युकी भांब्री आणि मायकेल व्हीनस(फोटो-सोशल मीडिया)
US Open 2025 : न्यूयॉर्कमधील फ्लशिंग मीडोज येथे सुरू असलेल्या यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या पदरी निराशा पडली आहे. भारताचा स्टार खेळाडू युकी भांब्री आणि त्याचा न्यूझीलंडचा जोडीदार मायकेल व्हीनस यांना उपांत्य फेरीत ब्रिटिश जोडी जो सॅलिसबरी आणि नील स्कुप्सकी यांच्याकडून ६ (२)-७, ७-६ (५), ६-४ असा पराभव पत्करावा लागला.
सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही जोड्यांमध्ये जोरदार स्पर्धा झाली. पहिल्या सेटमध्ये ३-३ असा बरोबरी होता. भांब्री आणि व्हीनस यांनी हळूहळू आघाडी घेतली आणि सेट टायब्रेकरमध्ये नेला. टायब्रेकरमध्ये भारत-न्यूझीलंड जोडीने शानदार कामगिरी करत ७-२ असा विजय मिळवला आणि पहिला सेट जिंकला.
दुसऱ्या सेटमध्ये भांब्री आणि व्हीनसने सुरुवातीला ब्रेक घेत आघाडी घेतली. तथापि, सॅलिसबरी आणि स्कुप्सकी यांनी हार मानली नाही आणि सेट टायब्रेकरमध्ये नेत पुनरागमन केले. यावेळी ब्रिटिश जोडीने टायब्रेकरमध्ये ७-५ असा विजय मिळवला आणि सामना बरोबरीत आणला. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये दोन्ही जोड्यांनी शानदार खेळ केला, परंतु सॅलिसबरी आणि स्कुप्सकी यांनी संधीचा फायदा घेत सेट आणि सामना ६-४ असा जिंकला. या विजयासह त्यांनी यूएस ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
जगातील नंबर वन टेनिसपटू आर्यना सबालेन्का गुरुवारी अमेरिकेच्या जेसिका पेगुलाला ४-६, ६-३, ६-४ असे पराभूत करून यूएस ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली. पेगुलाने पहिल्या सेटमध्ये शानदार कामगिरी केली आणि पहिला सेट ६-४ असा जिंकला. दुसऱ्या सेटचे पहिले तीन गेम सवालेंकाने जिंकले, पेगुलाची सर्व्हिस ब्रेक करत एका उत्कृष्ट फोरहँड विजेत्याने जिंकली. तिने दुसरा सेट ६-३ असा जिंकला. सबालेंकाने तिसरा सेट ६-४ असा जिंकला.
हेही वाचा : UAE vs AFG : अफगाणिस्तान एक्सप्रेस सुसाट! टी-२० मध्ये घडवला इतिहास; परदेशी भूमीवर केला ‘हा’ एकमेव पराक्रम
नोवाक जोकोविचला यूएस ओपन २०२५ च्या अंतिम फेरीत एंट्री करता आलेला नाही. या स्पर्धेच्या सेमीफायनल सामन्यात त्याला स्टार खेळाडू कार्लोस अल्काराझकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर या सर्बियन खेळाडूच्या निवृत्तीच्या बातम्या जोर धरू लागल्या. आता मात्र त्याने या सर्व गोष्टींवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले आहे की या सर्व अफवा आहेत. यामध्ये काही एक तथ्य नाही. जोकोविचने त्याच्या निवेदनात म्हटले आहे की तो पुढील वर्षी संपूर्ण ग्रँड स्लॅम हंगाम खेळण्याची इच्छा बाळगून आहे. यूएस ओपन २०२५ च्या सेमीफायनल सामन्यामध्ये स्पॅनिश खेळाडू कार्लोस अल्काराझने दिग्गज सर्बियन खेळाडू नोवाक जोकोविचचा ६-४, ७-६ (४), ६-२ असा पराभव केला. यानंतर अल्काराझनेने यूएस लफायनलमध्ये प्रवेश केला.