्त्वाचा विषय इतकाच आहे. बेकायदेशीर काम करणाऱ्या लोकांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना फोन केला. त्या अर्थी ती लोक त्यांचीच असू शकतात, कार्यकर्ते असू शकतात, आणि बेकायदेशीर कामाला संरक्षण द्या हे सांगण्यासाठी फोन केला.” अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी थेट उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. सोलापूरमधील माढा तालुक्यात झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील संभाषण व्हायरल झाल्यानंतर संजय राऊतांनी यावरून टीकास्त्र डागले आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. अंजना कृष्णा आणि अजित पवार यांच्यात झालेल्या संभाषणानंतर राऊत यांनी अजित पवारांच्या कारभाराबाबत शंका उपस्थित केल्या आहेत. संजय राऊत म्हणाले की, अजित पवार नेहमी आपल्या भाषणात सांगत असतात की ते कोणतेही नियमबाह्य काम करत नाहीत. “जर नियम बसत नसेल तर मी हो म्हणत नाही,” असे ते म्हणतात. पण त्यांच्या बेकायदेशीर कामांना संरक्षण मिळावं, कारवाई होऊ नये यासाठी ते थेट अधिकाऱ्यांशीश वाद घालत होते.
Bihar Election 2025 : देशभरात एकाच वेळी SIR लागू करणार, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
याला तणाव म्हणत नाहीत तर दादागिरी म्हणतात. मी अजित पवारांना म्हणत नाही, पण सध्याचे सरकार जवळजवळ अर्धे मंत्रिमंडळ अशा कामांना संरक्षण देते. आम्ही अजित पवारांना गुन्हेगार ठरवत नाही, पण त्यांनी उगाच नाकाने कांदे सोलू नये, ज्या पद्धतीने लोकांना ज्ञान देताना जे बोलत असतात, त्यात त्यांचेही पाय मातीचे आहेत.अशी बोचरी टीकाही संजय राऊतांनी यावेळी केली.
राऊत म्हणाले, “पहिली धमकी अजित पवारांनी दिली आणि दुसरी धमकी म्हणजे, जर तुम्ही आमच्या नेत्याबद्दल काही बोलाल, तर आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात काम करू देणार नाही. अस त्या आमदाराने पत्रातूमन स्पष्ट होतयं. एका महिला अधिकाऱ्याने केवळ राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना नियम आणि कायदा काय असतो, हे सांगितले, जो त्यांच्या कामाचा भाग होता. यावरून त्या आमदाराने युपीएससीला लिहीलेल्या पत्रात संबंधित महिला अधिकाऱ्याची चौकशी करण्यास सांगितले आहे. पण आयएएस, आयपीएस आणि भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रत्येक अधिकाऱ्याचे काम म्हणजे जर मंत्री किंवा राज्यकर्ते चुकत असतील, तर त्यांना नियम काय आहे, संविधान काय आहे हे दाखवणे. त्या महिला अधिकाऱ्याचं काय चुकलं?” असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
नैतिकतेचा मुद्दा असेल आणि महाराष्ट्रात नैतिकता पाळायची म्हटलं तर महाराष्ट्रातील 90% मंत्रिमंडळ खाली होईल, शिंदे गटाचे सगळे मंत्री घरी जातील नैतिक त्याच्या मुद्द्यावर अजित पवारांचे सर्व मंत्री घरी जातील, प्रत्येकावर आरोप आणि गुन्हे आहेत.प्रत्येक जण आजही सरकारमध्ये बसून बेकायदेशीर काम करत आहे कालची तर गोष्ट सोडून द्या नैतिकेच्या मुद्द्यावर करायचं म्हटलं तर निम्म मंत्रिमंडळ हे 24 तासात घरी जायला पाहिजे, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.
सिडकोमधील तब्बल 5000 कोटींचा भूखंड बेकायदेशीरपणे हस्तांतरित केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. आमदार संजय शिरसाट यांनी भिवलकर नावाच्या व्यक्तीच्या हातात हा भूखंड बेकायदेशीरपणे दिल्याचे पेपर रोहित पवार यांनी उघड केले आहेत. गणेशोत्सवानंतर हा विषय पुन्हा गाजणार असल्याचे संकेत असून, या प्रकरणात गुन्हे दाखल होऊन तुरुंगवासाची शक्यता असल्याचेही बोलले जात आहे.
फक्त 28 दिवसांसाठी सिडकोचे चेअरमन म्हणून झालेल्या आमदाराच्या नेमणुकीदरम्यान इतक्या मोठ्या मूल्याचा भूखंड गैरकायदेशीरपणे हस्तांतरित करण्यात आला, असा आरोप आहे. हे प्रकरण सरळ गुन्हेगारी स्वरूपाचे असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. याशिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 3000 कोटींपेक्षा जास्त किमतीची टेंडर्स दिली असून, सर्वोच्च न्यायालयाने यावर ताशेरे मारले आहेत. परंपरेनुसार न्यायालयाने मंत्र्यावर किंवा मुख्यमंत्र्यावर अशी कठोर टीका केल्यास राजीनामा देण्याची पद्धत आहे. शिवाजीराव निलंगेकर पाटील किंवा अंतुले यांसारख्या नेत्यांना पूर्वी न्यायालयीन कारवाईनंतर पदत्याग करावा लागला होता.