Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharavi Redevelopment : शिवसेना नगरसेवकांची संयुक्त शिबिरांची मागणी; धारावी सर्वेक्षणाला गती देण्याचा प्रयत्न

Dharavi Redevelopment News: शिवसेना नगरसेवकांनी सर्व विभागांच्या संयुक्त शिबिरांचे आयोजन करण्याची मागणी केली असून धारावीतील सर्वेक्षण प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यावर भर दिला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 24, 2026 | 12:16 PM
शिवसेना नगरसेवकांची संयुक्त शिबिरांची मागणी; धारावी सर्वेक्षणाला गती देण्याचा प्रयत्न

शिवसेना नगरसेवकांची संयुक्त शिबिरांची मागणी; धारावी सर्वेक्षणाला गती देण्याचा प्रयत्न

Follow Us
Follow Us:
  • शिवसेना नगरसेवकांची संयुक्त शिबिरांची मागणी
  • धारावी सर्वेक्षणाला गती देण्याचा प्रयत्न
  • नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न
Dharavi Redevelopment News Marathi: शिवसेना नगरसेवक भास्कर शेट्टी यांनी गुरुवारी (23 एप्रिल 2026) एनएमडीपीएल अधिकाऱ्यांची भेट घेऊन धारावी येथे डीआरपी, मुंबई महापालिका आणि बेस्ट अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कागदपत्र पडताळणी शिबिर आयोजित करण्याबाबत चर्चा केली. या शिबिराच्या माध्यमातून सर्वेक्षणाच्या निकालांबाबत नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न होणार आहे.

शेट्टी यांनी सांगितले की, पात्रता प्रक्रियेत अनेक नागरिकांना “अनिर्णीत” (Undecided) असा दर्जा देण्यात आल्याने ते असमाधानी असून त्यांना तात्काळ स्पष्टता आवश्यक आहे. त्यामुळे सर्व संबंधित विभागांचे अधिकारी एकाच ठिकाणी उपस्थित राहून ‘एक खिडकी – सिंगल-विंडो’ पद्धतीने कागदपत्रांची पडताळणी व निर्णय प्रक्रिया जलद करण्यात यावी, असा प्रस्ताव त्यांनी मांडला.

मिळकत करात 50 टक्के सवलतीला पुणे महापालिकेची मान्यता; सवलतीनंतर घटणार महापालिकेचे उत्पन्न

याशिवाय, अद्याप सर्वेक्षणात सहभागी न झालेल्या नागरिकांसाठी स्वतंत्र जनजागृती मोहीम राबवून त्यांच्यासाठीही अशाच प्रकारचे शिबिर आयोजित करावे, जेणेकरून त्यांना कागदपत्रे सादर करून प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी मिळेल, अशी मागणीही त्यांनी केली. एनएमडीपीएल अधिकाऱ्यांनी समन्वयित प्रयत्नांमुळे कागदपत्र पडताळणी प्रक्रिया सुलभ होऊन नागरिकांमधील संभ्रम कमी होण्यास मदत होईल, असे नमूद केले.

या बैठकीत नगरसेवकांना प्रकल्पाचे फायदे आणि पात्रतेचे निकष याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. “आजच्या बैठकीत प्रकल्पाबाबत अधिक स्पष्टता मिळाली असून अनेक गैरसमज दूर झाले आहेत. तसेच आम्ही पार्किंग सुविधा, धारावीतील पायाभूत सुविधा विकास आणि कागदपत्रांबाबत नागरिकांच्या शंकाही मांडल्या,” असे शेट्टी यांनी सांगितले.

परवडणाऱ्या भाडे तत्वावरील गृहनिर्माण (Affordable Rental Housing) योजनेबाबत तसेच अपात्र ठरलेल्या कुटुंबांना किती वर्षे भाडे भरावे लागेल यावरही चर्चा झाली. “भाड्याची रक्कम किती असेल, याबाबत एनएमडीपीएल आणि डीआरपी अधिकाऱ्यांनी स्पष्ट माहिती द्यावी, अशी आमची मागणी आहे. याबाबत अनेक अफवा पसरत असून नागरिकांना ठोस माहिती मिळणे आवश्यक आहे,” असे शेट्टी यांनी नमूद केले.

माटुंगा रेल्वे भूखंडाच्या भाडेपट्टा संदर्भातील संभ्रमाबाबतही अधिकाऱ्यांनी स्पष्टता दिली. “या प्रकरणात आरएलडीए हा जमीनमालक असून डिआरपी मुख्य भाडेपट्टा धारक असेल, तर संबंधित गृहनिर्माण संस्थांना उप-भाडेपट्टा (Sub-lease) देण्यात येईल. हा करार ९९ वर्षांसाठी असेल. भाडेपट्टा रक्कम एनएमडीपीएल कडून डीआरपी मार्फत आरएलडीएला दिली जाईल,” असे शेट्टी यांनी सांगितले. तसेच, सर्व एसआरए प्रकल्पांप्रमाणेच नागरिकांना त्यांच्या घरांवर पूर्ण हक्क असतील आणि पाच वर्षांच्या लॉक-इन कालावधीनंतर ते आपले घर विक्री, भाडे किंवा गहाण ठेवू शकतील, असेही स्पष्ट करण्यात आले.

याशिवाय, पात्र ठरलेल्या पहिल्या मजल्यावरील रहिवाशांना ‘हायर-परचेस’ योजनेअंतर्गत धारावीबाहेर ३०० चौरस फूटांचे घर नाममात्र भाड्यावर उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली. “या योजनेत नागरिकांना २५ वर्षांच्या कालावधीत कोणत्याही वेळी घर खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे, ज्यामुळे त्यांना थेट मालकी हक्कही मिळू शकतो,” असे शेट्टी यांनी सांगितले.

MNS Warning to Auto Drivers: मुंबई बंदच्या धमक्यांना मनसे भीक घालणार नाही; मनसेचा अमराठी रिक्षाचालकांना थेट इशारा

Web Title: Shiv sena corporators demand joint camps dharavi survey process speed up

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 12:16 PM

Topics:  

  • dharavi
  • Mumbai
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

Mumbai Local: प्रवाशांसाठी मोठी बातमी! मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष
1

Mumbai Local: प्रवाशांसाठी मोठी बातमी! मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष

Shiv Sena Split : पक्षांतर्गत लोकशाही संपुष्टात आल्यामुळेच फूट पडली ; शिवसेनेच्या वतीने नीरज कौल यांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद
2

Shiv Sena Split : पक्षांतर्गत लोकशाही संपुष्टात आल्यामुळेच फूट पडली ; शिवसेनेच्या वतीने नीरज कौल यांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

कोरडा दुष्काळ तत्काळ जाहीर करा, शेतकरी मदतीसाठी शिवसेनेचा एल्गार; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
3

कोरडा दुष्काळ तत्काळ जाहीर करा, शेतकरी मदतीसाठी शिवसेनेचा एल्गार; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Mumbai News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! दीड तासांचा प्रवास अवघ्या काही मिनिटांत, मढ-वर्सोवा केबल-स्टेड पुलाचा मार्ग मोकळा
4

Mumbai News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! दीड तासांचा प्रवास अवघ्या काही मिनिटांत, मढ-वर्सोवा केबल-स्टेड पुलाचा मार्ग मोकळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.