SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची अपडेट! 7 सप्टेंबरला ऑनलाइन पेमेंट राहणार बंद, काय आहे कारण?
तुम्ही जर एसबीआयचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) जाहीर केले आहे की त्यांची इंटरनेट बँकिंग, योनो लाईट आणि त्यांच्याशी संबंधित सर्व सेवा उद्या म्हणजेच ७ सप्टेंबर २०२५ रोजी बंद राहतील. बँकेने म्हटले आहे की, भारतीय वेळेनुसार पहाटे १:२० ते दुपारी २:२० पर्यंत नियोजित देखभालीमुळे या सेवा तात्पुरत्या बंद राहतील. या काळात, यूपीआय लाईट आणि एटीएम सेवा चालू राहतील. एसबीआयने आपल्या ग्राहकांना कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी वेळ पाहून त्यांचे ऑनलाइन व्यवहार नियोजन करण्याचा सल्ला दिला आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया (sbi) ने आपल्या ग्राहकांना एक सूचना जारी केली आहे. ज्यामध्ये बँकेने म्हटले आहे की देखभालीमुळे इंटरनेट बँकिंग, रिटेल, मर्चंट, योनो लाईट, सीआयएनबी, योनो बिझनेस वेब आणि मोबाइल अॅप आणि योनो सेवा बंद राहतील.
एसबीआयने माहिती दिली आहे की, त्यांचे इंटरनेट बँकिंग, योनो लाईट आणि इतर सेवा ७ सप्टेंबर २०२५ रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे १:२० ते दुपारी २:२० दरम्यान सुमारे एक तास देखभालीच्या वेळापत्रकामुळे बंद राहतील. दरम्यान, या वेळी यूपीआय लाईट आणि एटीएम सेवा उपलब्ध असतील. एसबीआय वेबसाइटनुसार, या वेळी यूपीआय लाईट आणि एटीएम सेवा उपलब्ध असतील.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) च्या वेबसाइटनुसार, यूपीआय लाईट हा एक पेमेंट सोल्यूशन आहे जो १,००० रुपयांपेक्षा कमी किमतीचे व्यवहार जलद आणि पिन-लेस पद्धतीने करण्यासाठी डिझाइन केलेला आहे.
यूपीआय लाईटची मर्यादा दररोज कमाल १,००० रुपये आहे. यासोबतच, एकत्रित वापर दररोज १०,००० रुपये आहे. तसेच, UPI LITE खात्यात कधीही उपलब्ध करून देता येणारी कमाल शिल्लक मर्यादा ५००० रुपये आहे.
तुमच्या कार्डसाठी नवीन पिन तयार करण्यासाठी पिन जनरेशन मेनू वापरा.
SBI ग्राहक नियमित अंतराने त्यांच्या कार्डचा पिन बदलण्यासाठी या सेवेचा वापर करू शकतात.
बॅलन्स चौकशी- SBI ग्राहक रिअल टाइममध्ये त्यांच्या खात्यातील उपलब्ध शिल्लक तपासण्यासाठी या सेवेचा वापर करू शकतात. स्क्रीनवर शिल्लक दिसताच ते व्ह्यू पर्याय निवडून ‘गो ग्रीन’ पर्याय देखील निवडू शकतात.
मिनी स्टेटमेंट- मिनी स्टेटमेंट ग्राहकांना त्यांच्या खात्यातील शेवटच्या १० व्यवहारांची माहिती प्रदान करते.
क्रेडिट कार्ड पेमेंट (व्हिसा)- ग्राहक कोणत्याही व्हिसा क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी या सेवेचा वापर करू शकतात.